10 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

मेरी कोम
मेरी कोम

10 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (10 जानेवारी 2023)

बागकामामुळे कर्करोगाचा धोका कमी:

 • एखाद्या छंदात स्वत:ला गुंतवून घेतले आणि त्याचा आनंद घेत राहिला की मानसिक आरोग्य सुधारते.
 • बागकाम हा छंद जोपासणाऱ्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यात सुधारणा तर होतेच, पण त्यांना कर्करोगाचा धोका कमी असतो, असे एका संशोधनात दिसून आले.
 • अमेरिकन कर्करोग सोसायटी आणि ‘बार्सिलोना इन्स्टिटय़ूट फॉर ग्लोबल हेल्थ’च्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे.
 • सामुदायिक बागकाम केल्याने अधिक फायबर खाल्ले जाते आणि शारीरिक हालचाली अधिक होतात, असे या संशोधकांनी केलेल्या चाचणीतून प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
 • त्यामुळे कर्करोग आणि जुनाट आजारांचा धोका कमी होतो आणि मानसिक आरोग्यही सुधारते, असे या संशोधकांचे म्हणणे आहे.
 • बागकामामुळे तणाव आणि चिंतेची पातळीही लक्षणीयरीत्या कमी होते, असे या संशोधकांनी सांगितले.
 • ‘लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नल’मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

काश्मिरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ विजेते कवी रेहमान राही यांचे निधन:

 • काश्मीरचे प्रसिद्ध कवी व काश्मिरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रा. रेहमान राही यांचे सोमवारी येथे निधन झाले.
 • 6 मे 1925 रोजी जन्मलेल्या प्रा. राही यांचे अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
 • इतर भाषांतील काही नामांकित कवींच्या कवितांनाही त्यांनी काश्मिरी भाषेत अनुवादित केले.
 • 2007 मध्ये त्यांना ‘सियाह रूद ज़रीन मंज़’ (इन ब्लॅक ड्रिझल) या काव्यसंग्रहासाठी देशातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान- ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
 • त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना 2000 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
 • प्रा. राही यांना 1961 मध्ये त्यांच्या ‘नवरोज़-ए-सबा’ या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
 • त्यांनी बाबा फरीद यांच्या रचनांचा काश्मिरी भाषेत अनुवाद केला आहे.

मेरी कोमची वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधून माघार:

 • सहा वेळा विश्वविजेती महिला बॉक्सर मेरी कोमने दुखापतीमुळे यंदाच्या बॉक्सिंग महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे.
 • जागतिक चॅम्पियनशिपमध्ये एकूण आठ पदके जिंकणाऱ्या 40 वर्षीय मेरीने दुखापतीच्या स्वरूपाबाबत स्पष्टीकरण दिले नाही.
 • आईबीए (IBA) वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा यावर्षी 1 ते 15 मे दरम्यान ताश्कंद, उझबेकिस्तान येथे होणार आहे.
 • गुडघ्याच्या दुखापतीमुळे निवड चाचणीतून माघार घ्यावी लागल्याने मेरी कोमला गेल्या वर्षी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.
 • पहिल्या सात जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ती एकमेव महिला बॉक्सर आहे.
 • आठ जागतिक चॅम्पियनशिप पदके जिंकणारी एकमेव बॉक्सर (पुरुष किंवा महिला) आहे.
 • दक्षिण कोरियाच्या इंचॉन येथे 2014 च्या आशियाई खेळांमध्ये सुवर्ण जिंकणारी मेरी पहिली भारतीय महिला बॉक्सर आणि 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरली.

दिनविशेष :

 • 10 जानेवारी 1666 मध्ये सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.
 • पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास 10 जानेवारी 1730 मध्ये सुरुवात झाली.
 • 10 जानेवारी 1806 मध्ये केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.
 • 10 जानेवारी 1926 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
 • भारत व पाकिस्तान यांच्यात 10 जानेवारी 1966 मध्ये ताश्कंद करार झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.