Current Affairs of 15 May 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (15 मे 2017)

चालू घडामोडी (15 मे 2017)

अखिल भारतीय संमेलनाच्या राष्ट्रीय सचिवपदी सुमन अग्रवाल :

 • सामाजिक कार्यकर्त्या सुमन अग्रवाल यांची अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाच्या राष्ट्रीय सचिवपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.
 • भारतीय अग्रवाल संमेलन हे भारतामधील सर्वात जुन्या सामाजिक संस्थेपैकी एक आहे.
 • अग्रवाल म्हणाल्या की, समाजाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी माझ्या सामाजिक कार्यातून दाखवण्याचा प्रयत्न करीन. महाराष्ट्रात संस्थेला मजबूत बनवण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असणार आहे.
 • याशिवाय, अग्रवाल समाजातील महिलांना पुढे आणण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 मे 2017)

राज्यातील तीन परिचारिकांना ‘फ्लॉरेन्स नाइटिंगेल’ राष्ट्रीय पुरस्कार :

 • रुग्णसेवेचे पवित्र कार्य मनोभावे करताना इतरांना आदर्श ठरेल अशी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्वप्ना जोशी, चंद्रकला चव्हाण आणि कल्पना गायकवाड या महाराष्ट्रातील तीन परिचारिकांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ‘फ्लॉरेन्स नाइटिंगेल’ राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला.
 • राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात देशभरातील एकूण 35 परिचारिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • ‘फ्लॉरेन्स नाइटिंगेल’ यांच्या जन्मदिन ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण केले जाते.
 • तसेच सन्मानपदक, प्रशस्तिपत्र आणि 20 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार 1973 पासून प्रदान करण्यात येतात.

जेएनपीटीवर विवेक देशपांडे यांची फेरनियुक्ती :

 • जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टवर येथील रूद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरचे चेअरमन विवेक देशपांडे यांची केंद्र सरकारने फेरनियुक्ती केली.
 • तसेच या ट्रस्टवर निवड झालेले मराठवाड्यातील ते एकमेव असून सलग तिसऱ्यांदा त्यांची निवड झाली आहे. पहिली निवड सहा महिन्यांसाठी, तर दुसरी दोन वर्षांसाठी होती. या काळात सहा हजार कोटींची कामे मार्गी लागली.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या जपान दौऱ्यात मराठवाड्यातील उद्योजकांचे प्रतिनिधित्व देशपांडे यांनी केले होते. या ट्रस्टवर देशपांडे यांच्याशिवाय शिपिंग मंत्रालयाचे संयुक्त सचिव बरून मित्रा, पर्यावरण, वन आणि वातावरण बदल विशेष सचिव शशी शेखर, उरण येथील महेश रतन बाल्डी, मुंबईचे प्रमोद जठार, नागपूरचे राजेश बागडी आदींचा समावेश आहे.

केंद्र सरकार अयोध्येत राम-रामायण संग्रहालय उभारणार :

 • अयोध्येत वादग्रस्त रामजन्म स्थानापासून सहा किमी अंतरावर राम-रामायण संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
 • केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार मिळून 25 एकर जागेवर हे संग्रहालय साकारणार आहेत. यासाठी 225 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
 • गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम संग्रहालय उभारण्याची इच्छा व्यक्त करून, अयोध्येतील एक जागाही ठरवली होती.
 • मात्र, तत्कालीन अखिलेश सरकारने ही जागा देण्यास नकार दिला होता. मार्चमध्ये राजकीय चित्र बदलल्यानंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शरयू नदीच्या काठावरील 25 एकर जमीन उपलब्ध करून दिल्यामुळे, संग्रहालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला.

दिनविशेष :

 • 15 मे हा विश्व कुटुंबसंस्था दिन म्हणून साजरा केला जातो.
 • बंगाली समाजसुधारक देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्म 15 मे 1817 मध्ये झाला.
 • 15 मे 1980 मध्ये संपूर्ण भारतीय बनावटीच्या गोदावरी या पाणबुडीचे माझगाव गोदीमध्ये जलावतरण.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 मे 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.