9 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs
9 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 जानेवारी 2023)
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची सूत्रे रोहित पवारांकडे:
- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दोन नातवांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत आ.रोहित पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली.
- त्यामुळे मुंबई क्रिकेट संघटनेपाठोपाठ महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतही राजकारणाचा विजय झाल्याचे स्पष्ट झाले.
- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची सूत्रे राजकीय व्यक्तीच्या हाती जाण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
- निवडणुकीत रोहित पवारांनी एकतर्फी बाजी मारली.
Must Read (नक्की वाचा):
सूर्यकुमार यादवचा नवा विश्वविक्रम:
- भारत आणि श्रीलंका संघांत तिसरा टी-20 सामना खेळला गेला.
- या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला 91 धावांनी पराभूत केले.
- त्याचबरोबर तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली.
- भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही.
- सूर्यकुमार यादवने राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 45 चेंडूत शतक पूर्ण केले.
- असे केल्याने तो भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला.
- त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याने शतक झळकावून इतिहास रचला, कारण त्याच्याआधी कोणत्याही फलंदाजाला सलामीशिवाय 3 शतके झळकावता आलेली नाहीत.
- भारतासाठी सर्वाधिक शतके करणारा सूर्या हा दुसरा फलंदाज ठरला आहे.
- आता त्याच्या पुढे फक्त रोहित शर्मा आहे, ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 शतके झळकावली आहेत.
दिनविशेष:
- सन 1870 मध्ये मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले.
- महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचा जन्म 9 जानेवारी 1900 रोजी झाला होता.
- इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा जन्म 9 जानेवारी 1901 मध्ये पनवेल येथे झाला.
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक 9 जानेवारी 1926 रोजी मुंबईत सुरू केले.
- सन 1966 मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.