Current Affairs of 12 January 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (12 जानेवारी 2018)

चालू घडामोडी (12 जानेवारी 2018)

राज्यसरकारव्दारे गर्भवतींना अर्थसाह्य मिळणार :

 • गर्भवतींना सहा हजार रुपये अर्थसाह्य देण्यात येणार आहे. देशभर या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे.
 • गरोदरपणाच्या काळात महिलांचा रोजगार बुडतो. या काळात पैशांअभावी त्यांना आवश्‍यक आहार घेता येत नाही. गर्भवती कुपोषित असेल तर कुपोषित मूल जन्माला येते. म्हणूनच मॅटर्निटी बेनिफिट प्रोग्राम (एमबीपी) देशभर राबवण्यात येत आहे.
 • तसेच गर्भवतींना सहा हजार रुपये पोस्टातील त्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात येणार आहेत. तीन टप्प्यांत ही रक्कम त्यांना देण्यात येईल.
 • गरोदरपणाच्या काळात बुडणाऱ्या रोजगाराचा मोबदला म्हणून ही रक्कम देण्यात येईल. गरोदरपणाच्या काळात त्यांनी आराम करावा, आरोग्य जपावे आणि पोषण आहार घ्यावा हा या योजनेचा उद्देश आहे.

भारतीय व्यक्ती ठरणार वॉरेन बफेट यांची वारसदार :

 • बर्कशायर हॅथवे इंकने 10 जानेवारी आपले दोन वरिष्ठ अधिकारी अजित जैन आणि ग्रेगरी एबल यांना बढती दिली आहे. आता हे दोघेही कंपनीची धुरा सांभाळण्यासाठी वॉरेन बफेट यांचा उत्तराधिकारी होण्याच्या अगदी निकट पोहोचले आहेत. अजित जैन हे भारतीय वंशाचे असून त्यांचा जन्म ओडिशा येथे झाला आहे.
 • बर्कशायर हॅथवे एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले 55 वर्षीय एबल यांना नॉन इन्शूरन्स बिझनेस ऑपरेशनसाठी बर्कशायरचे उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे. तर कंपनीचे टॉप इन्शूरन्स विभागचे प्रमूख 66 वर्षीय जैन यांच्याकडे इन्शूरन्स ऑपरेशन विभागच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
 • तसेच त्याबरोबर बर्कशायरच्या संचालक मंडळात त्यांचा समावेश करण्यात असून या दोघांच्या समावेशामुळे संचालक मंडळाची संख्या 12 वरून 14 वर पोहोचली आहे.

ग्रीन कार्डच्या संख्येत वाढ होणार :

 • गुणवत्तेवर आधारित व्हिसा देण्याची आणि ग्रीन कार्डच्या संख्येत 45 टक्क्य़ांची भरघोस वाढ करण्याची तरतूद असलेले विधेयक अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये सादर करण्यात आले आहे.
 • ट्रम्प प्रशासनाचा पाठिंबा असलेल्या या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यास भारतीय तंत्रज्ञांना मोठा फायदा होणार आहे.
 • ‘सिक्युअरिंग अमेरिकाज फ्यूचर अ‍ॅक्ट’ नावाचे हे विधेयक काँग्रेसने मंजूर केल्यास आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावर स्वाक्षरी करून त्याचे कायद्यात रूपांतर झाल्यास व्हिसाबाबत असलेली विविधता संपून, स्थलांतरितांची संख्या सध्याच्या सरासरी 10.05 दशलक्षावरून वर्षांला 2 लाख 60 हजार इतकी कमी होईल.
 • ग्रीन कार्डाच्या संख्येत सध्याच्या वार्षिक 120000 वरून 175000, म्हणजे 45 टक्के इतकी भरीव वाढ करण्याची तरतूदही विधेयकात आहे. जे भारतीय तंत्रज्ञ एच-1बी व्हिसावर अमेरिकेत येतात आणि ग्रीन कार्ड किंवा कायमस्वरूपी निवासी दर्जा मिळवण्याचा पर्याय निवडतात, ते प्रस्तावित कायद्याचे सर्वात मोठे लाभार्थी ठरण्याची अपेक्षा आहे.

व्हिडियोकॉन कंपनीचे काम बंद :

 • राज्यातील इलेक्ट्रॉनिक जगतातील महत्वाची कंपनी असलेल्या व्हिडियोकॉनने आपल्या मनुष्यबळाला तब्बल 12 दिवसांची जम्बो सुट्टी दिली आहे. कच्चा माल नसल्याचे कारण देत कंपनीने सध्या आपले काम बंद ठेवले आहे.
 • इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करणाऱ्या औरन्गबादेतील व्हिडियोकॉन उद्योगाने आपले संपूर्ण मनुष्यबळ अचानक सुट्टीवर पाठवले आहे. कंपनीच्यादरवाजांना टाळे लागले असून प्रोडक्शन लाईनसुद्धा कंपनीने बंद केली आहे.
 • 6 जानेवारी रोजी पर्यंत कंपनीतील काम सुरु होते. पण अचानक कंपनीत काम करत असताना प्लांट 18 तारखेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून तोपर्यंत सर्वांना सुट्टीवर जाण्याचे आदेश देण्यात आले. या नंतर पुढे काय, हे सांगण्यासाठी मात्र कंपनीतून अद्याप कोणालाही संपर्क करण्यात आलेला नाही.
 • 18 तारखेपर्यंत सुट्टी असली तरी ही सुट्टी लांबण्याची शक्यता असल्याची माहिती कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. सध्या कंपनीचे 700 ते 800 कामगार, अधिकारी सुट्टीवर पाठवण्यात आले आहेत.

संशोधनात भारताची प्रशंसनीय कामगिरी :

 • लायगो प्रकल्पांतर्गत गुरूत्वीय लहरींच्या संशोधनात भारताची भूमिका प्रशंसनीय होती यात शंकाच नाही, असे मत लायगो प्रकल्पातील प्रमुख वैज्ञानिकनोबेल विजेते कीप थॉर्न यांनी व्यक्त केले आहे.
 • त्यांनी सांगितले की, या प्रकल्पात तीन प्रमुख भाग होते; त्यातील डिटेक्टर उभारणीच्या कामात भारताचा फारसा सहभाग नव्हता. पण प्रायोगिक पातळीवर गुरूत्वीय लहरींचा आकार व इतर घटक लायगो प्रयोगातून मिळालेल्या माहितीतून शोधून काढण्यात भारताचा मोठा वाटा होता. न्यूट्रॉन ताऱ्यांच्या टकरीतून या गुरूत्वीय लहरी निर्माण झाल्या त्या लायगो प्रकल्पात टिपण्यात आल्या.
 • माहितीचे विश्लेषण हा यात तिसरा महत्त्वाचा भाग होता. त्यात जर्मनीचे बेर्नार्ड शुत्झ यांचे मूलभूत काम होते पण त्यांनीच नंतर आयुकाचे संजीव धुरंधर यांना माहितीचे विश्लेषण करण्याचे प्रशिक्षण दिले होते. धुरंधर यांनी सत्यप्रकाश यांच्या बरोबर काम केले, लायगो इंडियाचे बाला अय्यर यांनी गुरूत्वीय लहरींचा आकार मोजण्यात मोठी कामगिरी केली, त्यामुळे भारताची भूमिका यात मोठीच होती यात शंका नाही.

आधारकार्डसाठी व्हर्च्युअल आयडी अनिवार्य नाही :

 • आधार क्रमांकाऐवजी व्हर्च्युअल आयडीची सुविधा होणार असली तरी ती अनिवार्य नसल्याचे आधार कार्यक्रम चालवणाऱ्या युआयडीएआय अर्थात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
 • लोकांना आधार क्रमांक द्यायचा असेल तर ते देऊ शकतात असे युआयडीएआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण पांडे यांनी सांगितले.
 • आधारची माहिती सुरक्षित रहावी यासाठी युआयडीएआय आभासी ओळख क्रमांक अर्थात व्हर्च्युअल आयडी योजना आणणार असून ती जूनपासून अनिवार्य करण्यात येणार असल्याचे वृत्त होते.
 • मात्र, या योजनेचा विचार असला तरी ती अनिवार्य नसेल असे युआयडीएआयने स्पष्ट केले आहे. व्हर्च्युअल आयडीची सुविधा 1 मार्चपासून उपलब्ध होणार आहे. त्यानंतर 1 जूनपासून ती अनिवार्य करण्यात येणार असल्याचे माध्यमांतील वृत्तांतून सांगण्यात आले होते.

दिनविशेष :

 • 12 जानेवारी 1598 मध्ये राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला.
 • सन 1705 मध्ये 12 जानेवारी रोजी सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 12 जानेवारी 1936 मध्ये धर्मांतराची त्रिवार घोषणा करण्यात आली.
 • 12 जानेवारी 2005 मध्ये राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.