3 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

3 October 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 ऑक्टोबर 2022)

शहर स्वच्छतेत महाराष्ट्र देशात तिसरा :

 • केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणात इंदूर शहराने सलग सहाव्यांदा प्रथम क्रमांक कायम राखला, तर सुरत आणि नवी मुंबई यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.
 • तसेच महाराष्ट्र देशातील तिसरे स्वच्छ राज्य ठरले.
 • ‘स्वच्छ भारत मिशन (नागरी)’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’चा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला.
 • त्यानुसार, ‘स्वच्छतेबाबतची उत्तम कामगिरी’ या श्रेणीत आपले पहिले स्थान मध्य प्रदेशने कायम राखले.
 • तर छत्तीसगड आणि महाराष्ट्र अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची स्वच्छ राज्ये ठरली.
 • दुसरीकडे शंभरहून कमी स्वराज्य संस्था असलेल्या राज्यांच्या श्रेणीत त्रिपुरा अव्वल ठरले.
 • स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

देशात ‘5जी’ सेवा सुरू:

 • देशाच्या संपर्कक्षेत्रात क्रांतिकारी ठरणाऱ्या ‘5जी’ सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाले.
 • ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिलीच प्रणाली आहे.
 • विशेष म्हणजे ही ‘5जी’ प्रणाली वापरून पंतप्रधानांनी परदेशात गाडीही चालवली.
 • भारतीय मोबाइल परिषदेच्या (आयएमसी) व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘5जी’ प्रणालीचे उद्घाटन केले.

मीराबाई चानूचे आणखी एक सुवर्ण :

 • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय पोस्टर गर्ल मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावले.
 • ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने शुक्रवारी 36व्या राष्ट्रीय क्रीडा 2022 मध्ये सुवर्णपदक पटकावले.
 • तिने महिलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत 49 किलो वजनी गटात 191 किलोचा भार उचलून ही किमया साधली.
 • ऑगस्ट 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 84 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 107 किलो वजन उचलून विजेतेपद पटकावले.
 • लक्षणीय बाब म्हणजे मीराबाई ही तिच्या दुसऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे.

क्रिकेटचे हे नऊ नियम बदलले :

 • आयसीसी क्रिकेट समितीने एक ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • पुरूषांबरोबरच महिला क्रिकेट समितीकडे देखील हे पाठवण्यात आले आहेत. त्यांनी देखील या शिफारसींचे समर्थन केले आहे.
 • फलंदाज झेलबाद – जर फलंदाज झेलबाद झाला तर नवीन फलंदाज स्ट्राइकवर येईल. जरी फलंदाजांनी झेल घेण्यापूर्वी एकमेकांना ओलांडले असेल. आता एखादा फलंदाज झेलबाद झाला की पुढचा चेंडू फक्त नवीन फलंदाजाला खेळावा लागेल.
 • चेंडूला लाळ लावण्यावर बंदी – चेंडू चमकण्यासाठी लाळ वापरण्यावर बंदी.
 • स्ट्राइक फंलदाजाने वेळ लावल्यास तो बाद – आता विकेट पडल्यानंतर नवीन फलंदाजाला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन मिनिटांत स्ट्राइक घेण्यासाठी सज्ज व्हावे लागेल, तर टी20 मध्ये ही वेळ पूर्वीप्रमाणेच 90 सेकंद ठेवण्यात आली आहे.
 • खेळपट्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूवर एकही धाव दिली जाणार नाही – जर एखादा फलंदाज चेंडू खेळण्याचा प्रयत्न करताना खेळपट्टीच्या बाहेर गेला तर तो चेंडू बाद चेंडू असेल आणि फलंदाजाला एकही धाव मिळणार नाही.

भारत-दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-20 मालिका भारताला विजयी आघाडी :

 • सूर्यकुमार यादव आणि केएल राहुलच्या फटकेबाज अर्धशतकांच्या बळावर भारताने रविवारी दुसऱ्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 16 धावांनी मात केली.
 • यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
 • भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 3 बाद 237 धावा केल्या.

दिनविशेष:

 • हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 मध्ये झाला.
 • इराकला सन 1932 मध्ये युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
 • जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने सन 1935 या वर्षी इथिओपिया पादाक्रांत केले.
 • सन 1952 मध्ये युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.