Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 16 September 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (16 सप्टेंबर 2016)

चालू घडामोडी (16 सप्टेंबर 2016)

न्यूयॉर्क खंडपीठामध्ये डायने गुजराती यांची न्यायाधीशपदी नियुक्ती :

 • भारतीय-अमेरिकन वंशाच्या महिलेची अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी न्यायाधीशपदी नियुक्ती केली असल्याचे व्हाइट हाउसतर्फे सांगण्यात आले.
 • अमेरिकेतील जिल्हा न्यायालयाच्या न्यूयॉर्क खंडपीठामध्ये 47 वर्षीय डायने गुजराती यांची ओबामा यांनी न्यायाधीशपदी नियुक्ती केली असून, सिनेटच्या मंजुरीनंतर त्या कार्यभार स्वीकारतील असे सांगण्यात आले.
 • तसेच त्या अमेरिकेतील नागरिकांची योग्य प्रकारे सेवा करतील, असे ओबामा यांनी म्हटल्याचे व्हाइट हाउसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
 • भारतीय-अमेरिकन वंशाच्या गुजराती या 2012 पासून दक्षिण न्यूयॉर्क जिल्ह्याच्या न्यायाधीशांच्या कार्यालयात गुन्हे विभागाच्या उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
 • गुजराती या अमेरिकेतील वेस्ट पॉइंट येथील लष्करी अकादमीतील प्राध्यापक दामोदर गुजराती यांच्या कन्या आहेत.
 • दामोदर गुजराती यांनी 1960 मध्ये मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी संपादन केली होती.
 • तसेच 1965 मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली होती.

भारतीय कंपनीला याहूचे नाव वापरण्यास मनाई :

 • याहू कंपनीचा ट्रेडमार्क वापरण्यापासून भारतीय कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाने मनाई केली आहे.
 • अमेरिकेतील याहू कंपनीचे नोंदणीकृत नाव वापरणे, हे नियमांचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.
 • एप्रिकॉट फूड्‌स प्रायव्हेट लिमिटेडचे (एएफपीएल) संचालक संजय पटेल आणि श्री जी ट्रेडर्स यांच्याविरुद्ध ट्रेडमार्क नियमांचा भंग केल्याप्रकरणी याहू इन्कॉर्पोरेशनने खटला दाखल केला होता.
 • तसेच या कंपन्यांनी याहूला 32 लाख नुकसान भरपाई आणि 6.44 लाख रुपये न्यायालयीन खर्च द्यावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
 • एएफपीएलने त्यांची उत्पादने ‘याहू मसाला चक्र’ आणि ‘याहू टोमॅटो टॅंगी’ या नावाने बाजारात विक्रीसाठी आणली होती. हा ट्रेडमार्क नियमांचा भंग असल्याचे याहूचे म्हणणे होते.
 • या सुनावणीला एएफपीएलचे संचालक आणि प्रतिनिधी उपस्थित नव्हते; तसेच लिखित स्वरूपातही कंपनीने न्यायालयात म्हणणे मांडले नाही.
 • श्री जी ट्रेडर्सने याहूच्या नावाचा वापर केला नसल्याचे न्यायालयात सांगितले. यावर याहूने त्यांच्याविरुद्धची भरपाईची मागणी मागे घेतली.

बलुच भाषेत आता संकेतस्थळ व मोबाईल ऍपही :

 • बलुचिस्तानमध्ये रेडिओ कार्यक्रमांचे प्रसारण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्यानंतर तेथील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचण्याच्या हेतूने आता बलुच भाषेत संकेस्थळमोबाईल ऍप सुरू करण्याची योजना ऑल इंडिया रेडिओने (एआयआर) आखली आहे.
 • तसेच येत्या आठवड्याभरात ही सुविधा प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे.  
 • बलुचिस्तानशी असलेले संबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने तेथे रेडिओ कार्यक्रमांचे प्रसारण करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता.
 • तसेच त्यानुसार आता दररोज विविध कार्यक्रम रेडिओद्वारे प्रसारित केले जातात. यात दैनंदिन बातम्यांचाही समावेश आहे.
 • या कार्यक्रमांना बलुच नागरिकांबरोबर इतर देशांतील नागरिकांचाही प्रतिसाद मिळावा, या हेतूने संकेतस्थळ व मोबाईल ऍप सुरू करण्याचा विचार सुरू होता. त्यावर तातडीने निर्णय घेत ही सुविधा लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे.
 • डिजिटल युगात आपला श्रोतावर्ग वाढविण्यावर प्रसार भारतीने आपले लक्ष केंद्रित केले असून, संकेतस्थळ व ऍप सुरू करणे या त्याचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे.
 • बलुच नेते ब्रह्ममदाग बुग्ती यांची मुलाखत घेण्यासाठी डीडी न्यूजने नुकतीच आपली एक टीम जिनिव्हा येथे पाठविली होती.
 • रेडिओ सेवेचा लाभ पाकिस्तानबरोबर इतर शेजारी देशातील नागरिकही घेतात.
 • काश्‍मीरप्रश्‍नी होणारा पाकिस्तानचा हस्तक्षेप पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानकडून होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला होता.
 • तसेच त्याला बलुची नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याची मागणी केली होती.
 • ‘एआयआर’चा विस्तार –
 • 108 देशांमध्ये प्रसारण
 • 27 भाषांमध्ये विविध कार्यक्रम
 • कार्यक्रमांत 15 परदेशी भाषांचा अंतर्भाव

ऑगस्ट महिना हा 136 वर्षांतील सर्वाधिक उष्ण ठरला :

 • गेल्या 136 वर्षांपासून मॉन्सूनसंदर्भात नोंद करण्यात येत असलेल्या आधुनिक पद्धतीनुसार ऑगस्ट महिना हा गेल्या 136 वर्षांतील सर्वाधिक उष्ण ठरल्याचे नासा या अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्थेने म्हटले आहे.
 • नासाच्या गोडार्ड इन्स्टिट्युट ऑफ स्पेस स्टडीज (जीआईएसएस) ने वैश्‍विक तापमानाचे केलेल्या विश्‍लेषणातून ही बाब समोर आली आहे.
 • यामध्ये ऑगस्ट 2014 च्या तुलनेत ऑगस्ट 2016 चे तापमान 0.16 डिग्री सेल्सियस जास्त असल्याचे आढळून आले आहे.
 • तसेच 1951 ते 1980 दरम्यान आलेल्या ऑगस्ट महिन्यांच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टच्या महिन्यातील सरासरी तापमानानाच्या तुलनेत 0.98 डिग्री सेल्सियस अधिक असल्याचे नोंदविण्यात आले आहे.
 • ‘हवामानातील बदलांचा पृथ्वीवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी हवामानाबाबतच्या दीर्घकाळाच्या माहितीवर आम्ही भर देत आहोत’, अशी माहिती जीआईएसएसचे संचालक डेविन श्‍मिट यांनी दिली.

दिनविशेष :

 • जागतिक ओझोन संरक्षण दिन
 • 1963 : मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
 • 1963 : झेरॉक्स 914 या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.
 • 1994 : मराठी साहित्यिक ‘जयवंत दळवी’ पुण्यतिथी.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World