Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 12 September 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (12 सप्टेंबर 2016)

चालू घडामोडी (12 सप्टेंबर 2016)

‘तेलंगण वॉटर ग्रीड’ योजना :

 • भीषण दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्याची पिण्याच्या पाण्याच्या टंचाईतून कायमस्वरूपी मुक्तता करण्यासाठी गावे व शहरांना बंद पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करणारी तेलंगणच्या धर्तीवर ‘मिशन भगीरथ’ ही वॉटर ग्रीड योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
 • पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी तेलंगणा राज्याचा दौरा करून साधारण 42 हजार कोटी रुपयांच्या खर्चातून आकाराला येत असलेल्या मिशन भगीरथ या ‘तेलंगणा वॉटर ग्रीड’ प्रकल्पाची पाहणी केली.
 • तसेच या प्रकल्पांतर्गत येत असलेल्या काही धरणांना भेटी देऊन, बांधकाम सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांना भेटी देऊन त्यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली.
 • बबनराव लोणीकर म्हणाले, की मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या कामाला मंत्रिमंडळाने तत्त्वत: मान्यता दिली असून, सहा महिन्यांत डीपीआर तयार करून कामाला सुरवात केली जाणार आहे.
 • चार वर्षांपासून मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्यामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.
 • संपूर्ण पाण्याचे स्रोत आटले गेल्याने 4 हजारपेक्षा अधिक टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. लातूरला रेल्वेने पाणी पुरविले. या वर्षी पाणीपुरवठ्यासाठी 700 कोटींची तरतूद करावी लागली.
 • तसेच त्यामुळे मराठवाड्याला टॅंकरवाड्यातून मुक्त करण्यासाठी शहरे व गावांच्या पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व मंत्रिमंडळाने यास तत्त्वत: मान्यता दिल्याचे लोणीकर यांनी स्पष्ट केले.
 • मिशन भगीरथ (तेलंगण वॉटर ग्रीड योजना) ही तेलंगणा राज्याची पाणीपुरवठा योजना आहे.

स्पॅनिश टॅल्गोची तिसरी चाचणी यशस्वी :

 • सध्याच्या वेगवान राजधानी एक्‍स्प्रेसपेक्षाही वेगाने धावणाऱ्या स्पॅनिश बनावटीच्या टॅल्गो रेल्वेगाडीची दिल्ली-मुंबई मार्गावरील तिसरी चाचणी यशस्वी झाल्याचे रेल्वेतर्फे (दि.11) सांगण्यात आले.
 • नवी दिल्ली स्थानकावरून दुपारी पावणेतीनला सोडण्यात आलेली टॅल्गो मुंबईत मध्यरात्री दोन वाजून 33 मिनिटांनी म्हणजे 11 तास 48 मिनिटांनी पोचली.
 • ‘राजधानी’ला सध्या हे अंतर कापण्यासाठी 16 तास लागतात. टॅल्गोमुळे तो वेळ 12 तासांवर येईल, असा रेल्वेचा दावा आहे.
 • सध्याच्या लोहमार्गांवर व काही तांत्रिक सुधारणा करून ही नवी गाडी चालविली जाणार आहे.
 • नऊ डब्ब्यांच्या टॅल्गो गाडीत एक्‍झिक्‍युटिव्ह वर्गाचे दोन डबे, चार चेअर कार, एक जनरेटर कार व एक कर्मचाऱ्यांसाठीचा डबा, असे वर्गीकरण राहणार आहे.

यूएस ओपन टेनिस स्पर्धेत एंजेलिक केर्बरला विजेतेपद :

 • जर्मनीच्या एंजेलिक केर्बरने 2016 मधील यशाची वाटचाल कायम राखताना यूएस ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले आणि जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू ठरल्याचा मान ही प्राप्त केला.
 • यंदा वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत जेतेपद पटकाविणाऱ्या दुसऱ्या मानांकित कर्बरने अंतिम लढतीत 10वे मानांकनप्राप्त झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना पिलिस्कोव्हाची झुंज 6-3, 4-6, 6-4 ने मोडून काढली.
 • जर्मनीच्या एंजेलिक केर्बरचे यंदाच्या मोसमातील हे दुसरे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद आहे.
 • तसेच मागील स्पर्धेत एंजेलिक हिने ऑस्ट्रेलियन स्पर्धेत सेरेनाला हरवून विजेतेपद मिळविले होते.

रिलायन्स जिओला दूरसंचार मंत्र्यांकडून समर्थन :

 • रिलायन्स जिओच्या जाहिरातींमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समावेशाचे समर्थन केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी केले.
 • पंतप्रधानांचे ‘डिजिटल कनेक्‍टिव्हिटी’चे स्वप्न कोणी पूर्ण करीत असेल तर त्यात काही गैर नाही, असे सिन्हा यांनी स्पष्ट केले.
 • मागील मंत्रिमंडळ विस्तारात रविशंकर प्रसाद यांच्या जागी सिन्हा यांची दूरसंचारमंत्री म्हणून निवड करण्यात आली.
 • ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सिन्हा म्हणाले, ‘रिलायन्स जिओने मोफत कॉल आणि कमी दरात डेटा उपलब्ध करून दिला असून आहे.’ हे निकोप स्पर्धेसाठी आवश्‍यक असून, याचा फायदा शेवटी ग्राहकांनाच होणार आहे.
 • पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया मोहिमेत डिजिटल दरी दूर करण्याचा प्रयत्न करून इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढविण्याचा हेतू आहे.
 • एखादी कंपनी मोठ्या प्रमाणात ‘डिजिटल कनेक्‍टिव्हिटी’ देत असेल तर एकप्रकारे ती डिजिटल योजनाचे स्वप्न पूर्ण करीत आहे.

दिनविशेष :

 • 1890 : सॅलिसबरी, र्‍होडेशिया शहराची स्थापना.
 • 1952 : सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर पुण्यतिथी.
 • 2002 : ‘मेटसॅट’ या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
 • 2005 : डिझनीलँड हाँगकाँग येथे सुरू करण्यात आले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World