4 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

स्वांते पाबो
स्वांते पाबो

4 October 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 ऑक्टोबर 2022)

स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर:

 • स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.
 • मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिकतेसंदर्भातील (discoveries concerning the genomes of extinct hominins and human evolution) अभ्यासासाठी त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.
 • नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी याबाबतची घोषणा केली.
 • स्वांते पाबो हे पॅलेओजेनेटीक्सच्या संस्थापकांपैकी एक आहेत.
 • गेल्या वर्षीचे वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेन पेटामूटियम यांना देण्यात आले होते.
 • या दोन्ही संशोधकांना शरीराचे तापमान, दाब आणि वेदना या रिसेप्टर्सचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला होता.

संपूर्ण स्वदेशी बनावटीची लढाऊ हेलिकॉप्टर संरक्षण सेवेत रुजू :

 • संपूर्ण स्वदेशी बनावटीची वजनाने हलकी लढाऊ हेलिकॉप्टर (लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर- एलसीएच) भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सोमवारी दाखल करण्यात आली.
 • एका औपचारिक सोहळय़ात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या हेलिकॉप्टरचे ‘प्रचंड’ असे नामकरण केले.
 • यामुळे हवाई दलाची शक्ती आणखी वाढणार आहे, कारण ही बहुद्देशीय हेलिकॉप्टर विविध प्रकारची क्षेपणास्त्रे आणि शस्त्रसज्ज आहेत.
 • दिवसा आणि रात्रीही कामगिरी बजावण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समध्ये आहे.
 • त्याचबरोबर लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची त्यांची क्षमता असल्यामुळे हवाई दलाची लढाऊ शक्ती लक्षणीयरीत्या वाढेल.
 • वैशिष्टय़े :
  1. हिंदूस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’कडून (एचएएल) विकसित.
  2. अधिक उंचीवरून कामगिरी बजावण्याची क्षमता.
  3. 5.8 टन वजन आणि दोन इंजिन, विविध शस्त्रांच्या वापराची सज्जता.
  4. ‘रडार’ला चकवा देण्याची क्षमता, चिलखती सुरक्षा यंत्रणा
  5. रात्री हल्ला करण्याची क्षमता, आपत्कालीन स्थितीत सुरक्षित उतरवण्याची सोय.

सूर्याच्या वादळी खेळीने आणखी एक रचला इतिहास :

 • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात सुर्यकुमार यादवचे रौद्ररूप पाहायला मिळाले.
 • अवघ्या 22 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली.
 • सूर्यकुमारच्या या वादळी खेळीचा फायदा संघाला विजय मिळवण्यासाठी झालाच, पण त्याच्या नावावर एक मोठा विक्रम देखील नोंदवला गेला आहे.
 • या खेळीच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःच्या 1000 धावाही पूर्ण केल्या आहेत.
 • विशेष म्हणजे सूर्यकुमार सर्वात कमी चेंडूत स्वतःच्या 1000 टी20 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे.
 • त्याने 573 चेंडूत आणि 40 च्या सरासरीने ही कामगिरी केली आहे.
 • यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियान दिग्गज ग्लेन मॅक्सवेल याच्या नावावर होता.
 • आता मॅक्सवेल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला असून सूर्यकुमार पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मयूरी लुटेची पदकांची हॅट्ट्रिक :

 • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
 • सायकलिंगमध्ये महाराष्ट्राने सांघिक, वेटलिफ्टिंगमध्ये कोमल वाळके, ट्रॅम्पोलिनमध्ये आदर्श भोईर, डायव्हिंगमध्ये ऋतिका श्रीरामने सुवर्णपदकाची कमाई केली.
 • खो-खो क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली.
 • सायकलिंगमध्ये मयूरी लुटेचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने सुवर्णपदक पटकावले.
 • या स्पर्धेतील हे मयूरीचे तिसरे पदक ठरले.
 • मयूरीने यापूर्वी वैयक्तिक कांस्य आणि सुवर्णपदक पटकावले होते.

दिनविशेष :

 • महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1221 मध्ये झाला.
 • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 मध्ये झाला.
 • थॉमस एडिसन यांनी 4 सप्टेंबर 1882 मध्ये इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले. तसेच वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.
 • केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म 4 सप्टेंबर 1941 मध्ये झाला.
 • सन 1998 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.
 • रघुराम राजन यांनी सन 2013 मध्ये रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे 23वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला होता.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.