6 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
6 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (6 जुलै 2019)
लवकरच 20 रुपयाचे नाणेही चलनात येणार :
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी नवीन नाणी चलनात येणार असल्याची माहिती दिली.
- तर विशेष म्हणजे सध्या चलनात असणाऱ्या नाण्यांबरोबर पहिल्यांदाच 20 रुपयाचे नाणे चलनात येणार असल्याची माहिती सीतारमन यांनी संसदेमध्ये दिली.
- तसेच लवकरच नवीन नाणी चलनात येणार आहेत. यामध्ये 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपयांच्या नाण्याबरोबरच 20 रुपयाचे नाणेही चलनात येणार आहे,’ असं सितारमन यांनी सांगितले.
- तसेच ही नवीन नाणी अंधांना ओळखता येतील अशाप्रकारचे त्यांची निर्मिती केली जाणार आहे असंही सितारमन यांनी सांगितले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच वर्षी 7 मार्च रोजी या नव्या नाण्यांचे अनावरण केले. अंध आणि दिव्यांगांना ही नाणी ओळखता यावी म्हणून नाण्यांच्या डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आले असून त्यामुळे त्यांना ही नाणी ओळखणे
अधिक सोपे जाणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
संरक्षण खात्यासाठीची तरतूद 8 टक्क्य़ांनी वाढली :
- पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्रीपदाचा कारभार हाताळण्यापूर्वी राखलेल्या खात्याकरिता अधिक तरतूद करण्याचे पाऊल निर्मला सीतारामन यांनी उचलले आहे. संरक्षण खात्याकरिता यंदा 3.18 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यंदा ती जवळपास 8 टक्क्य़ांनी वाढविण्यात आली आहे.
- यंदा करण्यात आलेल्या तरतुदीव्यतिरिक्त 1.12 लाख कोटी रुपये हे निवृत्तीवेतनाकरिता स्वतंत्र राखून ठेवण्यात आले आहेत. निवृत्ती वेतन धरून संरक्षण खात्यासाठीची एकूण तरतूद चालू वर्षांसाठी 4.31 लाख कोटी रुपये होत आहे. केंद्र
सरकारच्या 2019-20 मधील एकूण भांडवली खर्चाच्या तुलनेत हे प्रमाण 15.47 टक्क आहे. - तसेच गेल्या वित्त वर्षांत संरक्षण खात्याकरिता 2.97 लाख कोटी रुपयांची तरतूद होती. यंदा ती वाढविण्यात आली आहे.
- वाढविण्यात आलेल्या रकमेपैकी 1.08 लाख कोटी रुपये हे नवीन शस्त्रखरेदी, सैन्य दलाकरिता उपकरण आदींसाठी
राखून ठेवण्यात आले आहेत. वेतन, देखभाल आदींसह एकूण महसुली खर्च 2.10 लाख कोटी अपेक्षित करण्यात आला आहे.
शाकीब अल-हसनने मोडला सचिनचा विक्रम :
- बांगलादेशचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनने अखेरच्या साखळी सामन्यातही आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखला आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्धशतक झळकावताना शाकीबने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.
- विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा, 50 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शाकीबने सचिनला मागे टाकलं आहे.
- 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सचिनने 11 डावांमध्ये 7 अर्धशतकी खेळी केल्या होत्या. तर यंदाच्या स्पर्धेत शाकीबने 8 डावांमध्ये 7 वेळा अर्धशतकी खेळी केली आहे.
शोएब मलिकची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती :
- बांगलादेश पाकिस्तान सामन्यात विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान संघातील खेळाडू शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे.
- 35 कसोटी, 287 एकदिवसीय आणि 111 टी -20 मधील अनुभवी खेळाडू शोएब मलिकने 20 वर्षांच्या करियरनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
- तसेच यंदाच्या क्रिकेट विश्वचषकात शोएब मलिकला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. भारताविद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने शोएब मलिकला शून्यवरच त्रिफळाचीत केले होते.
कर-विवादांच्या निवारणासाठी ‘अभय योजना’ :
- सेवा कर आणि उत्पादन शुल्कासंबंधी प्रलंबित कर-विवादांशी निगडित 3.75 लाख कोटी रुपयांचा महसूल तंटामुक्त करण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पाद्वारे ‘सबका विश्वास लीगसी डिस्प्युट रिझोल्यूशन स्कीम 2019’ नावाने अभय योजना प्रस्तावित केली.
- तर थकीत करासंबंधी स्वच्छेने घोषणा करदात्यांकडून केली जाणे अपेक्षित असून, प्रत्येक प्रकरणागणिक थकीत कराच्या रकमेतून 40 टक्के ते 70 टक्के इतकी सवलत या अभय योजनेमार्फत दिली जाणार आहे. शिवाय थकीत रकमेवर व्याज आणि दंडात्मक शुल्कातून सवलत प्रस्तावित केली गेली आहे.
- तसेच उत्पादन शुल्क आणि सेवा करासह अन्य 15 प्रकारचे कर हे 1 जुलै 2017 पासून वस्तू आणि सेवा कर अर्थात ‘जीएसटी’मध्ये सम्मिलित केले गेले आहेत. तथापि त्याआधीपासून या करांचा भरणा करण्यासंदर्भात सुरू असलेल्या
न्यायालयीन कज्जे आणि विवादांमुळे सरकारच्या तिजोरीत येऊ शकणारा 3.75 लाख कोटी रुपयांचा महसूल रखडला आहे.
दिनविशेष :
- सन 1785 मध्ये ‘डॉलर‘ हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले.
- सन 1892 मध्ये ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली होती.
- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची 6 जुलै 1917 मध्ये पुणे येथे स्थापना झाली.
- सन 1982 मध्ये पुणे-मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.
- चीन युद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथू ला ही खिंड सन 2006 मध्ये तब्बल 44 वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा