Current Affairs of 14 March 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (14 मार्च 2018)

चालू घडामोडी (14 मार्च 2018)

प्लॅस्टिकमुक्त देशासाठी सागरमित्र झटणार :

  • शहरदेश प्लॅस्टिकमुक्त करण्याच्या चळवळीत लहान मुलांना सहभागी करून घेण्यासाठी ‘सागर मित्र’ ही संस्था कार्यरत आहे.
  • द ॲकॅडमी ॲडव्हायजरीमार्फत (टीएए) या संस्थेने 2011 पासून हा उपक्रम सुरू केला आहे. प्रारंभी एका शाळेतील दीडशे मुलांना एकत्रित घेऊन या उपक्रमाची सुरवात झाली. पाण्याच्या माध्यमातून पृथ्वीशी असलेले नाते जोडण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जात आहे. शहरा-शहरांतून, गावा-गावांतून शेकडो टन प्लॅस्टिक कचरा अप्रत्यक्षरीत्या नदीमध्ये जाते.
  • नदीमार्फत लाखो टन प्लॅस्टिक समुद्रात जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या 2016 मध्ये झालेल्या एक बैठकीत समुद्रातील चारपैकी एका माशांच्या पोटात प्लॅस्टिक आढळून येत असल्याचे संशोधन समोर आले.
  • तसेच तेव्हापासून या प्रश्‍नाचे गांभीर्य लक्षात येण्यास सुरवात झाली. ‘टीएए’मार्फत 2013 पासून सुरू असलेल्या हा उपक्रम ‘सागर मित्र’ म्हणून ओळखला जाऊ लागला आणि पुढे त्याच नावाने संस्थेचे कामकाज सुरू झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 मार्च 2018)

‘आधार’ लिंकच्या मुदतीत अनिश्चित काळासाठी वाढ :

  • शासनाच्या विविध सेवा-सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात येत आहे. यासाठी यापूर्वी 31 मार्च ही मुदत निश्चित करण्यात आली. मात्र, आता या मुदतीत वाढ करण्यात आली असून, ही मुदत अनिश्चित काळासाठी वाढविण्यात येत असल्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.
  • आधारकार्ड लिंक करण्याची मुदत वाढविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 13 मार्च रोजी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान आधारकार्ड लिंक करण्याची मुदत पुढील सुनावणी होईपर्यंत वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • तसेच यापूर्वी आधारकार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती. आर्थिक तसेच इतर कोणत्याही व्यवहारांसाठी आधारकार्ड लिंक करणे सरकारने बंधनकारक केले आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद चांदेकर यांचे निधन :

  • विनोदांनी रसिकांना खळखळून हसविणारे ‘हसरी उठाठेव’ फेम ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद चांदेकर (वय 70) यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत 13 मार्च रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने 12 मार्च रोजी त्यांचे डोंबिवलीत निधन झाले.
  • चांदेकर यांचे पार्थिव टिळक स्मारक मंदिर येथे काही वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी साहित्य, नाट्य आणि एकपात्री क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
  • अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन आदींचा त्यात समावेश होता.
  • मॉडर्न हायस्कूलमध्ये कलाशिक्षक असणाऱ्या चांदेकर यांनी आर्केस्ट्रामधून कलेच्या दुनियेत पाऊल ठेवले. मिमिक्री कलाकार म्हणून सुरवात करणाऱ्या चांदेकर यांना ‘हसरी उठाठेव’ या त्यांच्या एकपात्री नाटकाने खरी ओळख मिळवून दिली. त्याचे ऑस्ट्रेलिया, इस्राईलमध्येही दौरे झाले होते.

शिवाजी विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा :

  • शिवाजी विद्यापीठाचा 54 वा दीक्षान्त सोहळा 19 मार्च रोजी विक्रम साराभाई डिस्टिंग्विश्‍ड, इस्रोचे प्रोफेसर ए.एस. किरणकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यंदाचे राष्ट्रपती सुवर्णपदकासाठी कोल्हापुरातील प्रियंका राजाराम पाटील; तर कुलपतीपदकासाठी सातारा येथील दीक्षा विजय मोरे यांची निवड केली.
  • लोककला केंद्रात सकाळी 11 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात 24 हजार 245 स्नातकांना पदव्या बहाल करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिली.
  • दीक्षान्त सोहळ्यानिमित्त 1920 ला ग्रंथमहोत्सवासह सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमास इस्रो इंडियन स्पेस रीसर्चचे अध्यक्ष ए.एस. किरणकुमार यांची उपस्थिती राहणार आहे.
  • किरणकुमार हे भारतीय अवकाश शास्त्रज्ञ (इंडियन स्पेस सायंटिस्ट) म्हणून सुपरिचित आहेत. ‘चंद्रयान, मंगळयान’ याचबरोबर परदेशांत अनेक महत्त्वाच्या वैज्ञानिक साधनांचा विकास केला. 2014 मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री‘ पुरस्काराने सन्मानित केले. संशोधनपर लेख प्रसिद्ध करून त्यांनी या क्षेत्रासाठी ज्ञाननिर्मिती केली आहे.

सौरमालेजवळ पंधरा नवीन बाग्रहांचा शोध :

  • टोकियो इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने सौरमालेजवळ पंधरा नवीन बाह्यग्रह सापडल्याची घोषणा केली असून, त्यातील एका ग्रहावर पृथ्वीप्रमाणेच द्रवरूपात पाणी असण्याची शक्यता आहे.
  • तांबडय़ा लहान बटू ताऱ्यांभोवती हे ग्रह फिरत असून या संशोधनामुळे ग्रहांच्या निर्मिती प्रक्रियेवर नवा प्रकाश पडणार आहे. लालबटू ताऱ्यांपैकी के 2-155 हा तारा पृथ्वीपासून दोनशे प्रकाशवर्षे दूर आहे.
  • तसेच त्याच्या भोवती महापृथ्वीसारखे तीन ग्रह फिरत असून ते पृथ्वीपेक्षा मोठे आहेत. ताऱ्याभोवती सर्वात बाहेरच्या कक्षेत असलेल्या ग्रहाचे नाव के 2-155 डी असे ठेवण्यात आले आहे. तो गोल्डीलॉक झोन म्हणजे वसाहतयोग्य पट्टय़ात आहे.
  • तेरुयुकी हिरानो यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले असून, नासाच्या केप्लर दुर्बिणीने दुसऱ्या मोहिमेत मिळवलेल्या माहितीच्या आधारे हे पंधरा ग्रह शोधण्यात आले आहेत. या संशोधकांनी स्पेनमधील नॉर्डिक ऑप्टिकल टेलिस्कोप व हवाई येथील सुबारू टेलिस्कोप यांच्या मदतीने पृथ्वीवरून निरीक्षणे केली.

एसबीआयने बंद केली 41.16 लाख बचत खाती :

  • स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने 41.16 लाख बचत खाती बंद केली आहेत. 1 एप्रिल ते 31 जानेवारी या कालावधीत ज्या खात्यांना मिनिमम बॅलन्सही ठेवता आलेला नाही अशी ही खाती आहेत. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे.
  • गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात महिन्याचा मिनिमम बॅलन्स न ठेवणाऱ्या किंवा मिनिमम बॅलन्सपेक्षा कमी रक्कम ठेवणाऱ्या बचत खात्यांसाठी दंडाचे शुल्क कमी केले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात दंडाचे हे शुल्क आणखी कमी केले होते. तरीही मिनिमम बॅलन्सपेक्षा कमी रक्कम किंवा रक्कमच नाही अशी सुमारे 41.16 लाख बचत खाती एसबीआयने बंद केली आहेत.
  • एसबीआयमध्ये सुमारे 41 कोटी बचत खाती आहेत. ज्यापैकी 16 कोटी बचत खाती ही प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत येतात. प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत येणाऱ्या बचत खाती, सेवानिवृत्त लोकांची बचत खाती, अल्पवयीन बचत खाती यांना मिनिमम बॅलन्सच्या अटीतून सूट देण्यात आली आहे.
  • तर 13 मार्चपासून स्टेट बँकेने बचत खातेदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ठराविक शिल्लक अर्थात मिनिमम बॅलन्सपेक्षा आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत 75 टक्के कपात करण्यात आली आहे.
  • 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या नव्या निर्णयाचा फायदा एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांना होणार आहे.

दिनविशेष :

  • 14 मार्च 1879 रोजी नोबेल पारितोषिक विजेते जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ‘अल्बर्ट आईनस्टाईन’ यांचा जन्म झाला.
  • पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये 14 मार्च 1931 रोजी प्रदर्शित झाला.
  • 14 मार्च 1954 मध्ये दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.
  • ‘ब्लॅकबेरी लिमिटेड’चे संस्थापक माईक लाझारीडीस यांचा जन्म 14 मार्च 1961 रोजी झाला.
  • 14 मार्च 1998 हा दिवस प्रख्यात अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक दादा कोंडके यांचा स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.