4 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

4 July 2019 Current Affairs In Marathi

4 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 जुलै 2019)

अशोक चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा :

 • लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती त्यांनी पक्षनेतृत्वाला केली आहे.
 • तर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे समजते. त्याबाबत अजून घोषणा झालेली नाही.
 • तसेच चव्हाण यांच्यावर 2015 मध्ये प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. लोकसभा निवडणुकीत पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संघटनेत फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू असून, त्या पाश्र्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 जुलै 2019)

सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीतूनही :

 • सर्वोच्च न्यायालयाचे इंग्रजी भाषेतील निकाल आता प्रादेशिक भाषेत वाचायला मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालय एका सॉफ्टवेअरचे लवकरच अनावरण करत असून त्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल देशभरातील प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरीत केले जाणार आहेत.
 • तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या या सेवेमुळे मराठीमध्येही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल उपलब्ध होतील. या सेवेचा प्रारंभ करण्याबाबतची प्रक्रिया सुरू असून हे अ‍ॅप गुगलच्या भाषांतराच्या अ‍ॅपप्रमाणेच असेल. ते एकाचवेळी सगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये निकाल भाषांतरित करेल.
 • तर या सेवेच्या सकारात्मक परिणामासाठी सर्वोच्च न्यायालय देशभरातील सर्व उच्च न्यायालयांची मदत घेणार आहे.
 • जुलै महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयाकडून या सेवेचा प्रारंभ केला जाईल. या सेवेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाच्या अप्पू घर येथील नव्या कार्यालयात केले जाणार असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल.

पश्चिम बंगालचे नामांतर करण्यास केंद्र सरकारचा नकार :

 • केंद्रसरकारने पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पुन्हा अडचण वाढवली आहे. पश्चिम बंगालचे नामांतर ‘बांग्ला’ करण्याची ममतांची मागणीला केंद्र सरकारने नकार दिला आहे.
 • तसेच केंद्रीय गृह राज्यामंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत बोलताना बंगाल सरकारच्या नामांतराच्या कोणत्याही प्रस्तावला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली नसल्याचे सांगितेले आहे. तसेच राज्याचे नाव बदलण्यासाठी संविधानिक दुरुस्तीची गरज असल्याचे ही ते म्हणाले.
 • तर 29 ऑगस्ट 2016 ला विधानसभेच्या सर्वसाधारण सभेत पश्चिम बंगालचे नाव तीन वेगवेगळ्या भाषेत बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यात बंगालीमध्ये ‘बांग्ला’, इंग्रजीत ‘बेंगाल’ आणि हिंदीत ‘बंगाल’ ठरले होते.
 • मात्र त्यावेळी विरोधात असलेल्या काँग्रेस आणि भाजपने विरोध केला होता. तर केंद्र सरकारने सुद्धा यावेळी आक्षेप घेतला होता. त्या नंतर 26 जुलै 2018 रोजी पश्चिम बंगालच्या विधानसभेने राज्याचे नाव बांग्ला करण्याचा प्रस्ताव पुन्हा मंजूर करण्यात आला.
 • त्यानंतर हा प्रस्ताव मंजूरीसाठी गृह मंत्रालयायकडे पाठवण्यात आला होता. मात्र राज्यसभेत बोलताना नित्यानंद राय यांनी बंगाल सरकारच्या नामांतराच्या कोणत्याही प्रस्तावला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हंगामी अध्यक्ष म्हणून मोतीलाल व्होरा यांची निवड :

 • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काहीही झालं तरी राजीनामा परत घेणार नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर, काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार हंगामी अध्यक्षपदी काँग्रेसचे सर्वात जेष्ठ सरचिटणीस मोतीलाल व्होरा यांची निवड झाली आहे.
 • मात्र, दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या घटनेमध्ये नमूद केल्या प्रमाणे हंगामी अध्यक्ष हे केवळ काँग्रेस कार्यकारिणीच्या पुढील बैठकीपर्यंतच अध्यक्षपदावर राहणार आहेत. तसेच मोतीलाल व्होरा हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.

बीएसएनएल, एमटीएनएलसाठी 74 हजार कोटींचे पॅकेज देणार :

 • डबघाईला आलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी दूरसंचार कंपन्यांसाठी 74 हजार कोटी रुपयांच्या बेलआऊट पॅकेजवर सरकार विचार करीत आहे. या पॅकेजमध्ये हजारो कर्मचाऱ्यांसाठी 5 टक्के अतिरिक्त भरपाईसह
  (एक्स-गॅसिया) आकर्षक स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस), 4जी स्पेक्ट्रम व भांडवली खर्च यांचा समावेश आहे.
 • तसेच बीएसएनएल ही देशातील सर्वाधिक तोटा असलेली सरकारी कंपनी आहे. वित्त वर्ष 2019 मधील कंपनीचा तोटा 13,804 कोटी अनुमानित आहे. 3,398 कोटींच्या तोट्यासह एमटीएनएल तिस-या स्थानी आहे. तर केवळ एअर इंडिया एमटीएनएलच्या वर आहे. विचाराधीन असलेले हे पॅकेज मंजूर झाल्यास सरकारी तिजोरीतून पैसा मिळविण्याच्या बाबतीत या दोन्ही कंपन्या एअर इंडियाला मागे टाकतील.
 • एका उच्चस्तरीय अधिका-याने सांगितले की, या पॅकेजच्या मसुद्याची कॅबिनेट नोट वितरित झाली आहे. या प्रस्तावान्वये दोन्ही कंपन्यांना 20 हजार कोटी किमतीचे 4जी स्पेक्ट्रम दिले जाईल. संचालन खर्चापोटी 13 हजार कोटी दिले जातील.
 • कर्मचाऱ्यांना देण्यात येणार्या व्हीआरएस पॅकेजचा, तसेच मुदतपूर्व निवृत्ती योजनेचा खर्च 40 हजार कोटींपेक्षा जास्त असून, तोही सरकार अदा करील.

दिनविशेष :

 • भारताचे दुसरे पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचा जन्म 4 जुलै 1898 मध्ये झाला होता.
 • सन 1903 मध्ये मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.
 • सन 1947 मध्ये भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.
 • नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान सन 1997 मध्ये मंगळावर उतरले.
 • सन 1999 मध्ये लष्कराच्या 18व्या बटालियनने कारगिलमधील द्रासमधील टायगर हिल्स हा महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 जुलै 2019)

You might also like
1 Comment
 1. Pradeep Bhagawan Bavaskar says

  Jobs

Leave A Reply

Your email address will not be published.