Current Affairs of 9 July 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी 9 जुलै 2015

भारत व कझाकस्तान संरक्षण क्षेत्रामधील सामंजस्य करार :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कझाकस्तान दौऱ्यादरम्यान दोन देशांमध्ये पाच महत्त्वपूर्ण करार करण्यात आले.
 • या करारांमध्ये युरेनियम पुरठ्यासंदर्भातील करारासहित लष्करी सहकार्य अधिक वाढविण्यासंदर्भातील कराराचाही समावेश आहे.
 • तसेच मोदी यांची प्रादेशिक शांतता, दळणवळण, संयुक्त राष्ट्रसंघामधील सुधारणा, दहशतवाद यांसहित अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर आमची चर्चा झाली.

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी 8 जुलै 2015

फेसबुक आपले पाचवे डेटा सेंटर उभारणार :

 • लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने आपले पाचवे डेटा सेंटर उभारणार असल्याचे जाहीर केले आहे.

  Facebook

 • फोर्ट वर्थ येथे हे पाचवे डेटा सेंटर उभारण्यात येणार असून हे अमेरिकेतील चौथे जर जगातील पाचवे डेटा सेंटर ठरणार आहे.
 • या ग्लोबल डेटा सेंटरसाठी फेसबुक तब्बल 50 कोटी डॉलर्सचा खर्च येणार आहे.
 • तसेच या डेटा सेंटरच्या देखभालीसाठी 40 कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती फेसबुकच्या उपाध्यक्ष (पायाभूत सुविध) टॉम फुरलॉंग यांनी एका ब्लॉगपोस्टद्वारे दिली आहे.
 • विशेष म्हणजे या डेटा सेंटरसाठी संपूर्णपणे अपारंपारिक ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे.
 • तसेच फेसबुकचे पहिले डेटा सेंटर 2011 मध्ये प्रिंनेविलेमध्ये उभारण्यात आले होते. त्यानंतर अलटुना, लोवा, फॉरेस्ट सिटी, नॉर्थ कॅरोलिना आदी ठिकाणी सर्व्हर्स उभारण्यात आले होते.

देशातील पहिले वायफाय युक्त गाव :

 • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेले पाचगाव हे देशातील पहिले वायफाय युक्त गाव घोषीत करण्यात आले आहे.

  Wi Fi

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराला एक गाव दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. यानुसार, गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघाला लागून असलेल्या पाचगावची निवड केली होती.
 • या गावातील विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधा मिळावी, त्यातून रोजगाराच्या संधी युवकांना उपलब्ध व्हाव्यात, ग्रामपंचायतीसह शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा मिळावा यासाठी संपूर्ण गाव “वाय-फाय” करण्याची घोषणा त्यांनी केली होती.

   

ब्रिटनमधील अनिवासी भारतीयांना पुरस्कार :

 • ब्रिटनमधील आघाडीचे अनिवासी भारतीय उद्योजक लॉर्ड करण बिलिमोरिया यांना यावर्षीचा उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय भारतीय नागरिक असा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

  Britan

 • तसेच व्यवसाय व शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.
 • ब्रिटनमधील भारताचे उपउच्चायुक्त वीरेंद्र पॉल यांनी एका समारंभात बिलिमोरिया यांना सन्मानित केले.
 • याव्यतिरिक्त इतर 7 भारतीयांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून, त्यात सरोश झाईवाला, उमा वधवानी, कॅप्टन नलीन पांडे, रवींद्रसिंग गिदार, प्रवीणकांत अमीन, बजरंग बहादूर माथुर, संजय वधवानी यांनाही याच कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

काळ्या पैशासाठी ई-फायलिंगची सुविधा उपलब्ध :

 • विदेशात कर चुकवून दडविलेला काळा पैसा जाहीर करण्यास सरकारने दिलेल्या मुदतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्ती ई फायलिंगची सुविधाही वापरू शकते.
 • काळा पैसा जाहीर करण्यासाठी सरकारने एक खिडकी योजना जाहीर केली आहे. यासाठी व्यक्ती किंवा संस्थेला पारंपरिक फॉर्मही भरता येतो.
 • ई फायलिंगसाठी ‘डिजिटल सिग्नेचर’ आवश्यक आहे. लेखी स्वरूपातील दस्तावेजांचे स्वाक्षरीने जसे प्रमाणीकरण होते तसेच डिजिटल सिग्नेचरमुळे ई फायलिंगचे होते.
 • विदेशात कर चुकवून ठेवलेला पैसा जाहीर करण्यासाठी या एक खिडकी योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यास हे काम खूप कमी वेळेत आणि पूर्ण गुप्तता राखून पार पाडता येईल असा ऑनलाईन फायलिंग सुविधेचा उद्देश आहे.
 • या उद्देशासाठी दोन पानी नवा फॉर्म उपलब्ध करण्यात आला आहे. त्यासोबत भारताबाहेरच्या अघोषित संपत्तीचे निवेदन करण्यासाठी तीन पानी स्वतंत्र पुरवणीही आहे.
 • काळा पैसा जाहीर करण्यासाठी सरकारने 1 जुलैपासून तीन महिन्यांची एक खिडकी मुदत योजना जाहीर केली आहे. या जाहीर केलेल्या बेहिशेबी संपत्तीवर व पैशांवर 31 डिसेंबरपर्यंत कर आणि दंड भरता येईल. जे इच्छुक या योजनेचा लाभ घेतील त्यांना 30 टक्के कर आणि तेवढीच रक्कम दंड म्हणून भरावी लागेल.
 • गेल्या मे महिन्यात संसदेने काळ्या पैशांविरुद्धचा नवा कायदा संमत केला व त्याला 26 मे रोजी राष्ट्रपतींनी मान्यता दिली. या कायद्यांतर्गत ही एक खिडकी योजना जाहीर करण्यात आली आहे. विदेशात कर चुकवून ठेवण्यात आलेल्या संपत्तीत अचल मालमत्ता, दागिने, शेअर्स आणि दुर्मिळ कलाकृतींचा समावेश आहे.

देशातील एकोणीस महाविद्यालयांना वारसा दर्जा प्रदान :

 • विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील एकोणीस महाविद्यालयांना वारसा दर्जा दिला आहे. त्याचा परिणाम म्हणून महाविद्यालयांना सुधारणांसाठी आता आर्थिक निधी दिला जाणार आहे.
  Collage
  पुण्याचे फर्गसन महाविद्यालय, मुंबईचे सेंट झेवियर्स महाविद्यालय, नागपूरचे हिस्लॉप महाविद्यालय यांचा समावेश आहे.
 • आयोगाने महाविद्यालयांकडून वारसा महाविद्यालय योजनेत वारसा दर्जासाठी प्रस्ताव मागितले होते, या योजनेत साठ प्रस्ताव मिळाले होते.
 • विद्यापीठ अनुदान आयोगाने मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाला 1.53 कोटींचे अनुदान जाहीर केले असून त्यात संवर्धनाचे काम केले जाईल. तसेच ‘मेन्टेनिंग हेरिटेज इन इंडिया’ हा पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला जाईल.
 • वारसा दर्जा मिळालेली महाविद्यालये
 • सीएमएस महाविद्यालय – कोट्टायम, सेंट जोसेफ महाविद्यालय – त्रिची, खालसा महाविद्यालय- अमृतसर, सेंट बेडेज महाविद्यालय- सिमला, ख्राइस्ट चर्च महाविद्यालय – कानपूर, ओल्ड आग्रा महाविद्यालय- आग्रा, मीरत महाविद्यालय-मीरत, लंगट मानसिंग महाविद्यालय -मुझफ्फरपूर, गव्हर्नमेंट ब्रेनन महाविद्यालय – केरळ, युनिव्हर्सिटी महाविद्यालय – मंगळुरू, कॉटन महाविद्यालय – गुवाहाटी, मिदनापूर महाविद्यालय -पश्चिम बंगाल, गव्हर्नमेंट मेडिकल सायन्स महाविद्यालय – जबलपूर, गव्हर्नमेंट गांधी मेमोरियल सायन्स महाविद्यालय-जम्मू, कन्या महाविद्यालय-जालंधर, सेंट झेवियर महाविद्यालय -कोलकाता.
 • दिनविशेष :
 • 1816अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 जुलै 2015)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.