Current Affairs of 10 September 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (10 सप्टेंबर 2016)
रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताला ‘सुवर्ण’ :
- रिओ ऑलिम्पिकमध्ये देशासाठी एकतरी सुवर्णपदक मिळवण्याचे भारतीय खेळाडूंचे स्वप्न अपूर्ण राहिले असले तरी ही कसर आता रिओ पॅरालिम्पिकमध्ये भरून निघाली आहे.
- मरियप्पन थंगवेलू याने पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी उंच उडी प्रकारात ‘सुवर्ण’ पदक पटकावले आहे.
- तर याच प्रकारात तिस-या आलेल्या वरूण सिंग भाटी याने कांस्यपदक पटकावले आहे.
Must Read (नक्की वाचा):
श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय :
- पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या व अंतिम टी-20 सामन्यात श्रीलंकेला चार विकेट्सने पराभूत केले.
- तसेच यासह ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिकेत 2-0 असे निर्विवाद वर्चस्व राखले.
- विशेष म्हणजे, कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळत असलेल्या तिलकरत्ने दिलशानला विजयी निरोप देण्यात श्रीलंका संघ अपयशी ठरला.
- गतसामन्यात विक्रमी नाबाद शतक झळकावणाऱ्या मॅक्सवेलने पुन्हा एकदा आपला हिसका दाखवताना 29 चेंडूत 7 चौकार आणि चार षटकारांसह 66 धावांची वेगवान खेळी केली.
- कर्णधार डेव्हीड वॉर्नरनेही 24 चेंडूत 25 धावांची खेळी करुन मॅक्सवेलसह 93 धावांची दमदार सलामी दिली.
- या दोघांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर श्रीलंकेने दिलेले 129 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 17.5 षटकात 6 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.
- यासामन्यातही मॅक्सवेलने विक्रमी खेळी करताना 18 चेंडूत अर्धशतक पुर्ण करुन ऑस्ट्रेलियाकडून वेगवान अर्धशतक झळकावले.
- विशेष म्हणजे त्याने गेल्या सामन्यातील स्वत:चाच 19 चेंडूत अर्धशतकाचा विक्रमही मागे टाकला.
विद्या बालन पेंशन योजनेची सदिच्छादूत :
- समाजवादी पक्षाने राज्य सरकारच्या ‘समाजवादी पेंशन योजने’च्या प्रसारासाठी बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालनची निवड करुन आगामी निवडणुकीच्या लोकप्रियतेची रणनिती आखली आहे.
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी (दि.9) रोजी विद्या बालनची समाज पेंशन योजनेची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केल्याची अधिकृत घोषणा केली.
- समाजवादी पेंशन योजन अंतर्गत राज्यातील 50 लाखांहून अधिक महिलांना दरमहा 500 रुपये सरकाकडून दिले जातात.
- मात्र, लाभ घेणाऱ्या महिलांना आपल्याला मिळणारा लाभ कोणामुळे मिळतो, याची कल्पना नसल्यामुळे विद्या बालनच्या माध्यमातून जनतेपर्यंत योजनेचा प्रसार केला जाणार असल्याची माहिती अखिलेश यांनी कार्यक्रमामध्ये दिली.
- तसेच यापूर्वी विद्या बालनने केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत शौचालय बांधणीचा संदेश दिले आहे.
देशांतर्गत सर्व जलविद्युत प्रकल्पांना अपारंपरिक ऊर्जेचा दर्जा मिळणार :
- देशातील सर्व जलविद्युत प्रकल्पांना अपारंपरिक ऊर्जेचा दर्जा देण्याबाबत केंद्रीय वीज प्राधिकरणाने ऊर्जा मंत्रालयाला शिफारस केली आहे.
- जलविद्युत प्रकल्पांना अपारंपरिक ऊर्जेचा दर्जा देण्यासाठी 25 मेगावॉटची मर्यादा आहे.
- तसेच ही मर्यादा काढून टाकावी व मोठ्यात मोठ्या जलविद्युत प्रकल्पाला अपारंपरिक ऊर्जेचा दर्जा द्यावी, अशी शिफारस उर्जा मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.
- जलविद्युत प्रकल्पांना अपारंपरिक दर्जा मिळाल्यास गुंतवणूकदारांचा ओढा त्याकडे वाढणार आहे.
उत्तर प्रदेश सरकारची समाजवादी स्मार्टफोन योजना :
- विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आता मोफत स्मार्टफोन देण्याची घोषणा केली आहे.
- नागरिक आणि सरकार यांच्यात संवाद साधता यावा, यासाठी सरकारने समाजवादी स्मार्टफोन या नावाने योजना सुरू करण्याचे ठरविले आहे.
- मात्र, या योजनेतून सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या वारसांना वगळण्यात आले आहे.
- सरकारच्या विविध योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहचावी, असाही उद्देश या योजनेचा आहे.
- स्मार्टफोनचे वाटप 2017 मध्ये करण्यात येणार असून, जो पहिला येईल आणि पहिली नोंदणी करेल त्यालाच स्मार्टफोन मिळेणार आहे.
- तसेच या स्मार्टफोनमध्ये सरकारच्या योजनांची संपूर्ण माहिती ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध करण्यात येणार आहे.
- कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार टाळण्यासाठी या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे.
- ज्यांचे वय 1 जानेवारी 2017 रोजी 18 वर्षे झाले आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखांपेक्षा कमी आहे, तेच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- उत्तर प्रदेशात झालेल्या 2012 मधील निवडणुकीत समाजवादी पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले असून, त्यांनी विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्याचे वचन पूर्ण केले आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा