Current Affairs of 12 May 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (12 मे 2017)

चालू घडामोडी (12 मे 2017)

राज्याचे नवे कृषी आयुक्त एस.एम. केंद्रेकर :

 • सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात कृषी आयुक्त; पुणे विकास देशमुख यांची बदली यशदा पुणेच्या उपमहासंचालकपदी करण्यात आली.
 • एस.एम. केंद्रेकर हे राज्याचे नवे कृषी आयुक्त असतील. व्ही.एन. कळम पाटील यांची बदली चित्रपट महामंडळ व्यवस्थापकीय संचालकपदी तर नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अरुण उन्हाळे यांची बदली मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव म्हणून मंत्रालयात केली आहे.
 • अमित सैनी हे विक्रीकरण विभागात सहआयुक्त असतील. शुल्क नियामक प्राधिकरणाचे सचिव कमलाकर फंड यांची बदली एकात्मिक बाल विकास योजना; नवी मुंबईच्या आयुक्तपदी झाली.
 • ठाण्यातील अतिरिक्त आदिवासी आयुक्त चंद्रकांत डांगे यांची बदली महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 मे 2017)

प्राप्तिकर विभागातर्फे नवी ऑनलाईन सुविधा उपलब्ध :

 • नागरिकांची पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने एक नवी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
 • तसेच यासाठी विभागाने आपल्या incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर विशेष पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. यावर क्लिक करुन आवश्यक माहिती भरल्यास लगेचच नागरिकाचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी जोडले जाईल.
 • या पर्यायावर क्लिक करुन ग्राहकाला आपला पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि आधार कार्डाची माहिती द्यावी लागेल. यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात युआयडीएआयकडून या माहितीची पडताळणी केली जाईल.
 • आधार कार्डावरील नाव आणि नागरिकाने वेबसाईटवर दिलेले नाव यात मोठी तफावत आढळल्यास वन टाईम पासवर्डची(ओटीपी) गरज भासेल. मोबाईल क्रमांक आणि ई-मेलद्वारे हा क्रमांक कळविला जाईल.

आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये अनिलकुमार कांस्यपदकाचा मानकरी :

 • आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या अनिलकुमार आणि ज्योती यांनी दुसऱ्या दिवशी आपआपल्या गटात कांस्यपदके जिंकली. दुसरीकडे महिलांच्या 53 कि.गटात रितूचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.
 • अनिलने ग्रीको रोमनच्या 85 किलो गटात उज्बेकिस्तानच्या मुहम्मदाली शमसिदिनोव्हविरुध्द शानदार पुनरागमन करताना 7-6 असा विजय मिळवून कांस्यपदक पटकावले.
 • महिला गटात ज्योतीला 75 किलो वजन गटात सेमीफायनलमध्ये जपानच्या मसाको फुरुची हिच्याकडून हरल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

अंजली राऊत ठरल्या मिसेस इंडिया वेस्ट 2017 :

 • मिसेस इंडिया ब्युटी पेजंटअंतर्गत खराडी येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत अंजली राऊत हिने ‘मिसेस इंडिया वेस्ट-2017’ चा किताब पटकाविला. मानसी अरबट्टी आणि सोनल मदनानी हिने अनुक्रमे व्दितीय, तृतीय क्रमांक पटकाविला.
 • मिसेस इंडियाच्या संस्थापक आणि माजी मिसेस एशिया इंटरनॅशनल दीपाली फडणीस यांनी सुरू केलेली मिसेस इंडिया ही स्पर्धा विवाहित महिलांसाठी आहे.
 • क्‍लासिक मिसेस इंडिया वेस्ट 2017′ चा किताब रुचिता छेडा यांनी पटकाविला. सुनीता नेमेडे (व्दितीय) नीलम शुक्‍ला (तृतीय) यांनीही यश संपादन केले.

दिनविशेष :

 • 12 मे हा जागतिक परिचारिका दिन आहे.
 • 12 मे 1909 रोजी पुणे येथे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना झाली.
 • प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन 12 मे 1952 मध्ये सुरू झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 मे 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.