Current Affairs of 13 February 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (13 फेब्रुवारी 2018)
जगातील श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबई 12 व्या स्थानी :
- जगातील टॉप 15 श्रीमंत शहरांमध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश झाला आहे. मुंबईची संपत्ती 950 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून या यादीत अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर अव्वल स्थानी आहे.
- ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ या संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झाला असून यात जगातील श्रीमंत शहरं आणि अब्जाधीशांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
- तसेच या यादीत मुंबई 12 व्या स्थानी आहे. तर न्यूयॉर्क पहिल्या स्थानी आहे.
- न्यूयॉर्कची संपत्ती सुमारे तीन लाख कोटी डॉलरच्या घरात आहे. तर 2.7 लाख कोटी डॉलरची संपत्ती असलेले लंडन दुसऱ्या स्थानी आहे. 2.5 लाख कोटी डॉलरची संपत्ती असलेले टोकियो तिसऱ्या आणि 2.3 लाख कोटी डॉलर्सची संपत्ती सॅन फ्रान्सिस्को चौथ्या स्थानी आहे. चीनमधील बिजिंग हे शहर 2.2 लाख कोटी डॉलरसह पाचव्या स्थानी आहे.
Must Read (नक्की वाचा):
स्टीव्हन स्मिथ अॅलन बोर्डर पदकाचा मानकरी :
- ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने प्रतिष्ठेचे अॅलन बोर्डर पदक जिंकले आहे. तसेच त्याने दुसऱ्यांदा या पदकावर नाव कोरले आहे.
- माजी क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सर्वोकृष्ट फलंदाज गणल्या जाणाऱ्या स्मिथला 246 मते पडली आहे.
- तर त्याने दोन वेळचा पदक विजेता सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (162 मते) आणि फिरकीपटू नॅथन लियॉनला (156 मते) मागे टाकले आहे.
- ऑस्ट्रेलियाचा यंदाचा वर्षांतील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळवलेल्या स्मिथने 2015 मध्ये बोर्डर पदक जिंकले होते.
महाजन यांचा नऊवारी नेसून स्काय डायव्हिंग करण्याचा विक्रम :
- भारतीय स्काय डायव्हर शीतल महाजन यांनी थायलंडमध्ये मराठमोळी नऊवारी नेसून 13 हजार फुटावरून विमानातून उडी घेऊन नवा विक्रम नोंदविला आहे.
- तसेच शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग (पॅराजम्पर) या साहसी खेळात आतापर्यंत 17 राष्ट्रीय व 6 जागतिक विक्रम केले आहेत.
- तर मराठी संस्कृतीचे जतन व्हावे, तसेच मराठी बाणा कायम राहावा, याकरिता नऊवारी साडी परिधान करून त्यांनी हा विक्रम केला आहे.
- शीतल महाजन यांनी सातही खंडांवरून पॅराशूट जम्प केल्या आहेत. तर जगातील सातही खंडांतील विविध ठिकाणांवर त्यांनी स्काय डायव्हिंग केले आहे.
- तसेच उत्तर ध्रुव (आर्क्टिक) आणि दक्षिण ध्रुव (अंटार्क्टिका) आणिभारत व फिनलॅन्ड, अमेरिका, स्पेन, ऑस्ट्रेलिया, युरोप, साउथ आफ्रिका, साउथ अमेरिका येथे त्यांनी पॅराशूट जम्प केलेल्या आहेत.
शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा :
- राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्काराची घोषणा केली आहे.
- राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा करतानाच तिन्ही वर्षातील पुरस्कारपात्र खेळाडूंना 17 फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडिया येथे राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात येईल, असेही सांगितले आहे.
- क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणार्या खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
- अरुण दातार या पुणेकरांसह कोल्हापूरच्या बिभीषण पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
ओमान-भारत यांच्यात झाले 8 करार :
- पंतप्रधान मोदींनी सय्यद असद यांच्याशी आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार्यावर चर्चा करून दोन्ही देशांत ऊर्जा, वाणिज्य, गुंतवणूक, पर्यटन यांसह 8 क्षेत्रांत करार झाले आहेत.
- तसेच मोदी यांनी मस्कतमध्ये मोदींनी मोतीश्वर मंदिरात पूजा केली. हे मंदिर 125 वर्षे जुने आहे.
- तर ओमानमधील मंदिरात जाणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.
- 1999 मध्ये गुजरातमधील व्यापारी समुदायाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
दिनविशेष :
- 13 फेब्रुवारी : जागतिक रेडीओ दिन
- 1668 : स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
- 1960 : फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.
- 1766 : प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचा जन्म.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा