Current Affairs of 9 May 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (9 मे 2017)
चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड :
- चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून, युवराजसिंग, शिखर धवन यांनी पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. आश्विन, रोहित शर्मा आणि शमी यांनी दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केले आहे.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीबरोबर (आयसीसी) सुरू असलेल्या महसूल वाटपाच्या वादात एक पाऊल मागे घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विशेष सर्वसाधारण सभेत भारतीय संघाच्या चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील सहभागावर शिक्कामोर्तब केले होते.
- चॅंपियन्स स्पर्धेसाठी नवी दिल्लीत संघ निवड समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची निवड करण्यात आली.
- भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, युवराजसिंग, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, महंमद शमी.
Must Read (नक्की वाचा):
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मे पासून श्रीलंकेच्या दौऱ्यावर :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्याला 11 मे पासून सुरवात होणार आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यात मोदी हे वेसाक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
- आंतरराष्ट्रीय वेसाक दिनानिमित्त कोलंबोमध्ये 12 ते 14 मे दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचाही समावेश आहे.
- तसेच या परिषदेला शंभर देशांतील सुमारे चारशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. वेसाक हा बौद्ध कालगणनेतील सर्वांत महत्त्वाचा दिवस मानला जातो.
- पंतप्रधान मोदींचा हा श्रीलंकेचा दुसरा दौरा आहे. या दौऱ्यात मोदी कॅंडीलाही भेट देणार आहेत.
प्रा. विशाल यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर :
- आयआयटी मुंबईच्या पृथ्वी विज्ञान विभागामधील सहायक प्राध्यापक विक्रम विशाल यांना, भारतीय राष्ट्रीय विज्ञान संस्थेतर्फे (आयएनएसए) देण्यात येणारा प्रतिष्ठेचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर झाला आहे.
- तरुण वैज्ञानिकांमधील सर्जनशीलता आणि उत्कृष्ठतेचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
- भारतातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनासाठी आयएनएसए ही संस्था दरवर्षी हा पुरस्कार देते. कांस्य पदक आणि 25 हजार रुपये रोख असे हे पुरस्काराचे स्वरूप आहे.
- प्राध्यापक विशाल सध्या कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी करणे आणि नैसर्गिक वायूंच्या माध्यमातून पर्यावरणावरील त्याचा प्रभाव या विषयावर काम करीत आहेत.
सोहेल महमूद पाकचे नवीन उच्चायुक्त :
- भारतातील पाकिस्तानचे नवीन उच्चायुक्त म्हणून सोहेल महमूद यांची नियुक्ती करण्यात आली असून भारताने त्यांना व्हिसाही मंजूर केला आहे.
- सोहेल महमूद हे सध्या तुर्कीत पाकिस्तानचे राजदूत आहेत. ते नवीन पदाची सूत्रे मे अखेर किंवा जूनच्या सुरुवातीला घेणार आहेत.
- अब्दुल बासित यांचा भारतातील तीन वर्षांचा कार्यकाळ संपलेला असल्याने त्यांच्या जागी सोहेल महमूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिनविशेष :
- 9 मे हा विश्व थॅलस्सेमिया दिन आहे.
- 9 मे 1540 रोजी मेवाडचा प्रसिध्द वीरपुरुष ‘महाराणा प्रताप’ यांचा जन्म झाला.
- भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि मराठी समाजसुधारक ‘गोपाळ कृष्ण गोखले’ यांचा जन्म 9 मे 1866 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा