Current Affairs of 1 December 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (1 डिसेंबर 2017)
देशात सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात :
- सरलेल्या 2016 मध्ये अपेक्षेप्रमाणे देशातील सर्वाधिक जास्त गुन्ह्य़ांची नोंद उत्तर प्रदेशात झाली, पण गुन्ह्य़ांचे सर्वाधिक कमी प्रमाणही उत्तर प्रदेशाने नोंदविले.
- तसेच त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळमध्ये गुन्ह्य़ांची नोंद झाल्याची माहिती देणारा सर्वंकष अहवाल राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) 30 नोव्हेंबर रोजी प्रकाशित केला.
- महिलांवरील अत्याचारांच्या आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली नोंदविलेल्या गुन्ह्य़ांच्या संख्येतही किंचित वाढ झाल्याचे अहवाल सांगतो.
- 2016 मधील एकूण गुन्ह्य़ांची संख्या 48 लाख 31 हजार 515 इतकी आहे. 2015मध्ये हीच संख्या 47 लाख 10 हजार 676 इतकी होती. म्हणजे गुन्ह्य़ांमध्ये 2.6 टक्क्यांनी वाढ झाली. त्यापैकी उत्तर प्रदेशात 2 लाख 82 हजार गुन्ह्य़ांची नोंद आहे.
Must Read (नक्की वाचा):
राज्यात आजपासून मौखिक आरोग्य तपासणी :
- मौखिक आरोग्याशी निगडित आजारांच्या गांभीर्याने विचार करून राज्यात 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय प्रारंभ एक डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता मालवणी मालाड येथील सामान्य रुग्णालयात करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
- या कालावधीत संपूर्ण राज्यात 30 वर्षांवरील स्त्री व पुरुषांची तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी सर्व शासकीय, महापालिका, नगरपालिकेच्या दवाखान्यांत मोफत उपलब्ध असणार आहे.
- तसेच गाव पातळीवर ही तपासणी एएनएम व एमपीडब्ल्यू यांच्यामार्फत करून गरजू लोकांना पुढील उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात पाठविण्यात येणार आहे.
- डॉ. सावंत म्हणाले, ‘आपल्या देशात प्रामुख्याने आढळणाऱ्या कर्करोगामध्ये स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि मुखाचा कर्करोग यांचा समावेश होतो. तोंडाच्या कर्करोगामध्ये लवकर निदान आणि वेळेत योग्य ते उपचार केल्यास तो बरा होण्याचे प्रमाण हे साधारणत: 70 ते 75 टक्के असते. यासाठी राज्यात हे अभियान प्रभावीपणे राबविले जाईल.’
नांदेड-मुंबई-नांदेड विमानसेवा सुरू :
- ‘उडान’ योजनेत समाविष्ट असलेल्या नांदेड येथील श्री गुरुगोविंद सिंगजी विमानतळावरून नांदेड-मुंबई-नांदेड अशी विमानसेवा सुरू झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, तसेच सामान्य प्रशासन विभागाने दिली.
- नांदेड येथील विमानतळावरून ‘ट्रू जेट’ या विमान कंपनीकडून दररोज नांदेड-मुंबई-नांदेड अशी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या 72 आसनी विमानातील सुमारे 75 टक्के जागा आरक्षित झाल्या होत्या. नांदेड ते हैदराबाद ही 72 आसनी विमानसेवा यापूर्वी 27 एप्रिल 2017 पासून सुरू करण्यात आली आहे. आता नांदेड-मुंबई विमानसेवेमुळे नांदेड हे शहर मुंबई आणि हैदराबाद या मोठ्या शहरांशी हवाई वाहतुकीद्वारे जोडले गेले आहे.
राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभारणार :
- राज्यात विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण देण्यासाठी स्थानिक संस्थांच्या, आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग, शालेय शिक्षण विभाग यांच्या शाळांमधून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शंभर शाळा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शाळा निवडीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत.
- या प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा कशा असतील याचे उत्तम उदाहण राज्यांसमोर ठेवतील अशा दहा शाळा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- प्रत्येक विभागनिहाय निर्माण होणाऱ्या शाळा मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या या शाळांना ‘ओजस शाळा’ संबोधले जाईल. आंतरराष्ट्रीय शाळांना महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षाकडून मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल.
- तसेच ओजस शाळा व त्यांच्या परिसरातील इतर नऊ आंतरराष्ट्रीय शाळा दर्जा प्राप्त करण्यासाठी मदत करणार आहेत. या नऊ शाळांना ‘तेजस शाळा’ म्हणून ओळखले जाईल.
गोदावरी खोरे एकात्मिक जल आराखड्यास मान्यता :
- पश्चिम खोऱ्यातील नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यास मान्यता देण्याबरोबर गोदावरी खोऱ्यातील एकात्मिक जल आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.
- तसेच गोदावरी खोऱ्यातील पाण्याचा उपयोग मराठवाड्यातील गावांनाही होण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश देऊन हा देशातील पहिला जल आराखडा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
- मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य जल परिषदेची बैठक सह्याद्री अतिथिगृह येथे झाली. महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरणांच्या सूचनांनुसार राज्यातील जलआराखडा तयार होणे प्रस्तावित होते. त्यानुसार राज्यातील पाच खोऱ्यातील जल आराखडे तयार करून एकत्रित करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी एकात्मिक राज्य जल आराखड्यांतर्गत गोदावरी खोरे जल आराखड्यास मान्यता देण्यात आली.
दिनविशेष :
- 1 डिसेंबर हा दिवस भारतात ‘लोकशिक्षण दिन’ म्हणून साजरा करतात.
- 1 डिसेंबर हा दिवस ‘एड्स प्रतिबंधक दिन’ म्हणून पाळला जातो.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा