1 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

1 July 2019 Current Affairs In Marathi

1 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 जुलै 2019)

रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासाठी रशियाशी 200 कोटींचा करार :

  • भारतीय हवाई दलाची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने भारताने रशियासोबत आणखी एक महत्वाचा करार केला आहे. रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासाठी भारताने रशियासोबत 200 कोटी रुपयांचा करार केला आहे.
  • तर त्यानुसार, आणीबाणीच्या परिस्थितीसाठी आपल्या एमआय-35 या लढाऊ हेलिकॉप्टरसाठी रशियाकडून ही रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे (स्ट्रम अटाका) खरेदी केली जाणार आहेत.
  • तसेच 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्लानंतर सरकारकडून तिन्ही सैन्य दालांना आपत्कालीन अधिकार देण्यात आले होते. यानुसार, तिन्ही सैन्य दले आपल्या गरजेनुसार 300 कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे तत्काळ प्रभावाने खरेदी करु
    शकतात.
  • भारताकडून याच आपत्कालीन नियमांचा वापर करुन रशियासोबत स्ट्रम अटाका क्षेपणास्त्रांचा करार करण्यात आला आहे. भारताला येत्या तीन महिन्यांत या क्षेपणास्त्रांचा पुरवठा सुरु होणार आहे. स्ट्रम अटाका हे क्षेपणास्त्र एसआय-35
    हेलिकॉप्टरमध्ये लावल्यानंतर शत्रूचे रणगाडे आणि इतर शस्त्रांपासून वाचण्याची क्षमता वाढणार आहे.
  • तर एमआय-35 भारतीय हवाई दलाचे थेट हल्ला करणारे हेलिकॉप्टर आहे. भारत रशियाकडून इंग्ला-एस एअर डिफेन्स क्षेपणास्त्रही तत्काळ खरेदी करणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 जून 2019)

स्विस बँकांतील निधीत भारत 74 व्या क्रमांकावर :

  • स्वित्झर्लंडमधील मध्यवर्ती स्विस नॅशनल बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार तेथे गुंतवण्यात आलेल्या पैशाचा विचार करता भारताचा 74 वा क्रमांक लागला असून ब्रिटन पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचे स्थान एक अंकाने घसरले आहे.
  • तसेच काळा पैसा ठेवणाऱ्यांसाठी स्वित्झर्लंड हे नंदनवनच मानले जाते.अर्थात ही आकडेवारी अधिकृत असल्याने यात काळ्या पैशाचा अचूक अंदाज येत नाही. शिवाय या आकडेवारीत अनिवासी भारतीय, भारतीय यांनी त्यांच्या परदेशातील संस्थांच्या नावाने ठेवलेला पैसा समाविष्ट नाही.
  • तर 2018 मध्ये जगातून स्विस बँकांत ठेवण्यात आलेला निधी 99 लाख कोटींनी कमी झाला असून ही घसरण 4 टक्के आहे. भारतीय संस्था व व्यक्ती यांनी स्विस बँकात ठेवलेला निधी 6 टक्क्य़ांनी कमी होऊन 2018 मध्ये 6757 कोटी रूपयांवर आला आहे. गेल्या दोन दशकातील ही नीचांकी पातळी आहे.
  • स्विस बँकेत अनेक देशातील संस्था व नागरिकांचा काळा पैसा ठेवलेला आहे. गेल्या वर्षी भारताचा 73 वा क्रमांक लागला होता. वर्षभरापूर्वी भारताचा 88 वा क्रमांक होता पण त्यानंतर तो 73 पर्यंत आला.

‘जीएसटी’मध्ये नवीन सुधारणांची आज घोषणा :

  • वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीस दोन वर्षे पूर्ण होत असताना अर्थ मंत्रालयाने या अप्रत्यक्ष कर पद्धतीत काही सुधारणा करण्याचे ठरवले आहे. नवीन विवरणपत्र पद्धत,रोख खतावणी पद्धतीत सुसूत्रता, एकच कर परतावा वितरण प्रणाली यांचा त्यात समावेश असून याबाबतची घोषणा आज केली जाणार आहे.
  • केंद्रीय अर्थ व कंपनी कामकाज राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे आज विविध खात्यांचे सचिव व अधिकारी यांची बैठक घेणार असून जीएसटी द्विवर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही भूषवणार आहेत.
  • तर भारतीय अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी पद्धतीमुळे आमूलाग्र बदल झाले असून बहुस्तरीय करपद्धत, गुंतागुंतीची अप्रत्यक्ष कररचना यांची जागा साध्या, पारदर्शक, तंत्रज्ञानस्नेही करप्रणालीने घेतली आहे.
  • तसेच अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, 1 जुलै पासून प्रायोगिक तत्त्वावर नवीन करविवरणपत्र प्रणाली राबवली जाणार आहे व ती 1 ऑक्टोबरपासून अनिवार्य करण्यात येईल.

मोहम्मद शमी ठरला पहिला भारतीय गोलंदाज :

  • आतापर्यंत भारताच्या गोलंदाजांना जे जमले नव्हते ते भारताचा वेगवान गोलंदाज मोहमम्द शमीने यंदाच्या विश्वचषकात करून दाखवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तर शमीने पाच फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम केला. पण विश्वचषकात पाच बळी मिळवारा तो सहावा गोलंदाज ठरला.
  • तसेच या सामन्यात शमीने पाच बळी मिळवत शमीने इतिहास रचला आहे. विश्वचषकात एकाच डावात पाच बळी घेणारा शमी भारताचा सहावा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी आशिष नेहरा, व्यंकटेश प्रसाद, युवराज सिंह, रॉबिन सिंह, कपिल देव यांनी विश्वचषकात पाच बळी मिळवले होते.
  • तर विश्वचषकातील सामन्यात पाच बळी मिळवणारा शमीला हा सहावा गोलंदाज ठरला असला तरी सलग तीन सामन्यांमध्ये चारपेक्षा जास्त बळी एकाही भारतीय गोलंदाजाला मिळवता आलेले नाही. त्यामुळे सलग तीन सामन्यांमध्ये चारपेक्षा जास्त बळी मिळवणारा शमी हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर क्रिकेट विश्वातही असा पराक्रम करणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. कारण यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर होता.

दिनविशेष :

  • 1 जुलैमहाराष्ट्र कृषिदिन
  • 1 जुलैभारतीय वैद्य दिन
  • मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना 1 जुलै 1934 मध्ये यश आले.
  • 1 जुलै 1947 मध्ये फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.
  • सोमालिया व घाना हे देश 1 जुलै 1960 मध्ये स्वतंत्र झाले.
  • रवांडा व बुरुंडी हे देश 1 जुलै 1962 मध्ये स्वतंत्र झाले.
  • 1 जुलै 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 जुलै 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.