Current Affairs of 10 October 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (10 ऑक्टोबर 2016)
रिलायन्स कंपनी जियोचे जागतिक रेकॉर्ड :
- दूरसंचार कंपनी रिलायन्स जियोने नवे रेकॉर्ड केले असून, एकाच महिन्यात या कंपनीने नवे एक कोटी साठ लाख ग्राहक जोडले आहेत.
- एवढ्या गतीने ग्राहक जोडण्यात कंपनीने फेसबुक आणि व्हॉट्सअॅपलाही मागे टाकले आहे.
- मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स जियोने 4 जी सेवेने ही नवी योजना 5 सप्टेबर रोजी सुरू केली.
- पहिल्या 26 दिवसांतच कंपनीने नवे एक कोटी 60 लाख ग्राहक जोडले आहेत.
- तसेच याबाबत मुकेश अंबानी यांनी आनंद व्यक्त करताना म्हटले आहे की, आमच्या योजनांचा नागरिक पूर्णपणे वापर करत आहेत.
- डेटाच्या ताकदीतून प्रत्येक भारतीयाला सशक्त बनविणे हा उद्देश आहे.
- जियोची सद्या वेलकम ऑफर सुरू असून, ती डिसेंबरपर्यंत आहे.
- कंपनीने आगामी काळात दहा कोटी ग्राहकांचे लक्ष्य ठेवले आहे.
Must Read (नक्की वाचा):
नवज्योतसिंग सिद्धु यांचा भाजपचा राजीनामा :
- क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी व भाजपच्या आमदार नवज्योत कौर यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
- पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री विजय सांपला यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
- सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पत्नीदेखील भाजपचा राजीनामा देतील हे अपेक्षितच होते.
- सिद्धू यांनी नुकतीच ‘आवाज ए पंजाब’ या नव्या पक्षाची स्थापना केली आहे.
श्रीमंतांमध्ये बिल गेट्स सर्वोच्च स्थानी कायम :
- फोर्ब्सने जाहीर केलेल्या अमेरिकन श्रीमंतांच्या यादीमध्ये पाच भारतीयांचा समावेश आहे.
- फोर्ब्सने चारशे श्रीमंतांची यादी जाहीर केली असून, यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स पुन्हा एकदा अग्रस्थानी आहेत. गेल्या 23 वर्षांपासून गेट्स या यादीमध्ये सर्वोच्च स्थानी आहेत.
- ‘फोर्ब्स’ने 2016 या वर्षातील श्रीमंत अमेरिकन लोकांची यादी जाहीर केली.
- तसेच यामध्ये पाच भारतीय वंशांच्या श्रीमंतांमध्ये सिंफनी टेक्नॉलॉजीचे संस्थापक रमेश वाधवानी, सिंटेल भारत या आउटसोर्सिंग फर्मच्या सहसंस्थापक नीरजा देसाई, उद्योजक राकेश गंगवाल, उद्योजक जॉन कपूर, सिलिकॉन व्हॅलीचे प्रमुख गुंतवणूकदार कवितर्क राम श्रीराम यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
- जगातील सर्वांत मोठे खासगी ट्रस्ट ‘बिल अँड मेंडा गेट्स फाउंडेशन’मार्फत ते जगभरात समाजसेवेचे व्रत पार पाडत असतात.
- अमेरिकन भारतीयांमध्ये वाधवानी यांचा क्रमांक फोर्ब्सच्या यादीमध्ये 222 व्या स्थानी आहेत.
नासाकडून मंगळ ग्रहावर शेतीसाठी प्रयोग :
- मंगळावर बगिचा उभारण्यासाठी त्याचे सादृश्यीकरण प्रयोग नासाचे वैज्ञानिक करीत असून आगामी मंगळ मोहिमातील अवकाशवीर तिथे कुठल्या प्रकारच्या वनस्पतींची लागवड करू शकतील याचा अंदाज घेण्यात येत आहे.
- मंगळावरील मानवी स्वारीत तेथे पुरेशा अन्नाची व्यवस्था करणे हे मोठे आव्हान आहे.
- मंगळ बगिचाचे सादृश्यीकरण नासाच्या केनेडी स्पेस सेंटर व फ्लोरिडा टेक बझ आल्ड्रिन स्पेस इन्स्टिटय़ूट यांनी केले आहे.
- तसेच यात मंगळावर वनस्पतींची लागवड करण्यातील आव्हाने संशोधकांनी दूर केल्याचे दाखवले आहे.
- मंगळावरील शेती ही पृथ्वीपेक्षा वेगळी असणार आहे.
- मंगळावरील मातीत ज्वालामुखी खडक असून सेंद्रिय घटक नाहीत, त्यामुळे तेथे वनस्पती जगणे अवघड आहे असे नासाचे म्हणणे आहे.
- नासाच्या केनेडी स्पेस सेंटरचे व्हेजिटेबल प्रॉडक्शन सिस्टीम प्रयोगाचे प्रकल्प व्यवस्थापक ट्रेन्ट स्मिथ यांनी सांगितले की, विज्ञानातील प्रगतीचा वापर करून वनस्पतींच्या आहारासाठी पूरक वनस्पतींची लागवड केली जाऊ शकते.
ऋत्विका, सिक्की-प्रणव यांना रशिनय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपद :
- रशिनय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली छाप सोडताना महिला एकेरी व मिश्र दुहेरीचे जेतेपद नावावर केले.
- महिला एकेरीत ऋत्विका शिवानीने स्थानिक खेळाडू एव्हगेनिया कोसेत्स्कायाचा 21-10, 21-13 असा अवघ्या 26 मिनिटांत पराभव केला.
- तसेच मिश्र दुहेरी सिक्की रेड्डी व प्रणव चोप्रा या जोडीने व्हॅदिमिर इव्हानोव्ह आणि व्हॅलेरिया सोरोकिना या जोडीचा 21-17, 21-19 असा पराभव करून जेतेपद पटकावले.
- पुरुष एकेरीत भारताच्या सिरिल वर्माला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
- मलेशियाच्या झुल्फादली झुल्कीफ्फीने अटतटीच्या सामन्यात सिरिलवर 16-21, 21-19, 21-10 असा विजय मिळवला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा