5 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

5 July 2019 Current Affairs In Marathi

5 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 जुलै 2019)

निर्मला सीतारामन मांडणार पहिला अर्थसंकल्प :

 • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
 • तर या अर्थसंकल्पात काय काय तरतुदी असणार? शेतकऱ्यांसाठी काय घोषणा केल्या जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 • सकाळी 11 वाजता निर्मला सीतारामन आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरूवात करतील.
 • तसेच गुरूवारी जो आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला त्यामध्ये मोदी सरकारने अर्थव्यवस्थेसंदर्भातली सरकारची दिशा आणि धोरण स्पष्ट केलं आहे
 • ब्रिटिशांच्या काळापासून संध्याकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा होती. मात्र 2001 मध्ये यशवंत सिन्हा यांनी ही परंपरा बदलून 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची नवी परंपरा सुरू केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 जुलै 2019)

बँकेची परीक्षा आता मराठीतूनही होणार :

 • बँक भरतीची परिक्षा देणाऱ्या राज्यातील उमेदवारांसाठी खूशखबर आहे. कारण, सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतून घेतल्या जाणाऱ्या विभागीय ग्रामीण बँकांच्या परिक्षा आता मराठीतही होणार आहेत.
 • तर केंद्र सरकारने हा महत्वूपर्ण निर्णय घेतला असून त्यामुळे बँकेत अधिकारी होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना याचा मोठा फायदा होणार आहे.
 • तसेच मराठीसह इतर 13 प्रादेशीक भाषांमधूनही या परिक्षा घेतल्या जाणार आहेत.
 • केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता, मराठीसह उर्दू, तेलुगू, तमिळ, पंजाबी, ओडिया, मणीपूरी, मल्याळम, कोंकणी, कन्नड, गुजराती, बंगाली आणि आसामी या भाषांमधून विभागीय ग्रामीण बँकांच्या परिक्षा होणार आहेत.
 • परिक्षेतील अडथळे कमी होऊन स्थानिक तरुणांना बँकांमध्ये रोजगाराची संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लोकसभेत सांगितले.

ख्रिस गेलचा विश्वचषकाला अलविदा :

 • वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाजल ख्रिस गेलचा विश्वचषकातील अखेरचा सामना होता. विश्वचषकातील आपला अखेरचा सामना जिंकण्याचे भाग्य गेलच्या नशिबी होते. सामना संपल्यावर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी गेलला मिठी मारली.
 • त्याचबरोबर विजयानंतर सामन्यातील चेंडू गेलला भेट देण्यात आला.
 • वेस्ट इंडिने आपल्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवत विश्वचषकाचा शेवट गोड केला. दुसरीकडे अफगाणिस्तानला मात्र गुणांचा भोपळा फोडता आला नाही. कारण अफगाणिस्तानला विश्वचषकात एकही विजय मिळवता आला नाही.
 • वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथण फलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या इव्हिन लुईस (58), शे होप (77) आणि निकोलस पुरन (58) यांनी अर्धशतक झळकावल्यामुळे त्यांना तिनशे धावांचा टप्पा गाठता आला. जेसन होल्डरने जलदगतीने 45 धावांची खेळी साकारल्यामुळे वेस्ट इंडिजला अफगाणिस्तानपुढे 312 धावांचे आव्हान ठेवता आले.

ब्रायन लारा यांना ‘डी.वाय’ची डॉक्टरेट :

 • वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपट्ट ब्रायन लारा यांना डॉ. डी.वाय पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवीने समान्मित करण्यात आले. विद्यापीठाचे कुलपती डॉ.विजय पाटील यांच्या हस्ते ही पदावी प्रदान करण्यात आली.
 • तर नेरुळ येथे पदवीप्रदान समारंभ झाला. यावेळी संस्थेच्या विश्वस्त शिवानी पाटील, क्रिकेटपट्ट अ‍ॅबी कुरुविल्ला, विद्यापीठाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
 • तसेच भारतात मला मिळालेल्या प्रेमाने व आपुलकीने मी भारावून गेलो असून हे प्रेम कायमस्वरूपी स्मरणात राहणार असल्याचे यावेळी लारा यांनी सांगितले. तर विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील यांनी ब्रायन लाराच्या भेटीने व
  त्याच्या खेळावरील प्रचंड प्रेमामुळे खेळासाठी आणखी भरीव कार्य करण्याची नवी ऊर्मी मिळाली असे सांगितले.

दिनविशेष :

 • सन 1913 मध्ये बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.
 • आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना 5 जुलै 1954 मध्ये झाली.
 • बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन 5 जुलै 1954 मध्ये प्रसारित केले.
 • सन 1975 मध्ये 5 जुलै रोजी भारतातून देवी रोग पूर्णपणे बरा झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 जुलै 2019)

You might also like
2 Comments
 1. Omkar Bhoyane says

  Me registration kele ZP bharti sathi ani online payment pan,kele Rs.500/. Pan mpsc world chya site varun maze hall tikit ani admit card download hot nahi, mag mala exam baddal kase kalnar please mala solution sanga.

  1. Dhanshri Patil says

   ZP exam hall ticket ajun available jhalele nahi. Jevha hoil tevha kalawinyat yeil. Dhanyawaad.

Leave A Reply

Your email address will not be published.