3 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

3 July 2019 Current Affairs In Marathi

3 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 जुलै 2019)

भारताला नाटो देशांचा दर्जा मिळणार :

  • अमेरिकेच्या संसदेने भारताला नाटो देशांच्या समान दर्जा देणारे विधेयक मंजुर केले आहे. त्यामुळे आता संरक्षण क्षेत्राशी निगडीत व्यवहारांमध्ये अमेरिका भारताबरोबर आपले नाटोचे सहकारी देश इस्त्रायल आणि दक्षिण कोरिया
    यांच्याप्रमाणे व्यवहार करेल.
  • तसेच आर्थिक वर्ष 2020 साठी नॅशनल ‘डिफेन्स ऑथरायझेशन अक्ट’ला अमेरिकेच्या सिनेटने गेल्या आठवड्यातच मंजुरी दिली होती. त्यानंतर आता या विधेयकातील संशोधनाच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे.
  • तर सिनेटर जॉन कॉर्निन आणि मार्क वॉर्नर यांनी अमेरिकेच्या संसदेत हे विधेयक सादर केले होते. भारताबरोबर परस्पर सहकार्य, दहशतवादाविरोधात लढा, काऊंटर पायरसी आणि समुद्री सुरक्षेवर भारताबरोबर काम करण्याची आवश्यकता असल्याचे यात नमूद करण्यात आले होते.
  • तसेच भारताला आता नाटो देशाचा दर्जा मिळाल्यामुळे भारत अमेरिकेकडून अत्याधुनिक आणि नव्या तंत्रज्ञानाने युक्त अशी संरक्षण सामग्री खरेदी करू शकणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 जुलै 2019)

सीबीआयचे देशभरातील 50 ठिकाणी छापे :

  • बँकांच्या वाढत्या एनपीएमुळे त्रस्त असलेल्या केंद्र सरकारने आता याबाबत कठोर भूमिका घेतल्याचे दिसत आहे. सीबीआयने बँकांचे मोठ्याप्रमाणात कर्ज असलेल्या कर्जदारांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करत मंगळवारी 12 राज्यांसह केंद्र शासीत प्रदेशातील जवळपास 50 ठिकाणी छापे मारले.
  • सीबीआयने दिल्ली, मुंबई, ठाणे, लुधियाना, वलसाड, पुणे, पलानी, गया, गुडगांव, चंदीगढ, भोपाल, सुरत, कोलार आदी ठिकाणी छापेमारी केली. सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, बँक घोटाळ्यांच्या 14 नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे. ही प्रकरण तब्बल 640 कोटींच्या फसवणुकीची आहेत.

पश्चिम बंगालमध्ये सवर्णांना 10 टक्के आरक्षण लागू :

  • पश्चिम बंगालमधील ममत बॅनर्जींच्या सरकारने केंद्र सरकारच्या विधेयकाला मान्य करुन राज्यात 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. सरकारी नोकरीत सवर्णांन 10 टक्के आरक्षण देण्याचं ममता यांनी मान्य केलं आहे. तसेच पश्चिम बंगाल कॅबिनेट मंत्रालयाने या निर्णयास एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे राज्यातील सवर्णांना नोकरीत 10 टक्के आरक्षण मिळणार आहे.
  • तर ममता बॅनर्जींच्या सरकारने औपचारिपणे मंगळवारी याबाबत घोषणा केली. सरकारच्या या विधेयकामुळे सर्वच समुदायातील लोकांना समानतेने पुढे येण्याचा अधिकार मिळणार आहे. मात्र, पूर्वीपासूनच एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना याचा लाभ मिळणार नाही, असेही या विधेयकात नमूद करण्यात आले आहे.

दिनविशेष :

  • सन 1850 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.
  • महात्मा फुले यांनी 3 जुलै 1852 मध्ये दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.
  • भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ सन 1855 मध्ये झाला.
  • 3 जुलै 1884 मध्ये डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.
  • सन 2006 मध्ये एक्स.पी. 14 हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 जुलै 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.