Current Affairs of 11 July 2015 For MPSC Exams

Current Affairs 11 july 2015

चालू घडामोडी 11 जुलै 2015

भारतातील अब्जाधीश नागरिकांची संख्या अडीच लाखांवर :

  • 2014 मध्ये भारतातील अब्जाधीश नागरिकांच्या संख्येत 27% वाढ झाली असून, ही संख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे.
  • भारतात 2013 मध्ये 1.96 लाख नागरिक अब्जाधीश होते.
  • भारतातील अब्जाधीशांची हीच संख्या 2018 पर्यंत 4.37 लाखांवर पोहोचणार आहे.
  • तर, 2023 पर्यंत त्याच्या दुप्पट होणार आहे, असे वेल्थ एक्स या संस्थेच्या अहवालानुसार समोर आले आहे.
  • तसेच या अहवालानुसार पुढील दहा वर्षांचा कालावधी ‘इंडियाज् डेकेड’(भारताचे दशक) ठरणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
  • भारताच्या बरोबरीनेच दक्षिण अफ्रिकेतील कोट्याधीशांच्या संख्येत वाढ होत आहे.
  • 2013-14 मध्ये कोट्याधीशांच्या बाबतीत भारत 14 व्या क्रमांकावर होता.
  • तसेच यामध्ये अमेरिका, जपान, चीन व ग्रेट ब्रिटन हे देश आघाडीवर आहे.
  • या अहवालानुसार 74.5 टक्क्यापेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबांचे मासिक उत्पन्न 5,000 पेक्षा कमी आहे. जागतिक बँकेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारतातील दरडोई उत्पन्न 1.610 डॉलर(अंदाजे एक लाख) झाले आहे. 2013 मध्ये हे उत्पन्न 1,560 डॉलर आहे.
  • परंतू ही वाढ काहीच लोकांच्या उत्पन्नात झालेल्या वाढीमुळे होती व सर्वसमावेशक नव्हती, असेही सांगण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 जुलै 2015)

इस्रो व ऍट्रिक्‍सने अवकाशात यशस्वीपणे सोडले पाच व्यापारी उपग्रह :

  • भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि तिचा व्यापारी विभाग असलेल्या ऍट्रिक्‍सने आज एकूण 1,440 किलो वजनाचे पाच व्यापारी उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडले.

    PSLV

  • पीएसएलव्ही या प्रक्षेपकाच्या साह्याने प्रथमच इतक्‍या मोठ्या वजनाचे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.
  • भारताची आतापर्यंतची ही सर्वांत अवजड व्यापारी मोहीम होती.
  • तसेच या वर्षातील ही पहिलीच व्यापारी मोहीम असून या मोहिमेचा कार्यकाळ 7 वर्षे असेल.
  • “पीएसएलव्ही”चे सुधारित व्हर्जन असलेल्या “पीएसएलव्ही-एक्‍सएल” या प्रक्षेपकाने आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून ब्रिटनच्या या पाचही उपग्रहांना त्यांच्या कक्षेत सोडले.
  • “पीएसएलव्ही-एक्‍सएल” हे चार टप्पे असलेले रॉकेट असून, सुरवातीच्या टप्प्यांमध्ये वेग मिळविण्याकरत अतिरिक्त सहा मोटर्स बसविण्यात आल्या आहेत.
  • पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्यात घन इंधनाचा वापर केला असून, दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात द्रवरूप इंधनाचा वापर केला आहे.
  • प्रक्षेपणापासून ते पाचवा उपग्रह अवकाशात सोडण्याचा कालावधी 19 मिनिटे 16 सेकंद इतका असणार आहे.
  • डीएमसी-3 : ब्रिटनच्या पाचही उपग्रहांपैकी हे तीन उपग्रह एकसारखे आहेत. त्यांचे वजन प्रत्येकी 447 किलो आहे. पृथ्वीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने सोडण्यात आलेले हे तीनही उपग्रह पृथ्वीपासून 647 किमी अंतरावर सूर्यकक्षेत सोडले जाणार आहेत. या तीनही उपग्रहांची उंची प्रत्येकी तीन मीटर आहे. छायाचित्रे काढणे, नैसर्गिक स्रोतांची आणि पर्यावरणाची माहिती घेणे आणि आपत्कालीन स्थितीत माहिती पुरविणे हे या उपग्रहांचे प्रमुख काम असणार आहे.
  • सीबीएनटी-1 : हा उपग्रहही पृथ्वी निरीक्षणासाठी सोडला जाणार असून, त्याचे वजन 91 किलो आहे. हा प्रायोगिक तत्त्वावर सोडला जाणारा लघुउपग्रह असून याद्वारे नवीन तंत्रज्ञानाची चाचणी घेतली जाणार आहे.
  • डी-आर्बिट सेल : हा नॅनो उपग्रह असून त्याचे वजन फक्त 7 किलो आहे. हा उपग्रहसुद्धा प्रायोगिक तत्त्वावर सोडला जाणार आहे.
  • डीएमसी-3 आणि सीबीएनटी-1 हे उपग्रह सरे सॅटेलाइट टेक्‍नोलॉजीने तयार केले असून, डी-ऑब्रिट सेल हा उपग्रह सरे अवकाश संस्थेने तयार केला आहे.
  • पीएसएलव्ही-एक्‍सएलची वैशिष्ट्ये :
  • पीएसएलव्ही-एक्‍सएलची उंची : 44.4 मीटर
  • वजन : 320 टन
  • किंमत : 140 कोटी
  • 45 : 1999 पासून भारताने सोडलेले परदेशी उपग्रह
  • 30 वी : पीएसएलव्हीची मोहीम  

विद्यापीठाचे कामकाज अधिक पारदर्शक होण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ऍप्लिकेशन :

  • व्यावसायिक परीक्षांचे कामकाज डिजिटल करण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला असून परीक्षासंबंधीचे विद्यापीठाचे कामकाज अधिक पारदर्शक होण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ऍप्लिकेशन लॉंच केले Mobile Appजाणार आहे.
  • तसेच “व्यापमं”च्या कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता आणली जाणार असून सर्व विद्यार्थी आणि अभ्यासकांना ते ऑनलाइन पाहता येणार आहे.
  • “डिजिटल इंडिया” कार्यक्रमान्वये हे ऍप्लिकेशन तयार करण्यात आले असून, या माध्यमातून परीक्षार्थींना सर्व प्रक्रिया आता ऑनलाइन पूर्ण करता येईल, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.
  • तसेच नव्या ऍपवरती अर्जाचे नमुने, विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रश्‍न आणि उत्तरपत्रिका उपलब्ध असतील, तसेच प्रवेशपत्रदेखील ऍप्लिकेशनच्या माध्यमातून डाऊनलोड करता येणार आहे.
  • पूर्वआयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि युनानी अभ्यासक्रमाच्या 30 ऑगस्ट 2015 रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी याचा वापर केला जाणार आहे.

भारत आणि पाकिस्तान एससीओत सहभागी होण्यास मान्यता :

  • भारत आणि पाकिस्तानने “शांघाय सहकार्य परिषदे”मध्ये (एससीओ) सहभागी होण्यास रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी मान्यता दिली आहे.
  • पश्‍चिमेकडील देशांच्या आघाडीप्रमाणेच “एससीओ”चेही महत्त्व असून, त्यावर रशिया आणि चीनचे अधिपत्य आहे.
  • तसेच “एससीओ”तील सदस्यत्वामुळे भारताला मध्य आशियातील ऊर्जास्रोतांचा लाभ होणार आहे.
  • या दौऱ्यासोबतच मोदी यांनी एससीओचे सदस्य असलेल्या कझाकिस्तान, किरगिझस्तान, ताझिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांच्या भेटीचाही समावेश केला आहे.

टपाल खात्याला मिळणार पेमेंट बॅंक दर्जा :

  • टपाल खात्याला लवकरच भरणा बॅंकेचा (पेमेंट बॅंक) दर्जा मिळण्याची शक्‍यता असून सप्टेंबर अखेरपर्यंत रिझर्व्ह बॅंकेकडून त्यासाठीचा परवाना मिळणार असल्याची माहिती दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिली आहे.
  • भरणा बॅंकेचा दर्जा मिळाल्यानंतर देशातील ग्रामीण भागातील 1 लाख 25 हजार टपाल कार्यालयांसह 1,54,000 कार्यालयांत बॅंकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत.
  • तसेच पुढील दोन वर्षांत देशात 50 कोटी जणांना इंटरनेट कनेक्‍शन तर 120 कोटी लोकांना मोबाईल उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

विश्‍व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.शेषराव मोरे यांची निवड :

  • अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने विश्‍व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.शेषराव मोरे यांची निवड करण्यात आली आहे.

    Sheshrav More

  • येत्या पाच व सहा सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाच्या तोंडावर चौथे विश्‍व संमेलन अंदमान येथे  होणार आहे.
  • मंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयांची घोषणा केली.

दिनविशेष :

  • 1889 – मराठी कादंबरीकार नारायण हरी आपटे यांचा जन्म.
  • 1962 – टेलस्टार 1 या उपग्रहावरून प्रथमच टेलिव्हिजनवर चित्र प्रेक्षेपित करण्यात आले.

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 जुलै 2015)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.