Current Affairs of 10 July 2015 For MPSC Exams

Current Affairs (10 July 2015)

“इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बंगळूर” आघाडीच्या स्थानी :

  • जगभरातील शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांचे आकर्षणबिंदू ठरलेल्या “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बंगळूर” या संस्थेने “ब्रिक्‍स” राष्ट्रांमधील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये जागा मिळवली आहे.
  • आंतरराष्ट्रीय क्रमवारीचा विचार केला असता हे विद्यापीठ पाचव्या स्थानावर असल्याचे दिसून येते.
  • “क्‍यूएस युनिव्हर्सिटी रॅंकिंग : ब्रिक्‍स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) 2015” हा अहवाल आज प्रसिद्ध करण्यात आला.
  • चिनी विद्यापीठांनी आघाडी घेतली असून तिसींगहुआ, पेकिंग आणि फुदान या तिन्ही विद्यापीठांनी आघाडीचे स्थान पटकावले आहे.
  • तसेच बंगळूरमधील “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स” ही संस्था पाचव्या स्थानावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी 9 जुलै 2015

आता साक्षीदारांना मिळणार दुप्पट भत्ता :

  • आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी व साक्षीदार न्यायालयात उपस्थित राहावे यासाठी त्यांचा आहार व प्रवास भत्ता प्रतिदिन 100 ऐवजी 200 रुपये करण्याचा अध्यादेश राज्यशासनाने काढला आहे.
  • तुटपुंजा आहार व प्रवास भत्त्यामुळे साक्षीदार दिवसमोड करून न्यायालयात उपस्थित राहण्यास टाळाटाळ करतात. परिणामी साक्षीअभावी खटला कमकुवत होतो आणि आरोपीस अपेक्षित शिक्षा होत नाही.
  • साक्षीदारांमुळे घटनाक्रम, आरोपींचे गुन्हा सिद्ध करण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे साक्षीदारांना साक्ष देण्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा आहार व प्रवास भत्ता दुप्पट केल्याने ते खटल्यातील त्यांची भूमिका चोखपणे बजावू शकतील. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन न्यायालयास आरोपींना शिक्षा देण्यास मदत होईल. साक्षी-पुराव्यांअभावी आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाणही त्यामुळे कमी होईल.
  • नियम 1980 नुसार वर्ग 1 व वर्ग 2 साक्षीदारांना आहार व दैनिक भत्ता म्हणून प्रतिदिन 100 ऐवजी प्रतिदिन 200 रुपये मिळतील. तर वर्ग 3 व वर्ग 4 साक्षीदारांना आहार व दैनिक भत्ता म्हणून आता 60 ऐवजी प्रतिदिन 120 रुपये मिळतील.

हॅमिल्टन अजिंक्य अव्वल स्थानी :

  • यंदाच्या हंगामातला जबरदस्त फॉर्म कायम राखत लुईस हॅमिल्टनने ब्रिटिश ग्रां. प्रि. शर्यतीत अव्वल स्थान पटकावले. या शर्यतीचे हॅमिल्टनचे हे सलग दुसरे जेतेपद आहे.
  • या विजयासह हॅमिल्टनने गुणतालिकेत संघसहकारी निको रोसबर्गला पिछाडीवर टाकत दमदार आघाडी घेतली आहे. हॅमिल्टनने 194 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले.
  • हॅमिल्टनने व्यावसायिक खेळाचे सर्वोत्तम उदाहरण पेश करताना 10.956 सेकंदांच्या फरकाने बाजी मारली.
  • हॅमिल्टनची घरच्या मैदानावरचे हे तिसरे, यंदाच्या वर्षांतले पाचवे तर कारकीर्दीतील 38वे जेतेपद आहे. रोसबर्गने दुसरे तर वेटेलने तिसरे स्थान मिळवले.

दिनविशेष :

  • 1973बहामाचा स्वातंत्र्यदिन
  • 1978महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना.

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 जुलै 2015)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.