Current Affairs of 14 February 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (14 फेब्रुवारी 2018)
संरक्षण मंत्रालयाची अॅसॉल्ट रायफल्सच्या खरेदीला मंजुरी :
- संरक्षण मंत्रालयाने 7.40 लाख अॅसॉल्ट रायफल्सच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. लष्कर, नौदल आणि वायुसेना यातील सैनिकांसाठी या रायफल्स खरेदी केल्या जाणार आहेत.
- तसेच या संदर्भातल्या प्रस्तावाला 13 फेब्रुवारी रोजी मंजुरी देण्यात आली. या रायफल्सची किंमत 12,280 कोटी इतकी असल्याचे संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
- संरक्षण विभागाची एक बैठक संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 1,819 कोटींच्या लाईट मशीन गन्सही विकत घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत स्नाईपर रायफल्सबाबतही चर्चा झाली.
- 5719 स्नाईपर रायफल्सच्या खरेदीलाही मंजुरी देण्यात आली आहे. या स्नाईपर रायफल्सची किंमत 982 कोटी रुपये असल्याचीही माहिती समोर आली आहे.
Must Read (नक्की वाचा):
भारताचा द. आफ्रिकेत ऐतिहासिक मालिका विजय :
- रोहित शर्माने केलेली शतकी खेळी आणि त्यानंतर भारतीय फिरकीने उडवलेली यजमानांची दाणादाण याच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.
- भारताने 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 73 धावांनी पराभव केला. रोहितच्या शतकी खेळीनंतर कुलदीपने चार गडी बाद करत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी केली.
- भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या 115 धावांच्या खेळीच्या जोरावर 7 बाद 274 धावा केल्या. विजयासाठी 275 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडाली.
- एकवेळ विजयाची आशा बाळगलेल्या दक्षिण आफ्रिकेचा डाव 201 धावांत संपुष्टात आला. रोहित शर्मा सामन्याचा मानकरी ठरला.
‘टीटीपी’चा उपप्रमुख खालिद मेहसूद ड्रोन हल्ल्यात ठार :
- तेहरिक-ई-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेचा उपप्रमुख खालिद मेहसूद ऊर्फ सजना 8 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या ईशान्येकडील आदिवासी भागात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात मारला गेल्याच्या वृत्ताला या संघटनेने दुजोरा दिला.
- खालिद मेहसूद हा ड्रोन हल्ल्यात ठार झाल्याच्या वृत्ताची आम्ही पुष्टी करतो, असे तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद खुरासानी याने पत्रकारांना पाठवलेल्या संदेशात सांगितले.
- तसेच तालिबानचा प्रमुख मुल्ला फझलुल्ला याने कमांडर मुफ्ती नूर वली याला त्याचा नवा उपप्रमुख म्हणून नियुक्त केले असल्याचीही माहिती त्याने दिली.
राज्याचे 11 प्रकल्प केंद्राकडून मंजूर :
- नरेंद्र मोदी सरकारने तीन वर्षांत महाराष्ट्रातील 11 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
- केंद्रीय पर्यावरण व वन खात्याने वर्षानुवर्षे हिरवा कंदील न दिल्याने या प्रकल्पांचे घोंगडे भिजत पडले होते. या प्रकल्पांना प्रत्येकी 5 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.
- रस्तेबांधणी, रेल्वे, पोलाद, ऊर्जा, कोळसा, नदीखोरे, पायाभूत सुविधा या क्षेत्रांशी संबंधित 68 महत्त्वाच्या प्रकल्पांना गेल्या 10 वर्षांपासून केंद्रीय पर्यावरण व वन खात्याने मंजुरीच दिलेली नव्हती. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 11 प्रकल्प महाराष्ट्रातील होते. त्या खालोखाल गुजरात (8), आंध्र प्रदेश (7), तेलंगणा (5) व अन्य राज्यांतील प्रकल्पांचा समावेश होता.
- विविध विकास प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण व वन खात्याची त्वरेने परवानगी मिळावी, म्हणून त्या खात्याचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी त्यासाठी ऑनलाइन प्रक्रियाही सुरू केली आहे.
आयसीसीच्या पहिल्या महिला संचालक इंद्रा नूयी :
- ‘पेप्सिको’च्या अध्यक्ष आणि सीईओ इंद्रा नूयी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलच्या (आयसीसी) पहिल्या महिला स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- इंद्रा नूयी या जून महिन्यापासून आयसीसीच्या संचालकपदाचा स्वतंत्र कार्यभार स्वीकारतील.
- आयसीसीने जून 2017 मध्ये स्वतंत्र संचालकपदाच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर सहमती दर्शवली होती. या प्रस्तावातील ‘स्वतंत्र कार्यभार एका महिलेच्या हाती सोपवण्यात यावा’ ही अटही आयसीसीने मान्य केली होती. नूयी यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे. असे असले तरी, त्यांची पुनर्नियुक्तीही केली जाऊ शकते.
दिनविशेष :
- भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची 14 फेब्रुवारी 1881 रोजी कोलकाता येथे स्थापना झाली.
- संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना 14 फेब्रुवारी 1924 रोजी करण्यात आली.
- बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण सन 1946 मध्ये 14 फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
- 14 फेब्रुवारी 2000 रोजी अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा