Current Affairs of 10 September 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (10 सप्टेंबर 2017)
गेम बंदीनंतर गुजरात सरकारची घोषणा :
- भारतात धुमाकूळ घालीत असलेल्या व पालकांसाठी चिंतेचे कारण बनलेल्या “ब्लू व्हेल” या ऑनलाइन गेमच्या प्रवर्तकाची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस देण्याचे गुजरात सरकारने जाहीर केले.
- हा गेम खेळणाऱ्या अनेकांनी त्याच्या शेवटच्या आव्हानानुसार आत्महत्या करून जीवन संपविले आहे.
- त्यामुळेच “डेथ गेम” ठरलेल्या ब्लू व्हेलवर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी बंदी घातल्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षासाठी विशेष समिती :
- मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत हृदयशस्त्रक्रिया, किडनी, मूत्रपिंडरोपण, कर्करोग इ. गंभीर स्वरूपाच्या आजारांनी त्रस्त रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अर्थसाह्य करण्यात येते.
- याशिवाय, सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियमांतर्गत नोंदणी केलेल्या रुग्णालयामार्फत गरीब व गरजू रुग्णांवर स्वस्त दरात उपचार केले जातात.
- तसेच याचे पुढचे पाऊल म्हणून आता रुग्णांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षांतर्गत विशेष समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
- मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे बळकटीकरण करण्यासाठी ही समिती रुग्णांच्या अर्जांची छाननी व तपासणी करणार आहे.
- या समितीच्या अध्यक्षपदी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधानसचिव असतील. तर वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्यावर समितीच्या सह-अध्यक्षपदाची जबाबदारी राहणार आहे.
- या समितीत एकूण सात सदस्य असणार आहेत. याविषयी नुकताच सार्वजनिक आरोग्य विभागाने शासननिर्णय जाहीर केला आहे.
Must Read (नक्की वाचा):
राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुष्मिता देव :
- सिल्चरच्या काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांची अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या नव्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- महिला काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा शोभा ओझा यांच्या जागेवर आता देव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- देव आणि ओझा या सध्या काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत.
- ओझा यांची ऑगस्ट 2013 मध्ये महिला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
राजीव महर्षी देशाचे नवे कॅग :
- केंद्र सरकारने माजी केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी यांची नियंत्रक आणि महालेखापालपदी (कॅग) नियुक्ती केली आली आहे.
- महर्षी यांचा गृह सचिवपदाचा कार्यकाळ 31 ऑगस्ट रोजी संपला. त्यांनी दोन वर्षे या पदाची धुरा सांभाळली.
- राजीव महर्षी यांच्यानंतर राजीव गऊबा यांच्याकडे केंद्रीय गृह सचिवपदाची जबाबादारी असेल.
- 1978च्या राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी असलेले राजीव महर्षी शशिकांत शर्मा यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.
- राजीव महर्षी 30 वर्षांपासून अधिक काळापासून प्रशासकीय सेवेत आहेत. त्यांनी व्यवसाय व्यवस्थापन विषयात स्ट्रॅथक्लाइड बिझनेस स्कूलमधून पदवी घेतली आहे.
- त्यांनी इतिहास विषयात नवी दिल्लीतील सेंट स्टिफन्स महाविद्यालयातून बीए आणि एमए केले आहे.
- राजीव महर्षींनी आतापर्यंत केंद्रात आणि राजस्थान सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
- राजस्थान सरकारचे मुख्य सचिव, अर्थखात्याचे मुख्य सचिव, इंदिरा गांधी नहर बोर्डाचे सचिव, बिकानेरचे जिल्हाधिकारी सचिव या पदांवर त्यांनी काम केले आहे.
- याशिवाय केंद्रात अर्थसचिव, खते विभागाचे सचिव या पदांवर काम करण्याचा अनुभव महर्षींना आहे.
विक्रमी अवकाशयात्री पेगी व्हिटसन पृथ्वीवर परतणार :
- आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात 288 दिवसांचे विक्रमी वास्तव्य करणारी नासाची महिला अवकाशयात्री पेगी व्हिटसन आता पृथ्वीवर परतण्याच्या तयारीत आहे.
- उड्डाण अभियंता जॅक फिशर व रशियाच्या रॉसकॉसमॉस अवकाश संस्थेचे कमांडर फ्योदोर युरीशिखिन यांच्यासह ती सोयूझ एमएस 04 या अवकाश यानाने परत येत असून ते कझाकस्तानमध्ये उतरणार आहे.
- पेगी व्हिटसन हिने अवकाशात 288 दिवस वास्तव्य केले असून पृथ्वीभोवती 4623 प्रदक्षिणा मारल्या आहेत.
- नोव्हेंबर 2016 पासून ती अवकाशात होती. तिचे हे अवकाशातील तिसरे प्रदीर्घ वास्तव्य होते.
- तिने कारकीर्दीत 665 दिवस अवकाश वास्तव्य केले असून कुठल्याही अमेरिकी अवकाशवीरापेक्षा हा काळ अधिक आहे. जागतिक पातळीवर तिचे आठवे स्थान आहे.
- युरीशिखिन व फिशर हे एप्रिलमध्ये अवकाश स्थानकात गेले होते. त्यांनी अवकाशात 136 दिवस पूर्ण केले आहेत.
- युरीशिखिन याचे अवकाशात पाच मोहिमात मिळून 673 दिवस वास्तव्य झाले आहे. तो जागतिक क्रमवारीत सातवा आहे.
- या अवकाश मोहिमेत पेगी व्हिटसन, फिशर व युरीशिखिन यांनी जैवतंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, पृथ्वी विज्ञानातील अनेक प्रयोग केले आहेत.
सायप्रसच्या उच्चायुक्तपदी आर के राघवन :
- मोदी सरकारने माजी सीबीआय प्रमुख आर के राघवन यांची सायप्रसच्या उच्चायुक्तपदी नेमणूक केली आहे.
- उच्चायुक्तपदी सहसा आयएफएस (भारतीय विदेश सेवा) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रथा असताना मोदी सरकारकडून या राजकीय नियुक्तीमुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
- 76 वर्षीय राघवन हे जानेवारी 1999 ते एप्रिल 2001 या कालावधीत सीबीआयच्या संचालकपदी होते.
- वर्ष 2002मध्ये त्यांच्याकडे गुजरात दंगलीच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली होती. तपासानंतर राघवन यांनी मोदी यांना क्लीनचिट दिली होती.
- 2008मध्ये राघवन यांना सर्वोच्च न्यायालयाने ग्रोधा दंगलीचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या पथकाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली होती.
- गुजरात दंगलीपूर्वी राघवन यांना 2006मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रॅगिंग प्रतिबंधक समितीच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली होती.
- राघवन यांनीच भारतातील पहिला सायबर सेल स्थापन केला होता. तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भ्रष्टाचारप्रकरणाची यांनीच चौकशी केली होती.
- 2000मध्ये मॅच फिक्सिंगचे प्रकरणही राघवन यांच्याकडेच सोपवण्यात आले होते. या प्रकरणात मोहम्मद अजहरूद्दीन आणि अजय जडेजा यांचे क्रिकेटचे करिअर संपुष्टात आले होते.
श्रीलंकेच्या नौदल प्रमुखपदी ट्रॅव्हिस सिनिया :
- श्रीलंका देशाच्या नौदल प्रमुखपदाची धुरा चार दशकांनंतर प्रथमच तामिळी वंशांच्या रिअर अॅडमिरल ट्रॅव्हिस सिनिया यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
- श्रीलंकेत तामीळ वंशाच्या नागरिकांना शिक्षण व रोजगारात स्थान मिळत नसल्याचे सांगत तामिळी बंडखोरांनी 1970मध्ये शस्त्र हाती घेऊन पुकारलेल्या युद्धाचा मे 2009 मध्ये शेवट झाला.
- या काळात तामिळी वंशाच्या व्यक्तीला कधी सैन्य दलाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नव्हती.
- सिनिया यांच्या सर्वोच्च पदावरील नियुक्तीने, आजवर देशासाठी प्रामाणिकपणे केलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
- तामिळी बंडखोरांविरोधातील लढाईत सिनिया यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. या मोहिमेचे काही काळ त्यांनी नेतृत्व केले.
- श्रीलंकन नौदलात सागरी युद्ध कार्यवाहीचा प्रदीर्घ अनुभव असणारे ज्येष्ठतम अधिकारी ही सिनिया यांची ओळख.
- नौदल प्रकल्प, योजना व संशोधन विभागाचे संचालक, नौदल (प्रशासन) विभागात उपसंचालक, संशोधन व विकास विभागात वरिष्ठ अधिकारी आदी पदांवरील कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत प्रथम स्थानी :
- फोर्ब्सकडून आशिया खंडातील भ्रष्टाचारी देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलकडून याबाबत 18 महिने सर्वेक्षण करण्यात आले होते.
- या यादीत फोर्ब्सने आशिया खंडातील देशांमध्ये भारतात सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
- त्यामुळे आशिया खंडातील भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारताला पहिले स्थान देण्यात आले आहे. तर व्हिएतनामचा दुसरा क्रमांक लागतो.
- भ्रष्टाचाराच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर थायलंड आहे तर पाकिस्तानचा चौथा क्रमांक लागतो.
- भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण सुमारे 69 टक्के असल्याचे सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.
- भारतात शाळा, रूग्णालय, ओळखपत्र, पोलीस क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे.
दिनविशेष :
- जिब्राल्टर. : राष्ट्र दिन
- चीन : शिक्षक दिन
- 1974 : गिनी-बिसाउला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- 1975 : व्हायकिंग-2 हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.
- 2002 : स्वित्झर्लंडला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा