2 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

2 July 2019 Current Affairs In Marathi

2 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (2 जुलै 2019)

राज्यसभेतही जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट वाढीचा प्रस्ताव मंजूर :

 • राज्यसभेत देखील जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीचा कालावधी सहा महिन्यांसाठी वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. याबरोबरच जम्मू-काश्मीर आरक्षण (सुधारणा) विधेयक 2019 ला देखील मंजुरी मिळाली. गृहमंत्री अमित शहा
  यांनी हे दोन्ही प्रस्ताव राज्यसभेत मांडले होते.
 • तसेच राज्यसभेत सरकारचे बहुमत नव्हते व लोकसभेत या प्रस्तावास काँग्रेससह अन्य विरोधकांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे राज्यसभेत याला मंजुरी मिळण्याची शक्यता कमी वाटत होती. मात्र, राज्यसभेतही हे दोन्ही विधेयक पारीत झाल्याने आता जम्मू-काश्मीरमध्ये 3 जुलै पासून पुढे सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 जुलै 2019)

जपानकडून स्मार्टफोनच्या सुटय़ा भागांची दक्षिण कोरियाला होणारी निर्यात बंद :

 • युद्धकाळात जपानच्या काही कंपन्यांनी कोरियाच्या लोकांना सक्तीने कंपन्यात काम करायला लावल्याच्या प्रकरणातील जुना वाद चिघळला असून जपानने दक्षिण कोरियाला चिप, स्मार्टफोन सुटे भाग यांची निर्यात बंद केली आहे.
 • तर 4 जुलैपासून हा निर्णय अमलात येत आहे. ही बातमी येताच सॅमसंगचा शेअर 0.74 टक्के तर एलजीचा 2.52 टक्क्य़ांनी घसरला आहे. इलेक्ट्रॉनिक व मोबाईल सुटे भाग तयार करणाऱ्या जपानी कंपन्यांचे शेअरही घसरले आहेत.
 • दक्षिण कोरियाच्या न्यायालयांनी युद्धकाळात ज्या जपानी कंपन्यांनी कोरियन लोकांकडून सक्तीने काम करवून घेतले त्यांनी नुकसान भरपाई द्यावी असा निकाल दिला असून जपानने मात्र हा प्रश्न दशकापूर्वीच दोन्ही देशात राजनैतिक संबंध सुरू होताना संपला होता असा दावा केला आहे.
 • तसेच जपानच्या आर्थिक, व्यापार व उद्योग मंत्रालयाने सांगितले,की दक्षिण कोरियाला काही महत्त्वाच्या भागांची निर्यात थांबवण्याचा निर्णय हा आंतरराष्ट्रीय संबंधांना अनुसरूनच घेतला आहे.
 • जपानी कंपन्यांनी तयार केलेले सुटे भाग व इतर वस्तूंच्या एकूण निर्यातीत 10 ते 20 टक्के वाटा दक्षिण कोरियाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू व मोबाईल उत्पादक कंपन्यांचा आहे. त्यामुळे जपानी कंपन्यांना या निर्यातबंदीचा मोठा फटका
  बसणार आहे.

‘व्हॉट्सअ‍ॅप’मुळे मानसिक आरोग्याला फायदा

 • समाजमाध्यमांवर विशेष करून व्हॉट्सअ‍ॅपवर जे लोक जास्त वेळ घालवतात त्यांना एकटेपणा कमी जाणवतो व त्यांचा आत्मसन्मान वाढतो असा दावा अभ्यासात करण्यात आला आहे.
 • ब्रिटनमधील एज हिल विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, जी उपयोजने (अ‍ॅप) गद्य संदेशावर आधारित आहेत त्यांचा मानसिक अवस्थेवर चांगला परिणाम होतो. व्हॉट्सअ‍ॅपवर लोक जितका जास्त वेळ घालवतात तितके त्यांना मित्र व कुटुंबासमवेत असल्यासारखे वाटते त्यांना ते आभासी नातेसंबंध चांगल्या दर्जाचे वाटतात, असे डॉ. लिंडा के यांनी म्हटले आहे .
 • तसेच यातील व्हॉट्सअ‍ॅप समूहात लोक नाते व मैत्रीत बांधले जातात. त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान व सामाजिक सक्षमता वाढते. चोवीस वर्षे वयोगटातील 158 महिला व 41 पुरुष यांचा अभ्यास यात करण्यात आला. इंटरनॅशनल
  जर्नल ऑफ ह्य़ूमन कॉम्प्युटर स्टडीज या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.
 • साधारणपणे यातील लोक रोज पंचावन्न मिनिटे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करीत होते, व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियता व त्यातील गप्पांची सोय यामुळे त्याचा वापर एकूणच समाजात जास्त आहे. व्हॉट्सअ‍ॅप समूहात नाव जोडलेले असणे व त्यावर
  सतत सक्रियता यामुळे संबंधितांना एकटे वाटत नाही. ते सतत निकटच्या मित्रांशी आभासी पद्धतीने जोडलेले राहतात.

महाविद्यालयातच मिळणार लर्निंग लायसन्स :

 • शिकाऊ लायसन्स मिळवताना वाया जाणारा वेळ वाचविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच लर्निंग लायसन्स देण्याचा निण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.
 • परिवहन विभागाच्या धोरणानुसार मुंबई, कल्याण, नाशिक, नागपूर व चंद्रपूर येथील 1317 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्स देण्यात आले असून सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघातील महाविद्यालयामध्ये ही योजना राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत केले.
 • तसेच रावते यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे ही माहिती दिली. वाहन चालवण्याचा परवाना काढण्यापूर्वी वाहनधारकाला संगणकीय चाचणीद्वारे चार्निंग लायसन्स घेणे आवश्यक आहे. पण ते काढण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परिवहन कार्यालयात येऊन संगणकीय चाचणीची प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यात विद्यार्थ्यांचा वेळ जातो. त्यामुळे महाविद्यालयातच त देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला. त्यानुसार राज्यातील सर्व महाविद्यालयात लर्निंग लायसन्स देण्यासाठी शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिल्याचे रावते म्हणाले.

अ‍ॅपमार्फत मिळणार टपालाची रिअल टाइम माहिती

 • टपाल खात्याद्वारे एखादी वस्तू, पार्सल पाठवल्यास ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचले की नाही याबाबत त्याची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी टपाल खात्याच्या पोस्टमन मोबाइल अ‍ॅपचा (पीएमए) लाभ होत आहे.
 • तर हे अ‍ॅप पोस्टमनसाठी तयार केले असून याद्वारे डिलिव्हरी झाल्यानंतर तत्काळ त्याची माहिती या अ‍ॅपवर अपलोड करत ज्यांना पार्सल दिले त्यांची डिजिटल स्वाक्षरी घेतली जाते. त्यामुळे टपालाद्वारे पाठवलेल्या पार्सल व इतर वस्तूंची माहिती आता क्षणाक्षणाला मिळणे शक्य झाले आहे.
 • डिजिटल इंडिया उपक्रमाच्या वर्धापन दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुंबई जीपीओचे संचालक के. मुनीरमय्याह यांनी ही माहिती दिली.
 • मोबाइल अ‍ॅपसाठी राज्यातील सुमारे सव्वासात हजार पोस्टमनना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. पार्सल व इतर वस्तू पोचवल्यानंतर त्वरित त्याची नोंद या अ‍ॅपवर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पूर्वी पोस्टमन सायंकाळी काम संपवून कार्यालयात आल्यावर माहिती अपडेट केली जात होती. आता ही माहिती वेळोवेळी अपडेट होणार असल्याने ती ग्राहकांना मिळू शकेल.
 • तसेच पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँकेच्या (पीओएसबी) खातेदारांसाठी इंटरनेट बँकिंगची सुविधा पुरवण्यात आली असून टपाल खात्याच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये सध्या सुमारे 3 हजार ग्राहकांद्वारे त्याचा लाभ घेतला जात आहे.
 • महाराष्ट्र व गोवा सर्कलच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (आयपीपीबी) 42 शाखांद्वारे व 12 हजार 2 अ‍ॅक्सेस पॉइंटच्या माध्यमातून 5 लाख 36 हजार 465 जणांनी खाते उघडले असून पीओएसबीच्या 71 हजार 531 खातेदारांनी त्यांचे खाते आयपीपीबीला संलग्न केले आहे. याचाच पुढचा भाग म्हणून डिजिटल ग्राम संकल्पना राज्यात राबवण्यात येत आहे.

दिनविशेष :

 • 2 जुलै हा दिवस जागतिक युएफओ (UFO) दिन म्हणून पाळला जातो.
 • सन 1865 मध्ये साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
 • नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे 2 जुलै 1940 मध्ये स्थानबद्ध करण्यात आले.
 • पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सन 1972 मध्ये सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
 • सन 2001 मध्ये बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे 104 फूट उंचीचा बौध्द स्तूप सापडला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 जुलै 2019)

You might also like
2 Comments
 1. Pallavi Yesankar says

  thanks

 2. Vitthal Jadhav says

  Thanks

Leave A Reply

Your email address will not be published.