Current Affairs of 13 July 2015 For MPSC Exams

Current Affairs (13 July 2015)

चालू घडामोडी 13 जुलै 2015

व्यापमं भरती व परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी विशेष पथक आजपासून करणार चौकशी :

  • मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापमं) भरती व परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) 40 जणांचे विशेष पथक आजपासून चौकशी करणार आहे.
  • व्यापमं प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यानंतर सीबीआयने तपासासाठी अतिरिक्त संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हे विशेष पथक स्थापन केले आहे.
  • आज सीबीआयचे हे पथक भोपाळमध्ये दाखल होणार आहे.
  • सीबीआय व्यापमं गैरव्यवहाराशी संबंधित सर्व घटकांची चौकशी करेल, असे सीबीआयचे अधिकारी आर. के. गौर यांनी सांगितले.
  • व्यापमं गैरव्यवहारात आतापर्यंत 40 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 जुलै 2015)

भारतीयांसाठी यंदाची विंबल्डन स्पर्धा ठरली सर्वाधिक यशाची :

  • भारतीयांसाठी यंदाची विंबल्डन स्पर्धा सर्वाधिक यशाची ठरली आहे.
  • महिला दुहेरीत सानिया मिर्झा, मुलांच्या दुहेरीत सुमीत नागल आणि मिश्र दुहेरीत लिअँडर पेस यांनी आपापल्या साथीदारांसह विजेतेपद मिळविले.
  • रविवारी झालेल्या अंतिम लढतीत पेसने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीत ऍलेक्‍झांडर पेया (ऑस्ट्रिया) आणि टिमेआ बाबोस (हंगेरी) यांचा 6-1, 6-1 असा चाळीस मिनिटांत पराभव केला आहे.
  • तसेच हिंगीसला या स्पर्धेत दुसरे विजेतेपद मिळाले.
  • तर तिने शनिवारी भारताच्याच सानिया मिर्झाच्या साथीत महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते.
  • पेस आणि हिंगीस जोडीचे हे मोसमातील दुसरे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले.
  • त्यांनी या वर्षी ऑस्ट्रेलिया स्पर्धेतही विजेतेपद मिळविले आहे. तसेच पेसचे हे सोळावे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले.
  • यामध्ये पुरुष दुहेरीत त्याने ऑस्ट्रेलिया (2012), फ्रेंच (1999, 2001, 2009) विंबल्डन (1999), अमेरिका (2006, 2009, 2013), तर मिश्र दुहेरीत ऑस्ट्रेलिया (2003, 2010, 2015), विंबल्डन (1999, 2003, 2010, 2015) आणि अमेरिका (2008) या विजेतेपदांचा समावेश आहे.
  • तर मिश्र दुहेरीत त्याने आठव्यांदा ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले आहे.

आता ऑनलाइन एफआयआर नोंदविता येणार :

  • केंद्र सरकारच्या ई-गव्हर्नन्स अभियानांतर्गत क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिमने (सीसीटीएनएस) महाराष्ट्रातील सर्वच पोलिस ठाणी ऑनलाइन झाली आहेत.
  • देशातील विविध राज्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे.
  • मात्र, राज्यातील सर्व पोलिस ठाणी ऑनलाइन करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले.
  • तसेच आता नागरिकांना आता घरी बसून ऑनलाइन एफआयआर नोंदविता येणार आहे.
  • तसेच या यंत्रणेच्या माध्यमातून कारागृह, न्यायालयाचे कामकाज जोडण्यात येणार आहे.
  • या यंत्रणेमुळे घरी बसूनच नागरिकांना परवानगीचा फॉर्म डाउनलोड करून भरण्याची सुविधा आहे.
  • या यंत्रणेसाठी विप्रो, बीएसएनएल आणि प्राईस वॉटरहाउस कूपर या तीन कंपन्यांना पाच वर्षांसाठी देखभालीसाठी करारबद्ध करण्यात आले असल्याचेही पोलिस आयुक्‍त यादव म्हणाले.

‘न्यू होरायझनने’ अवकाशयानाकडून छायाचित्र पृथ्वीकडे पाठवली :

  • अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था “नासा”ने प्लुटोच्या दिशेने सोडलेले न्यू होरायझन या अवकाशयानाने त्याच्यावरील चार काळ्या डागांचे छायाचित्र काढण्यात यश मिळविले आहे.
  • गेली अनेक वर्षे संशोधक या डागांचे चांगले छायाचित्र मिळविण्याचा प्रयत्न करत होते.
  • न्यू होरायझन दोनच दिवसांनी, म्हणजे 14 जुलैला प्लुटोच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. या वेळी हे डाग अवकाशयानाला दिसणार नाहीत.
  • छायाचित्र काढलेल्या चार डागांपैकी सर्वांत मोठा डाग 300 मैल पसरलेला असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
  • या डागांच्या आतापर्यंत काढलेल्या छायाचित्रांहून अधिक स्पष्ट आहे. हे सर्व डाग प्लुटोच्या मध्यरेषेवर असून, ते एकमेकांपासून विशिष्ट अंतरावर पसरले आहेत.

    न्यू होरायझनची वैशिष्ट्ये :

  • “नासा”ने 2007 मध्ये सोडलेले हे यान सध्या पृथ्वीपासून तीन अब्ज मैलांवर असून, प्लुटोपासून ते 22 लाख मैल दूर आहे.
  • 14 जुलैला हे यान प्लुटोपासून 12,500 किमी अंतरावरून पुढे जाईल.
  • ते 49,600 किमी प्रतितास या वेगाने पुढे जाईल.
  • या अवकाशयानावर निरीक्षण आणिप्रयोगासाठी सात प्रकारची उपकरणे बसविण्यात आली आहे.

किरगिझीस्तानच्या दौऱ्यावर मोदीनी केल्या चार करारांवर स्वाक्षरी :

  • मध्य आशियातील किरगिझीस्तानच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांमध्ये विविध प्रकारच्या चार करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.
  • किरगिझीस्तानच्या नेत्यांबरोबर विस्तृत चर्चा झाल्यानंतर या करारांना मान्यता देण्यात आली.
  • किरगिझीस्तानबरोबर संरक्षण संबंध दृढ करत भारताने त्यांच्याबरोबर संरक्षण, सुरक्षा, लष्करी प्रशिक्षण, संयुक्त कवायती आणि लष्करी निरीक्षकांची देवाणघेवाण यांचा समावेश असलेला संरक्षण सहकार्य करार केला.
  • तसेच याशिवाय, निवडणूक क्षेत्राबाबत सहकार्य, किरगिझीस्तानचे अर्थमंत्रालय आणि भारतीय मानक संस्था यांच्यातील सामंजस्य करार आणि सांस्कृतिक सहकार्य करार असे करारही या वेळी करण्यात आले.

“इस्रो”चे अँट्रिक्‍स संकेतस्थळ “हॅक” :

  • व्यावसायिक उपग्रह सोडण्यात यश मिळविणाऱ्या “इस्रो”चे अँट्रिक्‍स संकेतस्थळ “हॅक” केल्याचा प्रकार आज उघडकीस आला.
  • तसेच इस्रोचे संकेतस्थळ चीनच्या हॅकर्सने हॅक केल्याचे बोलले जात आहे.

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 जुलै 2015)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.