8 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

8 July 2019 Current Affairs In Marathi

8 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (8 जुलै 2019)

आधार क्रमांकाने विवरणपत्र भरणाऱ्यांना पॅन क्रमांक आपोआप मिळणार :

  • आधार क्रमांकाच्या मदतीने विवरण पत्र भरणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीकर विभागाकडून नवीन पॅन क्रमांक स्वत:हून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष प्रमोद चंद्र मोदी यांनी सांगितले.
  • तसेच ज्या करदात्यांकडे पॅन क्रमांक नाही त्यांना आधार क्रमांकाच्या मदतीने प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची मुभा देण्याची घोषणा केंद्राय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
  • तर करविवरण पत्र भरण्यासाठी आधारची बायोमेट्रिक ओळख पुरेशी आहे, असे सांगण्यात आले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 जुलै 2019)

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत जयपूर शहराचा समावेश :

  • गुलाबी रंगाचे शहर म्हणून ओळख असलेल्या जयपूरला युनेस्को वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे.
    तर वास्तुरचना व संवेदनशील संस्कृती यांचा वारसा जयपूरला लाभलेला आहे.
  • तसेच युनेस्कोने ट्विटमध्ये म्हटले आहे,की राजस्थानातील जयपूर शहराची निवड वारसा स्थळांच्या यादीत केली आहे.
  • युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक अझरबैजान येथील बाकू येथे 30 जूनला सुरू झाली असून 10 जुलै
    पर्यंत चालणार आहे. त्यात जयपूर शहराच्या प्रस्तावावर विचार करण्यात आला व त्यानंतर या शहराला यादीत समाविष्ट करण्यात आले.
  • तर आतापर्यंत 167 देशातील 1092 ठिकाणांची निवड युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये झाली आहे.
  • जयपूर हे राजस्थानातील ऐतिहासिक शहर असून त्याची स्थापना सवाई जयसिंग द्वितीय यांनी इ.स 1727 मध्ये केली. सांस्कृतिकदृष्टय़ा संपन्न असलेल्या राजस्थानची ती राजधानी असून शहर नियोजन व वास्तूकला या मुद्दय़ांवर
    जयपूरची शिफारस करण्यात आली होती. जयपूर शहर हे मध्ययुगीन व्यापार शहराचे दक्षिण आशियातील प्रतीक असून व्यापाराच्या नव्या संकल्पना तेथे उदयास आल्या. येथील पारंपरिक कलांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यता आहे.

रोहित शर्माने रचला नवा इतिहास :

  • भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने विश्वचषक स्पर्धा 2019 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शतक ठोकले. या स्पर्धेतील हे रोहितचे पाचवे शतक ठरले.
  • तर दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेश या 4 संघांविरुद्ध त्याने शतक लगावले होते. मात्र सामन्यात त्याने स्पर्धेतील पाचवे शतक ठोकले आणि एका विश्वचषक स्पर्धेत 5 शतके ठोकणारा जगातील पहिला फलंदाज
    होण्याचा बहुमान मिळवला.

दिनविशेष :

  • 8 जुलै 1497 ला वास्को द गामा भारताच्या पहिल्या सफरीवर निघाले.
  • 8 जुलै 1889 मध्ये द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 8 जुलै 1910 ला मोरिया या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
  • रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी 8 जुलै 2006 मध्ये चलनात आली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 जुलै 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.