Current Affairs of 13 March 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (13 मार्च 2018)
देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज फडकला :
- देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज किल्ला तलावाजवळ 12 मार्च रोजी फडकविण्यात आला. ध्वजाची उंची 110 मीटर असून, देशातील हा सर्वात उंच ध्वज ठरला आहे. एमएसआरसीच्या जवानांनी वाद्य वाजवून देशभक्तीपर गीत म्हटले आहे. यानंतर ध्वज फडकविला आणि राष्ट्रगीत म्हटले.
- राष्ट्रध्वज लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याला पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी (लिफ्टिंग मशिन्सद्वारे) चालना दिली. एकता आणि अखंडतेचे प्रतिक राष्ट्रध्वज आहे.
- तसेच या स्वरुपाच्या सर्वात उंच ध्वजाची निर्मिती बेळगावात झाली. यामुळे देशाभिमान वाढेल आहे. युवापिढीत देशाप्रती प्रेम निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
- आपला एकच देश आणि एकच धर्म. जाती, धर्मभेदच्या भिंती आड आणू नये. आपण सारे भारतीय आहोत. त्याचा सार्थ अभिमान सर्व भारतीयांनी बाळगायला हवा, असे उद्गार आमदार फिरोझसेठ यांनी काढले.
Must Read (नक्की वाचा):
यूपीमध्ये सर्वात मोठय़ा सौरप्रकल्पाचे लोकार्पण :
- उत्तर प्रदेशातील सर्वात मोठय़ा सौरप्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पण मिर्झापूर जिल्ह्यात छानवे गटात पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केले.
- पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन व त्यांच्या पत्नी ब्रिगेट यांचे येथे स्वागत केले.
- पंतप्रधान मोदी व मॅक्रॉन यांनी एक कळ दाबून सौरप्रकल्पाचे उद्घाटन केले. 75 मेगावॉटचा हा प्रकल्प आहे. त्याचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पात 500 कोटी रुपये खर्च झाले असून फ्रान्सच्या एन्जी या कंपनीने तो उभारला आहे.
- आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजे आयएसएच्या परिषदेत नरेंद्र मोदींनी सांगितले होते की, सौर प्रकल्पांना सवलतीच्या दरात आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे एकूण ऊर्जेत सौरऊर्जेचा वाटा वाढले.
- आयएसएची संकल्पना मोदी यांची असून त्यासाठी 121 देश एकत्र आले आहेत. भारत त्यात 2022 पर्यंत 175 गिगावॅट वीज निर्मिती करणार आहे. सध्याच्या शाश्वत वीजनिर्मिती क्षमतेच्या हे प्रमाण दुप्पट असणार आहे.
- तसेच सौर व पवन ऊर्जेचे दर युनिटला 2.44 रुपये व 3.46 रुपये इतके कमी आहेत, जगात हे दर सर्वात नीचांकी असल्याचा दावा करण्यात आला आहे. आयएसए म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय गुडगाव येथे आहे. पॅरिस जाहीरनाम्यानंतर त्याची स्थापना करण्यात आली होती.
इंडिगोच्या व गो एअरच्या विमानांना उड्डाणबंदी :
- एअरबसच्या ए-320 प्रकारातल्या निओ जातीच्या 11 विमानांना उड्डाण करण्यास नागरी उड्डाण खात्याच्या महासंचालनालयानं बंदी घातली आहे. या विमानांच्या इंजिनांमध्ये दोष असल्यामुळे हा आदेश देण्यात आला आहे. या अकरापैकी आठ विमानं इंडिगोची आहेत तर तीन विमानं गो एअरची आहेत. या कंपन्यांकडे ही दोष असलेली इंजिन असून या दोन्ही विमानकंपन्यांनी ती वापरू नयेत असे नियंत्रकाने सांगितले आहे.
- अहमदाबादवरून लखनौला जाण्यासाठी जेव्हा इंडिगोच्या विमानाने झेप घेतली तेव्हा इंजिन बंद पडल्याचा प्रकार घडला. त्यामुळे सदर विमानाला पुन्हा वळून अहमदाबादमध्येच इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने फेब्रुवारी 9 रोजी या इंजिनांसंदर्भात एक सूचना केली होती. ही इंजिने काहीवेळा बंद पडत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते.
- तसेच त्यावेळी एक इंजिन सदोष असलेल्या अन्य 11 विमानांना मात्र उड्डाणाची मंजुरी देण्यात आली होती. पण नंतर काही विमानांचे इंजिन सारखे बंद पडण्याचे प्रकार घडले. त्यामुळे गेल्या महिन्यात तीन विमानांना उड्डाणास बंदी घालण्यात आली होती, आता आणखी 11 विमानांना बंदी घालण्यात आली आहे.
कॉनराड संगमा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला :
- मेघालयाच्या नवनिर्वाचित कॉनराड संगमा सरकारने मेघालय विधानसभेत विश्वासदर्शक ठराव सहजगत्या जिंकला. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 35, तर विरोधात 20 जणांनी मत नोंदवले. ठरावाच्या मतमोजणीत एक मत बाद ठरले, तर अन्य एक जण गैरहजर होते.
- विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी मतदान केले नाही. विरोधी पक्षनेते मुकुल संगमा यांनी दोन ठिकाणी निवडणूक लढवली होती आणि दोन्ही ठिकाणी विजय मिळवला आहे.
- संगमाप्रणित एमडीए सरकारने सहा मार्चला शपथ घेतली होती. या सरकारमध्ये भाजप आणि अन्य प्रादेशिक पक्षांचा समावेश आहे. सहा बिगर कॉंग्रेस पक्ष आणि एका अपक्ष आमदारांनी मेघालय डेमोक्रॅटिक आघाडीची निर्मिती केली आहे.
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन चीनला भेट देणार :
- संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या पुढील महिन्यात चीनला भेट देणार आहेत. डोकलामच्या तिढय़ानंतर दोन्ही देशांच्या संबंधांत आलेल्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर ही भेट महत्त्वाची राहणार आहे.
- एप्रिल महिनाअखेर आपण चीनला जाण्याची शक्यता असल्याचे सीतारामन यांनी पत्रकारांना सांगितले, मात्र तेथील बैठकीचा विषय काय राहील याचा तपशील त्यांनी दिला नाही.
- भारत व चीनच्या सैन्यात डोकलाम येथे उद्भवलेला 73 दिवसांचा तिढा संपवण्याचा निर्णय दोन्ही देशांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये घेतला होता. या भांडणामुळे दोन्ही देशांचे संबंध बरेच तणावाचे झाले आहेत.
- दोन्ही सैन्यांनी या ठिकाणाहून माघार घेतली असती, तरी या मुद्दय़ाचा दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम झाला आहे.
भारत शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणारा देश :
- ‘मेक इन इंडिया’ मोहीमेअंतर्गत भारताला शस्त्रास्त्रनिर्मितीत अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. भारताला शस्त्रास्त्रांसाठी अजूनही दुसऱ्यांवर देशांवर अवलंबून राहावे लागत आहे.
- 2013 ते 2017 या कालावधीत शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणाऱ्या देशांच्या यादीत भारत अव्वलस्थानी आहे. जगातील शस्त्रास्त्रांच्या एकूण आयातीपैकी 12 टक्के आयात एकटा भारत करतो.
- इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (आयपीआरआय) या संस्थेने जगभरातील देशांकडून होणाऱ्या शस्त्रास्त्र खरेदीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात 2008 ते 2012 च्या तुलनेत 2013 ते 2017 या कालावधीत भारताच्या शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
- भारत जगभरात शस्त्रास्त्रांची आयात करणाऱ्या देशांमध्ये अव्वल स्थानी आहे. भारताच्या पाठोपाठ सौदी अरेबिया दुसऱ्या स्थानी आहे. तर इजिप्त, संयुक्त अरब अमिरात हे देश अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
- चीन, ऑस्ट्रेलिया हे देश पाचव्या व सहाव्या स्थानी आहे. तर अल्जेरिया सातव्या, इराक आठव्या आणि पाकिस्तान नवव्या स्थानी आहे.
दिनविशेष :
- ‘विल्यम हर्षेल’ यांनी 13 मार्च 1781 रोजी युरेनसचा शोध लावला.
- प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म 13 एप्रिल 1893 मध्ये झाला.
- सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना सन 1897 मध्ये 13 मार्च रोजी झाली.
- मदार तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची 13 मार्च 1997 रोजी निवड करण्यात आली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा