Current Affairs of 8 October 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (8 ऑक्टोबर 2016)

चालू घडामोडी (8 ऑक्टोबर 2016)

विश्वनाथन आनंद संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी :

 • पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद याने दहाव्या ताल मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धेत (दि.7) येथे अर्मेनियाचा लेवोन आरोनियन याच्यासोबतची लढत बरोबरीत सोडवली. त्याचबरोबर, तो संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर राहिला.
 • आनंदसाठी ही स्पर्धा संमिश्र यशाची ठरली. त्यात त्याला काही रेटिंग गुण मिळतील.
 • तसेच या स्पर्धेत आनंदने 2 डाव जिंकले. एका डावात त्याला पराभव पत्करावा लागला आणि 6 डाव बरोबरीत सुटले.
 • आरोनियनविरुद्धची लढत चुरशीची झाली. तथापि, आनंद इटालियन ओपनिंगने विजयाच्या स्थितीत पोहोचू शकला नाही.
 • तसेच या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी 40 चालींनंतर ड्रॉवर सहमती दर्शवली.
 • रशियाच्या इयान नेपोमनियाचीने अखेरच्या फेरीत इस्राईलच्या बोरिस गेलफंडविरुद्ध बरोबरी साधून विजेतेपद पटकावले.

भारत-पाकिस्तान सीमा सील होणार :

 • आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला शह दिल्यानंतर भारताने दहशतवाद्यांच्या घुसखोरीची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी कठोर पावले उचलायला सुरवात केली आहे.
 • पाकिस्तानला लागून असणारी सीमा पूर्णपणे सील करण्याचा निर्णय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी घेतला आहे.
 • तसेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प डिसेंबर 2018 पर्यंत तडीस नेण्याचा सरकारचा विचार असून, तो अधिक अद्ययावत व्हावा म्हणून त्याची तांत्रिक बाजूही मजबूत केली जाणार आहे.
 • राजनाथ यांनी चार राज्यांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधत सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेतला.

जुआन मॅन्युएल सँटोस यांना 2016 चा ‘शांतता नोबेल पुरस्कार’ जाहीर :

 • कोलंबियाचे अध्यक्ष जुआन मॅन्युएल सँटोस यांना 2016 सालचा ‘शांततेचा’ नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • कोलंबियामध्ये गेल्या 50 वर्षांपासून सुरू असलेले गृहयुद्ध संपवण्यासाठी त्यांनी झोकून देऊन जे सातत्यपूर्ण प्रयत्न केले, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
 • तसेच गेल्या 52 वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धात आत्तापर्यंत 2 लाख 60 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 6 लाखांहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत.

पर्यटनस्थळी कचरा केल्यास दंडात्मक करवाही होणार :

 • ऐतिहासिक वारसा असलेल्या पर्यटनस्थळांच्या 300 मीटर परिघात पॉलिथीन बॅग टाकून देणाऱ्या व इतर कचरा करणाऱ्यांना आता दंडही भरावा लागणार आहे.
 • तसेच याबाबतची तरतूद असेलली कायदा दुरुस्ती केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे, असे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांनी सांगितले.
 • पंतप्रधानांच्या कल्पनेतून जन्माला आलेल्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेत साजऱ्या झालेल्या स्वच्छता पंधरवड्याबाबत ग्रामविकासमंत्री नरेंद्र तोमर यांच्यासह शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
 • अर्थात या 300 मीटरमधील 100 मीटरचा परिसरच पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येतो.
 • उर्वरित 200 मीटर परिसरात स्थानिक पालिकेचे; पर्यायाने राज्य सरकारचे राज्य असते. त्यामुळे हे प्रस्तावित ‘दंडकारण्य’ आणण्यासाठी केंद्राला राज्यांची सहमतीही मिळवावी लागणार आहे.
 • देशातील 3686 स्थळांना पुरातत्त्व विभागाने संरक्षित ठिकाणे म्हणून घोषित केले आहे, त्यात ताजमहाल, लाल किल्ला, अजेमरचा दर्गा, कुतुबमिनार, खजुराहो, अजिंठा-वेरुळची लेणी आदी प्रख्यात ठिकाणांचा यात समावेश आहे.
 • तसेच या ठिकाणी देशी-विदेशी पर्यटकांची वर्दळ लक्षात घेता केंद्राने 1363 या क्रमांकाची हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे.
 • यासोबतच ही हेल्पलाइन जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश आदी 12 भाषांत उपलब्ध असून, असा प्रयोग जगात पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे.

मध्य प्रदेशमध्ये हिरे खाणीचा पहिला लिलाव :

 • मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात असलेल्या हातूपूर हिरा खजिन पट्ट्याचा ई-लिलाव झाला.
 • लिलाव झालेली ही हिऱ्याची पहिलीच खाण ठरली आहे. या खाणीत 106 कोटी किमतीच्या हिऱ्यांच्या खनिजाचा साठा आहे.
 • मध्य प्रदेशचे खनिज संपत्ती सचिव मनोहर दुबे यांनी ही माहिती जारी केली.
 • मनोहर दुबे यांनी सांगितले की, 12 जानेवारी 2015 पासून लागू करण्यात आलेल्या खाण आणि खनिज (विकास आणि नियंत्रण) अधिनियम 1957 मधील तरतुदीनुसार पारदर्शक पद्धतीने ई-लिलाव पार पाडण्यात आला. त्यात बन्सल कन्स्ट्रक्श्न वर्क्स प्रा. लि. कंपनीने सर्वाधिक बोली लावली.
 • तसेच या लिलावात रुंगटा माइन्स लिमिटेड, त्रिवेणी अर्थमुव्हर्स, पुष्पांजली ट्रेडविन आणि बन्सल कन्स्ट्रक्शन वर्क्स या कंपन्यांनी भाग घेतला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World