Current Affairs of 13 October 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (13 ऑक्टोबर 2016)

चालू घडामोडी (13 ऑक्टोबर 2016)

विष्णुदास भावे यांना नाट्य गौरव पदक पुरस्कार जाहीर :

 • अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने दिले जाणारे ‘विष्णुदास भावे नाट्य गौरव पदक’ यंदा ज्येष्ठ अभिनेते, नाटककार जयंत सावरकर यांना जाहीर करण्यात आले आहे.
 • तसेच येत्या 5 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते हे पदक त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
 • समितीचे अध्यक्ष डॉ. कराळे म्हणाले की, प्रतिवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलाकारास ‘विष्णुदास भावे गौरव पदका’ने सन्मानित करण्यात येते.
 • यंदाचे 51 वे पदक जयंत सावरकर यांना जाहीर करण्यात आले आहे.
 • रंगभूमी क्षेत्रातील हे मानाचे पदक असून, आजवर बालगंधर्व, केशवराव दाते, आचार्य अत्रे यांच्यापासून ते विक्रम गोखले यांच्यापर्यंत अनेक दिग्गज रंगकर्मी, नाटककार, लेखकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 • गौरवपदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि 11 हजार रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

डिजिटल महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी योजना :

 • डिजिटल धारावी अंतर्गत तेथील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळवून देणे, उद्योजकता वाढविणे, राज्यभर 25 सिस्को नेटवर्क अकॅडमीची उभारणी, ब्रॉडबॅन्ड सुविधांची निर्मिती, नागपूर येथे स्मार्ट सिटी प्रकल्पास सहकार्य व फेटरी (जि.नागपूर) या गावात वायफाय, स्मार्ट एज्युकेशन व स्मार्ट हेल्थकेअर सुविधा उभारणे आदींसाठी सिस्को कंपनी सहकार्य करणार आहे.
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12 ऑक्टोबर रोजी येथे आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती दिली. यावेळी त्यांनी धारावी व फेटरीतील विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मनमोकळा संवाद साधला.
 • शासनाचे महाराष्ट्रातील प्रत्येक गाव नेटवर्कने जोडण्याचे नियोजन असून, महाराष्ट्र हे ‘डिजीटल इंडिया’च्या अंमलबजावणीत अग्रेसर राज्य ठरेल. ‘सिस्को’च्या पुणे येथील प्रकल्पाचे ई-उद्घाटन यावेळी झाले.
 • नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान सचिव अरुणा सुंदरराजन, सिस्को सिस्टीमचे मुख्य कार्यकारी अधिकारी चक रॉबिन्स, सिस्को इंडियाचे अध्यक्ष दिनेश मलकानी आदी यावेळी उपस्थित होते.
 • नागरिकांना शासनाच्या सर्व सेवा सहजपणे मिळाव्यात यासाठी नागपूर जिल्हा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे, आता राज्यातील सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्यात येतील. त्यामुळे खेड्यातही आरोग्य व शिक्षणाच्या उत्तम सुविधा मिळतील.

कसोटी क्रमवारीत अश्विन प्रथम स्थानी :

 • न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगीरी करत 30 बळी मिळवणारा आर. अश्विन कसोटी क्रमवारी अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.
 • आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार अश्विनने तिसऱ्या क्रमांकवूर पहिल्यास्थावर झेप घेतली आहे. त्याच्या नावावर आता 900 गुण आहेत.
 • 38 कसोटी सान्यात अश्विनने 7 वेळा सामनावीर पुरस्कार आपल्या नावावर केला आहे.
 • विशेष म्हणजे आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूमध्येही आर.अश्विन प्रथम क्रमांकावर आहे.
 • गोलंदाजी क्रमवारीत अश्विननंतर द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन (878) तिसऱ्या क्रमांकावर इंग्लडचा जेम्स अँडरस्न (870) आहे.
 • गोलंदाजीमध्ये 10 टेनमध्ये रविंद्र जाडेजालाही स्थान मिळाले आहे. जाडेजा आठव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

‘सकाळ समूहा’चा आंतरराष्ट्रीय सन्मान :

 • ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ’ या मराठी दैनिकाला रंगीत छपाईसाठीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘वॅन इफ्रा पुरस्कार’ 12 ऑक्टोबर रोजी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
 • ‘सकाळ माध्यम समूहा’चे संचालक (तंत्रज्ञान) भाऊसाहेब पाटील यांनी वॅन-इफ्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिन्सेंट पेरेग्ने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मॅनफ्रेड वेअरफेल आणि मुख्य कार्यपालन अधिकारी थॉमस जेकब यांच्याकडून पुरस्कार स्वीकारला.
 • ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार तसेच वॅन-इफ्राच्या रिसर्च अँड मटेरियल टेस्टिंग सेंटरचे प्रमुख आनंद श्रीनिवासन समारंभाला उपस्थित होते.
 • तसेच सध्या येथे सुरू असलेल्या वर्ल्ड पब्लिशिंग एक्‍स्पो 2016 दरम्यान हा कार्यक्रम झाला. या एक्‍स्पोमध्ये प्रिंट वर्ल्ड 2016 आणि डिजिटल वर्ल्ड 2016 अशी दोन सत्रे होत आहेत.
 • या पुरस्कारामुळे जगभरातील उत्कृष्ट छपाई करणाऱ्या वृत्तपत्रांच्या समूहात ‘सकाळ’चा समावेश झाला आहे.
 • जगभरातील 26 देशांतील 128 वृत्तपत्रांचा या स्पर्धेत सहभाग होता. भारतातून 31 वृत्तपत्रांचा सहभाग होता.
 • प्रादेशिक भाषेत ‘सकाळ’ने हा मानाचा पुरस्कार मिळविला.
 • आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर कलर क्वालिटी क्‍लब 2016 ते 2018 या वर्षासाठी एकूण 64 प्रकाशनांच्या 85 वृत्तपत्रांनी हे सदस्यत्व पटकावला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.