8 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs
8 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (8 जानेवारी 2023)
अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षपदी मॅकार्थी:
- अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षपदी केव्हिन मॅकार्थी यांची निवड झाली.
- या पदासाठी शनिवारी झालेल्या मतदानाच्या ऐतिहासिक 15 व्या फेरीत त्यांना हे यश मिळाले.
- मॅकार्थीनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या 82 वर्षीय नॅन्सी पलोसी यांच्याकडून सूत्रे घेतली.
- 8 नोव्हेंबर रोजी झालेल्या मध्यावधी निवडणुकीनंतर पलोसी यांनी सभागृहातील आपले बहुमत गमावले होते.
Must Read (नक्की वाचा):
चेतन शर्मा निवड समिती अध्यक्षपदी कायम:
- ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संपूर्ण निवड समिती बरखास्त केल्याच्या दोन महिन्यांनंतर चेतन शर्मा यांना शनिवारी वरिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा देण्यात आली.
- शर्मा यांनी निवड झाली असली तरीही त्यांच्या समितीत नवीन चेहरे पाहण्यास मिळतील.
- दक्षिण विभागातून कनिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष एस.शरथ यांना स्थान देण्यात आले आहे.
- समितीत पूर्व विभागातून माजी वेगवान गोलंदाज सुब्रतो बॅनर्जी, पश्चिम विभागातून सलिल अंकोला आणि मध्य विभागातून कसोटी सलामी फलंदाज शिव सुंदर दास यांना स्थान देण्यात आले आहे.
- दासने ओदिशाकडून खेळल्यानंतर विदर्भचे प्रतिनिधित्व केले.
दुबई स्पर्धेनंतर सानियाची निवृत्ती:
- भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने पुढील महिन्यात होणाऱ्या दुबई टेनिस स्पर्धेनंतर आपल्या टेनिस कारकीर्दीचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे.
- दुबई टेनिस स्पर्धा ही आपल्या कारकीर्दीमधील अखेरची स्पर्धा असेल, असे सानियाने ‘डब्ल्यूटीए’ला कळवले आहे.
- गेल्या हंगामाच्या अखेरीस सानियाने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. पण, कोपराच्या दुखापतीमुळे तिला अमेरिकन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.
- सानियाने कारकीर्दीत तीन महिला आणि तीन मिश्र दुहेरी अशी सहा प्रमुख स्पर्धेत विजेतेपद मिळविली आहेत.
श्रेयस अय्यरला एक नव्हे तर मिळाले पाच पुरस्कार:
- भारत आणि श्रीलंका संघांत 10 जानेवारीपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.
- या मालिकेत तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. वनडे मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडूंनी तयारी सुरू केली आहे.
- श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत स्थान मिळवणाऱ्या श्रेयस अय्यरला या मालिकेपूर्वी पाच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
- भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरला वार्षिक मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) पुरस्कार कार्यक्रमात पाच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
- मुंबई क्रिकेट असोसिएशनने शुक्रवारी रात्री आयोजित केलेल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात (एमसीए वार्षिक पुरस्कार) त्याला 8 पुरस्कार मिळाले.
- त्याचबरोबर युवा खेळाडू पृथ्वी शॉला 9 पुरस्कार मिळाले.
- सरफराज आणि त्याच्या भावाने डझनाहून अधिक पुरस्कारांवर कब्जा केला.
- याशिवाय श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज धवन कुलकर्णी यांच्याशिवाय भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही सन्मान करण्यात आला.
दिनविशेष:
- सन 1828 मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ डेमोक्रॅटिक पार्टी सुरु झाली.
- ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिल्या लेखिका आशापूर्णा देवी यांचा जन्म 8 जानेवारी 1909 मध्ये झाला होता.
- राजस्थान विद्यापीठाची स्थापना सन 1947 मध्ये झाली.
- सन 2000 मध्ये लता मंगेशकर यांची 1999 साठीच्या एन.टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
- भारत व व्हिएतनाम दरम्यान सन 2001 मध्ये सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.