Current Affairs of 11 January 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (11 जानेवारी 2018)

चालू घडामोडी (11 जानेवारी 2018)

कुलगुरूपदासाठी मुंबई विद्यापीठाची जाहिरात :

 • मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड करणाऱ्या शोध समितीने या पदासाठी वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुकांना 14 फेब्रुवारीपर्यंत अर्ज पाठवण्याची मुदत दिली आहे.
 • ऑनस्क्रीन ऍसेसमेंटप्रकरणी वादग्रस्त ठरलेले कुलगुरू संजय देशमुख यांच्या हकालपट्टीनंतर शोध समितीची स्थापना करण्यात आली.
 • इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झालेल्या या समितीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचे श्‍यामलाल सोनी तसेच सिडकोचे उपाध्यक्ष भूषण गगराणी यांचा समावेश आहे. गत आठवड्यात समितीने राज्यपाल व कुलपती सी. विद्यासागर राव यांची भेट घेतल्यानंतर ही जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केली.
 • कुलगुरूपदासाठी आवश्‍यक असलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव, कौशल्ये व नैपुण्ये याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

आधारच्या सुरक्षेसाठी सरकारची नवी योजना :

 • आधारचा डेटा सुरक्षित नसल्याचा दावा माध्यमांतील वृत्तांमधून करण्यात आल्यानंतर आधारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही बाब युआयडीने गांभीर्याने घेतली असून आधारचा डेटा अधिक सुरक्षित करण्यासाठी पावलले उचलली जात आहेत.
 • आधारच्या 12 आकड्यांऐवजी आता व्हर्च्युअल आयडी आणण्याची योजना सरकारने आखली आहे. याद्वारे प्रत्येक आधार कार्डचा एक व्हर्च्युअल आयडी तयार करता येणार असून तो बदलता राहणार आहे.
 • तसेच यामुळे नागरिकांना त्यांचा 12 आकडी आधार क्रमांक कोठेही देण्याची गरज भासणार नाही. तर 16 आकड्यांचा व्हर्च्युअल आयडी द्यावा लागेल.
 • युआयडीच्या माहितीनुसार, व्हर्च्युअल आयडीची ही सुविधा 1 जूनपासून अनिवार्य करण्यात येणार आहे.

सीबीएसई बोर्डाची परीक्षा 5 मार्चपासून :

 • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) 10 जानेवारी रोजी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार CBSE बोर्डाची दहावीची परीक्षा पाच मार्चपासून सुरू होईल. ही परीक्षा चार एप्रिलपर्यंत सुरू राहील. तर बारावीची परीक्षा 5 मार्चला सुरू होऊन 12 एप्रिलला संपेल.
 • सीबीएसईच्या संकेतस्थळावर दोन्ही परीक्षांचे वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षांची तारीख जाहीर झाल्यानंतर वेळापत्रक पाहण्यासाठी अनेक विद्यार्थी CBSEच्या संकेतस्थळावर भेट देत आहे.
 • तसेच पेपर तपासणी प्रक्रिय सदोष असल्याच्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी व तपासणी प्रक्रियेला अतिरिक्त वेळ उपलब्ध करुन देण्यासाठी सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या परीक्षा एक महिना अगोदर घेण्याचे संकेत दिले होते.

राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार जाहीर :

 • मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक व क्रीडा पुरस्कार 2017’ ची घोषणा करण्यात आली आहे.
 • यंदाचा सामाजिक पुरस्कार ताडोबा वनक्षेत्रात आदिवासी हक्कासाठी कार्यरत असलेल्या सतीश सिडाम व हिजडा आणि ट्रान्सजेन्डर समूहासाठी कार्यरत असलेल्या कृपाली बिडये यांना जाहीर झाला आहे.
 • महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व रचनात्मक काम करणाऱ्या युवक-युवतींना सामाजिक युवा पुरस्कार देण्यात येतो.
 • तसेच महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे हे क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.

केंद्र सरकारव्दारे अनेक क्षेत्रात एफडीआयला मंजुरी :

 • परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक क्षेत्रात एफडीआयच्या धोरणात महत्वपूर्ण बदलांची घोषणा केली आहे.
 • 10 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सिंगल ब्रँड रिटेल ट्रेडिंग तसेच बांधकाम क्षेत्रातही 100 टक्के एफडीआयची घोषणा करण्यात आली आहे.
 • ईज ऑफ डुईंग बिझनेसला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने परकीय गुंतवणूक धोरणांतील सूट त्याचबरोबर एअर इंडियातील गुंतवणूकीत परदेशी कंपन्यांना 49 टक्के हिस्सा देण्यासही सूट दिली आहे. त्यामुळे आता परदेशी विमान कंपन्या एअर इंडियामध्ये भागीदारी करता येणार आहे.
 • तसेच केंद्र सरकारने परदेशी गुंतवणूकदार आणि परदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांच्या प्राथमिक बाजारांर्गत पॉवर एक्सचेंजमध्ये देखील गुंतवणूकीसाठी मंजूरी दिली आहे.

दिल्लीतील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा :

 • दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार आता दरवर्षी 77 हजार ज्येष्ठ नागरिकांना (60 वर्षांहून अधिक वय) मोफत तीर्थयात्रेची सुविधा देणार आहे.
 • दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ही माहिती दिली. ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रूपयांपेक्षा कमी आणि जे सरकारी किंवा स्वायत्त संस्थेचे कर्मचारी नाहीत, त्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल. या योजनेला ‘मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना’ असे नाव असेल.
 • तसेच या योजनेतंर्गत ज्येष्ठांना तीर्थयात्रेचा लाभ घेता येणार आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली.
 • मथुरा-वृंदावन-आग्रा-फत्तेपूर सिक्री, हरिद्वार-ऋषिकेश-नीलकंठ, पुष्कर-अजमेर, अमृतसर-आनंदपूर साहिब आणि जम्मू-वैष्णो देवी मंदिराचा समावेश आहे. यातील स्थान निवडण्याचे ज्येष्ठांना स्वातंत्र्य आहे. यात प्रवास खर्च, निवासस्थान आणि जेवण्याची सोय केली जाईल. प्रत्येक यात्रेकरूसाठी 7 हजार रूपये खर्च येतील.

दिनविशेष :

 • ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि.स. खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 मध्ये झाला.
 • 11 जानेवारी 1972 मध्ये पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.
 • सन 2000 मध्ये 11 जानेवारी रोजी छत्तीसगड उच्‍च न्यायालयाची स्थापना झाला.
 • एस.पी. भरुचा यांनी 11 जानेवारी 2001 मध्ये भारताचे 30 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.