Current Affairs of 9 September 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (9 सप्टेंबर 2016)

चालू घडामोडी (9 सप्टेंबर 2016)

स्वच्छतेत सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम स्थानी:

 • भारत सरकारच्या ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षणात सिक्कीम केरळ राज्याने देशात पहिला व दुसरा क्रमांक पटकावला आहे.
 • सिक्कीमखेरीज हिमाचल प्रदेश, मिझोरमनागालँड ग्रामीण स्वच्छतेत आघाडीवर आहेत.
 • तसेच या स्पर्धेत महाराष्ट्र 15 व्या क्रमांकावर आहे.
 • सर्वात स्वच्छ जिल्ह्याचा सन्मान महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने मिळवला असून, सातारा तिसऱ्या तर कोल्हापूर पाचव्या क्रमांकावर आहे.
 • केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सर्वेक्षण अहवालाचे ठळक तपशील जाहीर केले. पुढले सर्वेक्षण जानेवारी महिन्यात होणार आहे.
 • केंद्र सरकारने देशातल्या 70 जिल्ह्यांत 70 हजारांपेक्षा अधिक घरांचे सर्वेक्षण करून हा अहवाल सादर केला.
 • सर्वेक्षणात मुख्यत्वे ग्रामीण भागांचाच समावेश आहे. अहवालानुसार देशातले सर्वाधिक स्वच्छ राज्य सिक्कीम आहे.
 • तसेच त्यानंतर अनुक्रमे केरळ, मिझोरम, हिमाचल प्रदेशनागालँड यांचा क्रमांक लागतो.
 • ग्रामीण स्वच्छतेत बंगाल 12 व्या, गुजराथ 14व्या तर महाराष्ट्र 15 व्या क्रमांकावर आहे.

21 संसदीय सचिवांच्या नियुक्‍त्या रद्द :

 • मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने 21 आमदारांच्या संसदीय सचिव पदी केलेल्या नियुक्‍त्या रद्द करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
 • संसदीय सचिवपदी केजरीवाल सरकारने केलेल्या 21 आमदारांच्या नियुक्‍त्याला राष्ट्रीय मुक्ति मोर्चाचे अध्यक्ष रविंद्र कुमार यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
 • या नियुक्‍त्या घटनाबाह्य आणि मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील नसल्याचे कुमार यांनी याचिकेत म्हटले होते.
 • 13 मार्च 2015 रोजी केजरीवाल यांनी 21 आमदारांच्या संसदीय सचिवपदी केलेल्या या नियुक्‍त्या संपूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे म्हणत कुमार यांनी या सर्व नियुक्‍त्या रद्द करण्याची मागणी याचिकेत केली होती.
 • तसेच या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने या नियुक्‍त्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

अरुणाचल प्रदेशमध्ये जीएसटीला मंजुरी :

 • वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकाला अरुणाचल प्रदेश सरकारने (दि.8) रोजी मंजुरी दिली.
 • जीएसटीमुळे भविष्यात देशभरात करप्रणाली सुटसुटीत होऊन कराचा एकच दर कायम राहणार आहे.
 • उपमुख्यमंत्रीअर्थमंत्री चोवना मेन यांनी जीएसटीबाबतचा ठराव विधानसभेत मांडला.
 • तसेच याला आवाजी मतदानाने बिनविरोध मंजुरी देण्यात आली.
 • विधानसभेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेते तमियो तागा यांनी या विधेयकाला आधीच 19 राज्यांनी मंजुरी दिल्याने चर्चेशिवाय याला मंजुरी द्यावी, असे मत मांडले.
 • जीएसटीला यापूर्वीच संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली आहे.

‘आधार’ प्राधिकरणाचे नवे प्रमुख सत्यनारायण :

 • नागरिकांना ‘आधार’ कार्ड जारी करणाऱ्या ‘युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’चे (यूआयडीएआय) अर्धवेळ अध्यक्ष म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) निवृत्त अधिकारी जे. सत्यनारायण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी (दि.8) सत्यनारायण यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे.  
 • तसेच याखेरीज राजेश जैन आणि आनंद देशपांडे यांची या प्राधिकरणावर अर्धवेळ सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
 • सत्यनारायण आंध्र प्रदेश कॅडरचे सनदी अधिकारी होते.
 • निवृत्त होण्यापूर्वी दोन वर्षं ते इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव होते.
 • मुंबई आयआयटीचे इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेले जैन ‘नेटकोअर सोल्युशन्स’ या एंटरप्राईज कम्युनिकेशन व डिजिटल मार्केटिंग सोल्युशन्स कंपनीचे संस्थापकव्यवस्थापकीय संचालक आहेत.

‘इन्सॅट-3डी आर’चे यशस्वी प्रक्षेपण :

 • ‘जीएसएलव्ही-एफ05’ प्रक्षेपकाच्या साहाय्याने भारताने ‘इन्सॅट-3डी आर’ हा हवामान उपग्रहाचे अवकाशात (दि.8) रोजी यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले.
 • येथील सतीश धवन अवकाश केंद्रातील प्रक्षेपण स्थळाहून सायंकाळी 49.13 मीटर लांबीच्या रॉकेटच्या साहाय्याने ‘इन्सॅट-3 डी आर‘ अवकाशात सोडण्यात आला.
 • तसेच हा उपग्रह 2 हजार 211 किलोंचा असून, प्रक्षेपणानंतर सतरा मिनिटांनी तो भूस्थिर कक्षेत स्थिर झाला.
 • भारतीय बनावटीच्या पुढील टप्प्यातील क्रायोजेनिक इंजिनचा वापर या प्रक्षेपणात केला गेला.
 • हे प्रक्षेपण सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी होणारे होते; परंतु इंधन भरण्यातील विलंबामुळे ते 4 वाजून 50 मिनिटांनी झाले.   
 • जीएसएलव्हीच्या साहाय्याने झालेले हे दहावे उड्डाण ठरले आहे. त्यामुळे हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) वाटचालीत मैलाचा दगड ठरले आहे.
 • ‘इन्सॅट-3 डी आर’ या उपग्रहामुळे भारताला हवामानाची वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळणार आहे.
 • जीएसएलव्ही-एफ05′च्या साहाय्याने झालेले प्रक्षेपण पुढील टप्प्यातील क्रायोजेनिक इंजिन वापरून झाले असल्याने महत्त्वपूर्ण आहे.

दिनविशेष :

 • 1776 : अमेरिकेची अधिकृ्तरित्या देश म्हणून घोषणा करण्यात आली.
 • 1855 : अँथोनी फ्रांसिस लुकास, खनिजतेल शोधक यांचा जन्मदिन.
 • 1948 : उत्तर कोरिया प्रजासत्ताक दिन.
 • 1985 : मूक-बधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉयने तिसर्‍यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.