Current Affairs of 1 May 2015 For MPSC Exams

Current Affairs Of (1 May 2015) In English

Shivshahir Babasaheb Purandare The “Maharashtra Bhushan” Award Announced

 • source thicker analyst and veteran of the Chhatrapati Shivaji Maharaj’s lives based producer sivasahira Babasaheb Purandare the state government “Maharashtra Bhushan” This is the highest honor was announced.
 • Maharashtra, literature, art, sports, science, social awareness, journalism, and public health service is given this award to honor the work of the office for the longest time people accepted the conviction in this area.
 • Cultural Affairs Vinod Dias headed Maharashtra Bhushan award selection committee had unanimously recommended the name of Babasaheb Purandare.

Govansh Defense Corporation Established :

 • Chief accountant said Devendra Board will be established to protect Govansh Govansh observed to be useful to enhance productivity.
 • The state government has decided to ban cow slaughter a pending 20 years.

“INS Arihant” Marine Successful Tests :

 • “INS Arihant” Texture of the first indigenous submarine are all successful sea trials.
 • And the other concerning the matter through the technical process smoothly Navy chief Admiral RK.A.Dhawan said.

The Central Government And The Government Signed A Tripartite Agreement With The NTC :

 • Dr. Bombay. Babasaheb Ambedkar Memorial Center in reference to the transfer station for the construction Indu Mill Government, Government of Maharashtra and the National Textile Corporation (NTC) signed a tripartite agreement between Which is Central Textiles minister Santosh Gangwar said in the Lok Sabha on Thursday.
 • Good luck to the memorial for the NTC will Indu Mill land, 12 acres of land.

‘INS Tarangini’ Eight-Month Tour Of Europe:

 • Indian Navy sail training vessel ‘INS Tarangini’ eight-month tour of Europe is going. The vessels will join the competition in Europe, the boat held high.
 • “The tournament has been organized on behalf of the Sail Training intaranesanala. This year, the UK, Norway, Denmark, Germany and the Netherlands on the has been organized competitions. Will participate in the tournament in three different sized sail boats.
 • Seventeen thousand miles in the period of eight months will travel by boat , the Navy officials said . This boat is going to sail the Navy Day bot of Oman.
 • India Tarangini the sail boats ‘A’ class boats is . This has been created in the Goa Shipyard , she was involved in the November 11, 1997 in the Indian Navy.
 • Creation and friendly relationship with foreign stats message about peace and will not award the ferry journey marine production environment.

Ghosana As The Inheritor Of The New Minister Mohammad Bin Nayapha:

 • Saudi Arabia King Abdullah bin Abdul Aziz has declared Salman as heir to his heir, the new Minister Mohammad bin nayapha change.
 • King of Saudi Arabia King Abdullah, the world’s largest oil exporter after the death of Salman Aziz bin Abdullah had accepted formulas king month in January.
 • Mohammad Aziz bin Salman , son of the heir of the kings of the race . But , he was given the second place.
 • They are the responsibility of the Ministry of Home Affairs has kept the kings Aziz declared as the heir to the 55 -year-old Mohammad Bin nayapha . And they are going to be a major political and security committee.

Day Special :

 • May 1 Maharashtra Day
 • 1 MayLabour Day
 • 1882 – Pune ‘Aryan’ women society Pt . Ramabaim ​​initiative of setting up.
 • 1960 – United Marathi language Mumbai formation of Maharashtra, Gujarat exist independent state.
 • 1983 – University of Amravati.
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 30 April 2015

चालू घडामोडी (1 मे 2015) मराठी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार जाहीर :

 • शिवचरित्राचे गाढे अभ्यासक व ‘जाणता राजा’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील आधारित महानाट्याचे निर्माते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य सरकारचा “महाराष्ट्र भूषण” हा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला.
 • महाराष्ट्रातील साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, समाजप्रबोधन, पत्रकारिता, लोकप्रशासन आणि आरोग्य सेवा या क्षेत्रात निष्ठेने प्रदीर्घ काळ सेवा केलेल्या मान्यवर व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
 • सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निवड समितीने एकमताने बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाची शिफारस केली होती.

गोवंश रक्षा महामंडळाची स्थापना :

 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्पादकता वाढविण्यासाठी गोवंश उपयुक्त असल्याचे सांगतानाच गोवंश रक्षा महामंडळाची स्थापना करणार असल्याचे सांगितले.
 • राज्य सरकारने 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला गोहत्या बंदीचा निर्णय घेतला आहे.

“आयएनएस अरिहंत” सागरी चाचण्या यशस्वी :

 • “आयएनएस अरिहंत” या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीच्या सर्व सागरी चाचण्या यशस्वी होत आहेत.
 • तसेच यासंबंधीच्या अन्य तांत्रिक प्रक्रियादेखील सुरळीतपणे पार पडत असल्याचे नौदलाचे प्रमुख ऍडमिरल आर. के. धवन यांनी आज सांगितले.

केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि एनटीसी यांची त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी

 • मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बांधण्यासाठी इंदू मिलची जागा हस्तांतरित करण्याच्या संदर्भात केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ (एनटीसी) यांच्यादरम्यान त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे.
 • केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री संतोष गंगवार यांनी गुरुवारी लोकसभेत माहिती दिली.
 • बाबासाहेबांच्या या स्मारकासाठी एनटीसीच्या इंदू मिलची 12 एकर जमीन मिळणार आहे.

‘आयएनएस तरंगिनी’ आठ महिन्यांच्या युरोप दौऱ्यावर :

 • भारतीय नौदलाची प्रशिक्षणार्थी शिडाची नौका ‘आयएनएस तरंगिनी’ आठ महिन्यांच्या युरोप दौऱ्यावर जात आहे. ही नौका युरोपमध्ये आयोजित उंच नौकांच्या स्पर्धेमध्ये सहभागी होईल.
 • ‘सेल ट्रेनिंग इंटरनॅशनल’च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ब्रिटन, नॉर्वे, डेन्मार्क, जर्मनी आणि नेदरलॅंडच्या किनाऱ्यांवर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध आकाराच्या तीनशे शिडाच्या नौका या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.
 • आठ महिन्यांच्या अवधीमध्ये ही नौका तब्बल सतरा हजार मैलांचा प्रवास करेल, अशी माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही नौका ओमान नौदलाच्या शिडाच्या नौकेसोबतही स्पर्धा करणार आहे.
 • भारताची तरंगिनी ही शिडाची नौका ‘अ’ श्रेणीतील नौका आहे. ही नौका गोवा शिपयार्डमध्ये तयार करण्यात आली असून, 11नोव्हेंबर 1997 मध्ये ती भारतीय नौदलामध्ये सहभागी झाली होती.
 • परकीय राष्ट्रांसोबत मैत्रीपूर्ण संबंधांची निर्मिती करणे आणि तसेच सागरी प्रवासासाठी अनुकूल वातावरण निर्मितीचा पुरस्कार करत ही नौका शांततेचा संदेशही देईल.

गृहमंत्री मोहंमद बिन नायफ यांची नवा वारसदार म्हणून घोषना :

 • सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुला अझीझ यांनी आपला वारसदार बदलत गृहमंत्री मोहंमद बिन नायफ यांना नवा वारसदार म्हणून घोषित केले.
 • जगातील सर्वांत मोठा तेल निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाचे राजे किंग अब्दुल्ला यांच्या निधनानंतर सलमान बिन अब्दुल्ला अझीझ यांनी जानेवारी महिन्यामध्ये राजसत्तेची सूत्रे स्वीकारली होती.
 • वारसदाराच्या शर्यतीत राजे अझीझ यांचा मुलगा मोहंमद बिन सलमान हा होता. पण, त्याला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले आहे.
 • राजे अझीझ यांनी 55 वर्षीय मोहंमद बिन नायफ यांना वारसदार म्हणून घोषित करत त्यांच्याकडे गृह मंत्रालयाची जबाबदारी ठेवली आहे. तसेच ते राजकीय आणि सुरक्षा समितीचे प्रमुख असणार आहेत.

दिनविशेष :

 • 1 मेमहाराष्ट्र दिन
 • 1 मेकामगार दिन
 • 1882 – पुणे ‘आर्य‘ महिला समाजाची पं. रामबाईंच्या पुढाकाराने स्थापना.
 • 1960 – मुंबईसह संयुक्त मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची निर्मिती, गुजरात स्वतंत्र राज्य अस्तित्वात.
 • 1983अमरावती विद्यापीठाची स्थापना.

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 2 May 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.