Current Affairs of 12 October 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (12 ऑक्टोबर 2016)
न्यूझीलंड विरुद्ध भारताचा कसोटी मालिका विजय :
- टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातही 3-0 असा मोठा विजय मिळविला.
- तसेच त्याबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल नंबर स्थानही मिळविले.
- न्यूझीलंड फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेल्या अश्विनने दुसऱ्या डावात सात फलंदाज बाद करण्याचा पराक्रम केला.
- आश्विन हा ‘सामनावीर’ व ‘मालिकावीर’ ठरला. भारताने हा सामना 321 धावांनी जिंकला.
- भारताने निर्विवाद वर्चस्व मिळवलेला सामना कालच्या स्थितीमुळे पाचव्या दिवसापर्यंत चालेल, अशी शक्यता होती; परंतु पुजाराचे चमकदार शतक व गंभीरच्या वेगवान अर्धशतकामुळे भारताने दुसरा डाव 3 बाद 216 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडला 475 धावांचे आव्हान दिले.
- चहापानापर्यंत एक फलंदाज गमावलेल्या न्यूझीलंड फलंदाजांनी अखेरच्या सत्रात शरणागती स्वीकारली.
- आर. अश्विनने दोन्ही डावांत मिळून 13 फलंदाज बाद केले.
Must Read (नक्की वाचा):
राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक :
- 62 व्या एसजीएफआय आंतरशालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत 19 वर्षां खालील मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक जिंकले.
- केरळ संघाने रौप्य व तामिळनाडू संघाने कांस्यपदक मिळविले.
- महाराष्ट्र संघातील समीर इनामदार हा पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी येथील एसएनबीपी महाविद्यालयात बारावीमध्ये शिकत आहे.
- तसेच यापूर्वी 2014 मध्ये तामिळनाडूमध्ये रौप्य, 2015 मध्ये हैदराबाद येथील नालगौडामध्ये सुवर्णपदक व आता तेलंगणा येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
- महाराष्ट्र संघ पुढीलप्रमाणे सुयोग वाघ (अहमदनगर), शैलेश द्रविड (नागपूर), समीर इनामदार (पिंपरी-चिंचवड), हर्ष घाग (मुंबई), अमेय मुनेमाने (पुणे).
- पहिल्या फेरीत महाराष्ट्र संघाने गोवा संघास 4-0 पराभूत केले.
- दुसऱ्या फेरीत कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्राने 2.5-1.5 असा विजय मिळवला.
- तिसऱ्या फेरीत महाराष्ट्र संघाने गुजरातला 3.5-0.5 गुण हरविले.
- अंतिम सामन्यात महाराष्ट्र व तामिळनाडू सामना 2-2 असा अनिर्णित राहिला.
तेलंगणा राज्यात 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती :
- राज्यनिर्मितीनंतर दोन वर्षांनी मोठे प्रशासकीय बदल करताना तेलंगणा सरकारने 11 ऑक्टोबर रोजी 21 नव्या जिल्ह्यांची निर्मिती केली.
- तसेच राज्यातील जिल्ह्यांची संख्या आता 31 झाली आहे.
- तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) 2014 मध्ये निवडणुकीदरम्यान नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचे आश्वासन दिले होते.
- जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक आणि इतर सरकारी कार्यालये सुरू होण्यासह नव्या जिल्ह्यांचे कामकाज सुरू झाले.
समाजसेविका परमेश्वर गोदरेज यांचे निधन :
- गोदरेज ग्रुपचे अध्यक्ष आदि गोदरेज यांच्या पत्नी आणि समाजसेविका परमेश्वर गोदरेज यांचे 10 ऑक्टोबर रोजी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
- परमेश्वर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही काळापासून त्या फुफ्फुसांच्या आजारावर उपचार घेत होत्या.
- परमेश्वर गोदरेज यांनी एचआयव्ही एड्स असलेल्या रुग्णांसाठी विशेष कार्य केले होते. त्यांनी 2004 साली या रुग्णांसंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी हॉलिवूड अभिनेते रिचर्ड गेअर यांच्यासोबत ‘हिरोज प्रोजेक्ट‘ सादर केला होता.
- तसेच या प्रकल्पाला बिल गेट्स आणि क्लिंटन यांच्या स्वयंसेवी संस्थांचा हातभार लागला होता.
सॅमसंग ‘गॅलेक्सी नोट 7’चे उत्पादन कायमचे बंद :
- सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आपले प्रचलित उत्पादन ‘गॅलेक्सी नोट 7’चे उत्पादन आणि विक्री कायमची थांबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वॉल स्ट्रीट जर्नल वृत्तपत्रातर्फे देण्यात आली आहे.
- खराब दर्जामुळे अनेक स्मार्टफोन माघारी बोलविण्यात आल्याने ब्रँडच्या प्रतिष्ठेला धक्का पोचला आहे.
- स्मार्टफोनचे उत्पादन तात्पुरते थांबविण्याची घोषणा केल्यानंतर आता कंपनीने त्याची विक्री बंद करणार असल्याचे सांगितले आहे.
- आयफोनला स्पर्धा देणारा स्मार्टफोन वापरताना ओव्हरहिटींग आणि बॅटरी ड्रेनेजची अडचण आल्याने अनेक ग्राहकांना डिव्हाईस बदलून देण्यात आले होते.
- परंतु बदलून देण्यात आलेल्या डिव्हाईसमध्येदेखील हीच समस्या आढळून येत होती.
- काही डिव्हाईसेसना आग लागल्याची घटना घडल्यानंतर गेल्या महिन्यात कंपनीने 25 लाख गॅलेक्सी नोट माघारी बोलाविण्याची घोषणा केली होती.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा