Current Affairs of 12 February 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (12 फेब्रुवारी 2018)
रोहन मोरेने केला असोसिएशन सेव्हन खाडी पार करून विक्रम :
- पुण्याचा अव्वल जलतरणपटू रोहन मोरेने न्यूझीलंडची कुकस्ट्रेट खाडी (चॅनेल) 8 तास 37 मिनिटांत पार करून नवा आशियाई उच्चांक नोंदवला आहे.
- न्यूझीलंडच्या दक्षिण व उत्तर बेटामधील ही 26 किलोमीटर अंतराची खाडी पार करताना जगामधील अवघड सात समुद्र (असोसिएशन सेव्हन चॅलेंज) पार करणारा तो आशियामधील व भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ठरला आहे.
- तर रोहन मोरेने जगामधील नववा जलतरणपटू म्हणून मान मिळवला आहे.
- तसेच वयाच्या 11 व्या वर्षी रोहनने पहिली धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया ही 35 किलोमीटरची खाडी 7 तास 29 मिनिटांत पार केली होती.
- तसेच रोहनला लंडनमध्ये 31 मार्च रोजी ‘हॉल ऑफ फेम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
आता टॅक्सी-रिक्षांमध्येही ‘क्यूआर’ कोड :
- शहरातील अनधिकृत रिक्षा-टॅक्सींवर कारवाई करण्यासाठी ‘क्यूआर’ कोड बसविण्याच्या निर्णयाला राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.
- या ‘क्यूआर’ कोडमुळे प्रवाशांना रिक्षा-टॅक्सीच्या परवानाधारकासह अन्य माहिती उपलब्ध होणार आहे.
- तर हा ‘क्यूआर’ कोड लावण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना 50 रुपये मोजावे लागणार आहेत.
- मीटरपेक्षा जास्त पैसे घेणे, रात्री उशिरा प्रवास करणार्या महिला प्रवाशांची सुरक्षितता आणि अधिकृत व अनधिकृत रिक्षा टॅक्सीची ओळख पटविण्यासाठी ‘क्यूआर’ कोड तयार करण्याच्या निर्णयाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.
मराठी अभियंत्याने पटकावला ‘ऑस्कर’ :
- विकास साठ्ये यांना कॅमेरा तंत्र विकसित करण्यासाठी ऑस्कर सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
- ‘के1 शॉटओव्हर’ या कॅमे-याची निर्मिती करण्यात मोलाचा वाटा उचणारे साठ्ये यांना 90व्या ऑस्कर अकॅडमी अवॉर्डच्या सायंटिफिक अँड टेक्निकल पुरस्काराने लॉस एंजेलिस येथे गौरविण्यात आले आहे.
- अकॅडमी ऑफफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या निवड समितीने साठ्ये यांच्यासोबत या कॅमे-यावर काम करणारे जॉन कॉयल, ब्रॅड हर्नडेल आणि शेन बकहॅम या तिघांचीही पुरस्कारासाठी निवड केली होती.
भारतीय महिलांनी 2-0 ने जिंकली मालिका :
- मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने दौऱ्यात यजमान दक्षिण अफ्रिकेविरुद्धची तीन वनडे सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली आहे.
- यजमान दक्षिण अफ्रिकेने मालिकेतील शेवटच्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यात भारतावर मात केली आहे.
- वेदा कृष्णमूर्ती (56) आणि दीप्ती शर्मा (79) यांच्या झंझावाती अर्धशतकाच्या बळावर भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करताना अफ्रिकेसमोर विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
दिनविशेष :
- 12 फेब्रुवारी : जागतिक महिला आरोग्य दिन
- 1976 : पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.
- 2003 : आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
- 1824 : संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा