Current Affairs of 10 May 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (10 मे 2017)
रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड :
- रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
- सचिवपदी अहमदनगर येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कऱ्हाळे यांची निवड झाली.
- तसेच चेअरमन पदावर डॉ. अनिल पाटील यांना कायम ठेवण्यात आले आहे.
- संस्थेची सर्वसाधारण सभा साताऱ्यातील मुख्यालयात झाली. उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिवपदी कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत यांची तर आष्टा येथील महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास महाडिक यांची माध्यमिक विभागाच्या सहसचिवपदी निवड करण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):
‘गेट वे ऑफ इंडिया’ वर होणार विश्वशांती परिषद :
- भगवान गौतमबुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती गेट वे ऑफ इंडिया येथे 10 मे रोजी साजरी होणार आहे. यासाठी विश्वशांती परिषदेचे आयोजन करण्यात आले असून 17 बौद्ध देशांचे राजदूत हजेरी लावणार आहेत. यानिमित्त काळाघोडा ते गेट वे ऑफ इंडिया अशी विश्व शांतता रॅली काढण्यात येईल.
- केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत विश्वशांती परिषदेचे अध्यक्ष असतील, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.
- श्रीलंकेच्या उच्चायुक्त श्रीमती सरोजा सिरिसेना तसेच थायलंडचे उच्चायुक्त एकापोल पोलपिपट भारतासोबतचे सांस्कृतिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासंबंधीचे विचार मांडणार आहेत.
- तसेच या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिज्जू, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आदी आपले विचार मांडणार आहेत.
भारताच्या झूलन गोस्वामीचा विश्वविक्रम :
- भारताची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हिने महिला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटचा उच्चांक प्रस्थापित केला. तिने ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज कॅथरीन फिट्झपॅट्रीक हिचा 180 विकेटचा विश्वविक्रम मोडला.
- झूलन 34 वर्षांची आहे. ‘महिला क्रिकेटची कपिल देव’ अशी तिची ओळख आहे. दक्षिण आफ्रिकेतील चौरंगी क्रिकेट स्पर्धेत तिने हा टप्पा गाठला.
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिने 20 धावांत तीन विकेट घेतल्या. 153 सामन्यांत तिच्या 181 विकेट झाल्या. कॅथरीनने 109 सामन्यांत 180 विकेट घेतल्या होत्या. कॅथरीनने 2007 मध्ये निवृत्ती घेतली.
- झूलन उजव्या हाताने वेगवान मारा करते. तिने 10 कसोटींमध्ये 40 विकेट घेतल्या आहेत, तर 60 टी-20 सामन्यांमध्ये 50 विकेट मिळविल्या आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये तिचा इकॉनॉमी रेट 3.81 आहे.
दिनविशेष :
- 10 मे हा दिवस महाराष्ट्रामध्ये जलसंधारण दिन म्हणून साजरा करतात.
- 10 मे 1818 मध्ये इंग्रज-मराठे तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
- मराठी कवी माणिक गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांचा जन्म 10 मे 1937 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा