Current Affairs of 2 May 2015 For MPSC Exams
Current Affairs Of (2 May 2015) In English
111 Number Vodafone Last Changed :
- The 111 emergency number is reserved for the last number that Vodafone has changed.
- 199 can be used instead of the number of new customers calling and SMS.
- SMS is sent to the customer helpline number had been changed to Vodafone company.
- Customers calling and SMS 111 is reserved for the national emergency number not use this helpline number is the number that is reported by Vodafone.
- 100 and 108 of this fire , accident and medical advice to help concerned number is expected to last a number.
- 111 Number being Trai has decided to declare the emergency 112 number.
- Calls from numbers 100 to 101 the number of police in the country is related to the number fire.
Earthquake Andaman-Nicobar Islands :
- Andaman-Nicobar islands Friday 5.4 Richter scale earthquakes.
- But the earthquake has not been any kind of mortality.
- The focus of the earthquake was 135 km from Port Blair.
- And 7.1 in the Richter scale on Friday, Papua New ginia sat earthquake.
Implement A System Form :
- The process of starting a new company in order to make it easier for the government has now implemented a form of system.
- This will reduce the duration of the process of establishing a company from the application.
- ‘Ayaenasi -29’ which is the name of the form or the form available on the website of the Ministry of Corporate Affairs.
E – Balabharati Company Established :
- Balabharati circle created by the e-learning facility is looking to establish e – balabharati company.
- Education Minister Vinod Tawade has information that will be appointed to the committee of experts.
- The committee computer related Dr.Powered success, Dr.Anil Kakodkar will be included.
‘Messenger’ On The Surface Of The Planet Mercury Space Shuttle Crashes :
- 11 years from the start of the NASA space expedition ‘Messenger’ on the surface of the space shuttle is due to the collapse of the planet Mercury.
- Maryland at Johns Hopkins University Applied Physics leboretari control builders of the incident said.
- The Mercury Surface, Space enavhayarnamenta, jiokemistri and Ranging, a yanace name.
- On August 3, 2004 Messenger was launched.
- And started operation on March 18, 2011 and under the planet of Mercury Messenger space Yana had achieved his primary goal till March 2012
Bhaalachandr Nemade Hundred And Awards:
- Bhaalachandr Nemade provided the Prime Minister inaugurated the Golden Hundred award.
- Golden Hundred of the year award is the highest award in the field of literature known as.
- Marathi writer of mandiyali in the fourth literary awards are availing bhaalachandr Nemade. Earlier v. C. Khandekar, Poet McCarthy, Over karandikar got the award.
- Shawl, coconut , citation, a check of Rs 11 lakh and the image is Saraswati award form.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (2 मे 2015) मराठी
111 क्रमांक अखेर वोडाफोनने बदलला :
- 111 क्रमांक हा आपत्कालीन क्रमांकासाठी राखीव असल्याने अखेर वोडाफोनने तो बदलला आहे.
- त्याऐवजी 199 हा नवीन क्रमांक कॉलिंग आणि एसएमएससाठी ग्राहकांना वापरता येईल.
- हेल्पलाईन क्रमांक बदलण्यात आल्याचा एसएमएसही वोडाफोन कंपनीने ग्राहकांना पाठवला आहे.
- ग्राहकांनी कॉलिंग आणि एसएमएससाठी राष्ट्रीय आपत्काली क्रमांकापैकी 111 हा राखीव क्रमांक असल्याने हा हेल्पलाईन क्रमांक वापरू नये, असे वोडाफोनने कळवले आहे.
- 100 आणि 108 या आग, अपघात आणि वैद्यकीय मदतीशी संबंधित क्रमांकापैकी एक क्रमांक अंतिम करण्याचा सल्लाही अपेक्षित आहे.
- 111 क्रमांक नसल्यानेच ट्रायने 112 क्रमांक आपत्कालीन म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
- सध्या देशभरात एमर्जन्सी क्रमांकात 100 क्रमांक पोलिसांसाठी तर 101 क्रमांक आगीशी संबंधित आहे.
अंदमान-निकोबार बेटांना भूकंपाचा धक्का :
- अंदमान-निकोबार बेटांना शुक्रवार 5.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला.
- पण या भूकंपात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
- भूकंपाचा केंद्रबिंदू पोर्ट ब्लेअरपासून 135 किमी अंतरावर होता.
- तसेच शुक्रवारी पापुआ न्यू गिनिआमध्ये 7.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला होता.
एक फॉर्म प्रणाली कार्यान्वित :
- नवीन कंपनी सुरू करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आता एक फॉर्म प्रणाली कार्यान्वित केली आहे.
- यामुळे अर्ज केल्यापासून कंपनी स्थापन करण्याच्या प्रक्रियेतील कालावधी कमी होणार आहे.
- ‘आयएनसी-29’ असे या फॉर्मचे नाव असून फॉर्म कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
ई-बालभारती मंडळ स्थापन :
- बालभारती मंडळात ई-लर्निंग सुविधा निर्माण करून ई-बालभारती मंडळ स्थापन करण्याचा विचार आहे.
- शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी त्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
- तसेच या समितीत संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, डॉ. अनिल काकोडकर यांचा समावेश करण्यात येणार आहे.
‘मॅसेंजर’ अंतराळ यान बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर कोसाळले :
- 11 वर्षांपासून सुरू असलेली अंतराळ मोहीम नासाचे ‘मॅसेंजर’ हे अंतराळ यान बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर कोसळल्याने संपुष्टात आली आहे.
- मेरीलँड येथील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी अप्लाईड फिजिक्स लेबॉरेटरीच्या नियंत्रणकर्त्यांनी या घटनेची माहिती दिली आहे.
- मरक्युरी सरफेस, स्पेस एनव्हायर्नमेंट,जिओकेमिस्ट्री अॅण्ड रेंजिंग असे या यनाचे नाव होते.
- 3 ऑगस्ट 2004 रोजी मॅसेंजरचे प्रक्षेपण करण्यात आले होते.
- तसेच अंतराळ यानाने 18 मार्च 2011 रोजी बुध ग्रहाच्या कक्षेत फिरणे सुरू केले व मॅसेंजरने मार्च 2012 पर्यत आपले प्राथमिक लक्ष्य साध्य केले होते.
भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान :
- भालचंद्र नेमाडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुवर्णमहोत्सवी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला.
- भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष.
- मराठी साहित्यिकांच्या मांदियाळीमध्ये हा पुरस्कार मिळविणारे भालचंद्र नेमाडे चौथे साहित्यिक आहेत. यापूर्वी वि. स. खांडेकर, कविवर्य कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
- शाल, श्रीफळ, प्रशस्तिपत्र, सरस्वतीची प्रतिमा आणि 11 लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे.