6 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

बेटरेझी, मेल्डल, शार्पलेस
बेटरेझी, मेल्डल, शार्पलेस

6 October 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 ऑक्टोबर 2022)

बेटरेझी, मेल्डल, शार्पलेस यांना रसायनशास्त्राचे नोबेल :

 • कॅरोलिन आर. बेटरेझी, मॉर्टन मेल्डल आणि के. बॅरी शार्पलेस या तिघांना यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले.
 • आधी रेणूंना एकत्र आणून त्यांचे विभाजन करण्याची प्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे रॉयल स्विडिश अकॅडमीने जाहीर केले.
 • अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या स्क्रिप्स रिसर्चमधील संशोधक शार्पलेस यांनी सर्वप्रथम रेणूंना एकत्र जोडून त्यानंतर त्यांचे विभाजन करण्याचा सिद्धांत सर्वप्रथम मांडला.
 • मात्र त्यासाठी योग्य रासायनिक ‘बक्कल’ शोधून काढणे, ही समस्या होती. त्यांची एकमेकांशी सहजगत्या प्रतिक्रिया होणे आवश्यक होते.
 • शार्पलेस यांनी डेन्मार्कच्या कोपेनहेगन विद्यापीठातील मेल्डल यांच्यासह एकत्र विभाजित होऊ शकणाऱ्या पहिल्या रेणूंचा शोध लावला.
 • तर कॅलिफोर्नियाच्या स्टँडफोर्ड विद्यापीठातील बेटरेझी यांनी सजीवांमध्ये ही प्रक्रिया उपयोगात आणण्याची पद्धत शोधून काढल्याचे अकॅडमीने पुरस्काराची घोषणा करताना म्हटले.
 • 9 लाख डॉलर आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून 10 डिसेंबरला पुरस्कारांचे वितरण केले जाईल.
 • शार्पलेस यांना 2001 सालीही नोबेलने सन्मानित करण्यात आले असून दोन वेळा पारितोषिक जिंकणारे ते पाचवे संशोधक ठरले आहेत.
 • त्यांना 2019 साली अमेरिकन केमिकल सोसायटीतर्फे देण्यात येणाऱ्या अत्यंत मानाच्या ‘प्रिस्टले पुरस्कारा’नेही गौरवण्यात आले होते.

भौतिक शास्त्रातील संशोधनासाठी तीन शास्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर :

 • अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ क्लॉजर आणि अँटोन झेलिंगर यांना एकमेकांमध्ये अडकलेल्या फोटॉन (Entangled Photons) संदर्भातील अभ्यासासाठी यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
 • अलेन आस्पेक्ट हे फ्रान्सचे मधील स्वेले विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आहेत.
 • तर जॉन एफ क्लॉजर हे अमेरिकेतील शास्रज्ञ आणि अँटोन झेलिंगर हे ऑस्ट्रियातील व्हिएन्ना विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.
 • दरम्यान, गेल्या वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार सौकुरो मानाबे (जपान), क्लोस हेसलमन (जर्मनी) आणि जॉर्जिओ पॅरिसी (इटली) यांना देण्यात आला होता.

श्रीजेश, सविता सर्वोत्कृष्ट गोलरक्षक :

 • भारतीय हॉकी संघांचे गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि सविता पुनियाची आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून (एफआयएच) सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आली.
 • ‘एफआयएच’ने बुधवारी या पुरस्कारांची घोषणा केली.
 • श्रीजेशने ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकी मधील सर्व 16 सामने खेळताना आपले महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध केले.
 • भारताने या स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले.
 • तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने रौप्यपदकाची कमाई केली आणि या स्पर्धेतही श्रीजेश सहाही सामने खेळला होता.
 • ‘एफआयएच’ने घेतलेल्या मतदानात श्रीजेशला सर्वाधिक 39.9 टक्के मते मिळाली.
 • महिला विभागात सविताला सर्वाधिक 37.6 गुण मिळाले.
 • या पुरस्काराला 2014 पासून सुरुवात झाली आणि त्यानंतर हा सन्मान मिळविणारी सविता तिसरी भारतीय खेळाडू ठरली.

राष्ट्रकुल स्पर्धेतून कुस्तीला वगळले :

 • ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे 2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीचे पुनरागमन होणार असून कुस्ती आणि तिरंदाजी या खेळांना मात्र स्पर्धेतून वगळण्यात आले आहे.
 • राष्ट्रकुल क्रीडा महासंघ (सीजीएफ) आणि राष्ट्रकुल क्रीडा ऑस्ट्रेलियाने मिळून बुधवारी 2026च्या स्पर्धेसाठीच्या खेळांची यादी जाहीर केली.
 • यात 20 खेळ आणि 26 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

दिनविशेष:

 • रेडिओटेलेफोनी चे संशोधक रेगिनाल्ड फेसेनडेन यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1866 मध्ये झाला.
 • पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 6 ऑक्टोबर सन 1949 रोजी खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.
 • सन 1963 मध्ये पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.
 • जेसन लुइस याने 2007 या वर्षी वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.