Current Affairs of 11 February 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (11 फेब्रुवारी 2018)

चालू घडामोडी (11 फेब्रुवारी 2018)

दिवंगत पित्याच्या संपत्तीत सावत्र मुलाला हक्क नाही :

 • मृत्युपत्र न करता मरण पावणा-या हिंदू पुरुषाच्या मालमत्तांचे मरणोत्तर वाटप करताना, त्या व्यक्तीचा सावत्र मुलगा इतर कुटुंबीयांसोबत संपत्तीत वाटा मागू शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
 • ‘हिंदू वारसा हक्क कायद्या’चे कलम 8 आणि त्यानुसार वाटपासाठी कुटुंबीयांची दोन गटांत वर्गवारी करणारे परिशिष्ट याचा अर्थ लावून न्या. एस. सी. गुप्ते यांनी हा निकाल दिला आहे.
 • एका दिवंगत हिंदू पुरुषाच्या संपत्तीचे मरणोत्तर वाटप करण्यासाठीचा दावा न्यायालयात गेली 17 वर्षे प्रलंबित आहे.

जगातील सर्वात मोठ्या मंदिरासाठी भारतातून पाठवले 13,499 दगड :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. यात अबु धाबीचा देखील समावेश आहे. अबु धाबीत जगातील सर्वात मोठ्या मंदिराची मोदी आधारशिला ठेवतील. या मंदिराच्या डिझाइन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी स्वामीनारायण संस्थेला सोपविण्यात आली आहे. या समुदायाचे मंदिर जगभरात आहेत.
 • त्यामध्ये अमेरिकेतील न्यू जर्सी येथील मंदिर जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातून याला सर्वात मोठे हिंदू मंदिर म्हटले जाते. या मंदिराच्या बांधकामासाठी भारतातून 13,499 दगड न्यू जर्सीला पाठवण्यात आले होते. त्यावर नक्शीकाम झाले होते.

दक्षिण आफ्रिकेचा भारतावर पाच गडी राखून विजय :

 • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अँडीला फ्लिकुद्द्वे आणि हेन्रिच क्लासेनच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला आहे.
 • तर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 290 धावांचे आव्हान ठेवले होते.
 • तसेच या सामन्यात अँडीला फ्लिकुद्द्वेने अवघ्या पाच चेंडूत तीन षटकार एक चौकर लगावत नाबाद 23 धावा केल्या, तर हेन्रिच क्लासेनने नाबाद (43), मिलर (39) आणि ड्युमिनीने 10 धावा केल्या.
 • भारताकडून गोलंदाज कुलदीप यादवने दोन बळी टिपले तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी एक बळी घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पॅलेस्टाइन दौऱ्यात ‘ग्रँड कॉलर’ने सन्मान :

 • भारत आणि पॅलेस्टाइनमध्ये परस्पर चांगले राजकीय संबंध राखण्यात महत्वाचे योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांना पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या हस्ते ‘ग्रँड कॉलर ऑफ दि स्टेट ऑफ पॅलेस्टाइन’ या सन्मानाने गौरविण्यात आले.
 • तर पॅलेस्टाइनमध्ये आलेल्या राजांना, देशाच्या किंवा सरकारांच्या प्रमुखांना तसेच त्यांच्या समकक्ष पद भूषवणाऱ्या परदेशी पाहुण्यांना दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे.
 • तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत ज्यांनी पॅलेस्टाइनला अधिकृत भेट दिली आहे.
 • यापूर्वी पॅलेस्टाइनकडून सौदी अरेबियाचे राजे सलमान, बहारिनचे राजे हमद, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांसारख्या राष्ट्रप्रमुखांना ‘गॅँड कॉलर’ या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

दिनविशेष :

 • 660 : सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले.
 • 1818 : इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.
 • 1826 : लंडन विद्यापीठाची स्थापना.
 • 1990 : 27 वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World