Current Affairs of 13 May 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (13 मे 2017)

चालू घडामोडी (13 मे 2017)

अमिताभ बच्चन हेपेटायटिस सदिच्छा दूत :

 • जागतिक आरोग्य संघटनेने (हू) आग्नेय आशियात हेपेटायटिसबाबत जनजागृती वाढवून या साथीला आळा घालण्याच्या प्रयत्नांना वेग देण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली.
 • ‘हू’च्या प्रादेशिक संचालक (ईशान्य आशिया) पूनम खेत्रपाल सिंग यांनी बच्चन यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
 • विषाणुजन्य हेपेटायटिसमुळे भारतासह या प्रदेशात दरवर्षी 4 लाख 10 हजार लोक प्राण गमावतात. मी हेपेटायटिसच्या निर्मूलनास पूर्णपणे बांधील आहे.
 • हेपेटायटिसचे या भागाचे सदिच्छा दूत म्हणून बच्चन यासंदर्भातील जनजागृती मोहिमांसाठी आपला आवाज आणि पाठबळ देतील.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 मे 2017)

प्रत्येक गावात होणार शिवार संवाद सभा :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे.
 • राज्यभर 25 ते 28 मे असे चार दिवस प्रत्येक गावात भाजपचे नेते, मंत्री, पदाधिकारी यांच्या शिवार संवाद सभा होणार आहेत.
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत.
 • तसेच या उपक्रमामध्ये भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी गावागावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी कार्यकर्त्यांसह श्रमदान करणार आहेत.
 • कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे हे शेतकरी संवाद सभांचे नियोजन करीत आहेत.

ज्येष्ठ क्रीडा मनोसपचारतज्ञ भीष्मराज बाम यांचे निधन :

 • खेळाडूंमध्ये जिंकण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण करणारे ज्येष्ठ क्रीडा मनोसपचारतज्ञ आणि राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक भीष्मराज बाम यांचे 12 मे रोजी नाशिकमध्ये ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.
 • मानसोपचारातील भीष्म अशी उपाधी लाभलेले भीष्मराज बाम हे एका कार्यक्रमात योग विद्येसंदर्भात व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कोसळले.
 • क्रीडामानसोपचार तज्ज्ञ म्हणून अवघ्या देशाला परिचित असलेल्या बाम यांनी क्रिकेटमधील विक्रमवीर सचिन तेंडुलकरसह ‘द वॉल’ राहुल द्रविड या जगभरातील महान क्रिकेटपटूंसह ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांची कामगिरी उंचावण्यात मोलाचा वाटा उचलला.
 • तसेच त्यांनाच नव्हे तर नेमबाज अंजली भागवत, सुमा शिरूर, गगन नारंग तसेच गीत सेठी, धावपटू कविता राऊत यांच्यासह शेकडो खेळाडूंना मानसिकदृष्ट्या एकाग्रता आणि अन्य प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन राज्य शासनामार्फत 2011-12 या वर्षासाठीचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.

बीएसईत सायबर सुरक्षा संचालन केंद्र उभारणार :

 • मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) सायबर सुरक्षा संचालन केंद्र (एसओसी) उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीची कंपनी आयबीएमची निवड केली आहे.
 • नव्या काळातील ऑनलाईन धोके दूर ठेवणे, सायबर सुरक्षा अधिक मजबूत करणे आणि समभागधारकांच्या मालमत्तांचे संरक्षण करणे या उद्देशाने बीएसई हे केंद्र उभारत आहे. हे केंद्र पूर्णत: अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असेल. आयबीएमच्या मदतीने त्याची उभारणी करण्यात येईल.
 • बीएसई आणि आयबीएम यांच्यात पाच वर्षांचा सुरक्षा करार झाला आहे. त्यानुसार हे केंद्र शेअर बाजारातील हालचालींवर चोवीस तास निगराणी ठेवण्याचे काम करील.

दिनविशेष :

 • मलेरियाबरील जंतूचा शोध लावणारे नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश शास्त्रज्ञ ‘सर रोनॉल्ड रॉस’ यांचा 13 मे 1857 मध्ये भारतात जन्म झाला.
 • 13 मे 1962 रोजी डॉ. राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 मे 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.