28 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

28 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 डिसेंबर 2022)

नेपाळमध्ये प्रचंड यांना पंतप्रधानपदाची शपथ :

 • नेपाळमध्ये पुष्प कमल दहल ऊर्फ ‘प्रचंड’ यांनी सोमवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
 • रविवारी राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती.
 • प्रचंड यांना नेपाळच्या 275 सदस्यीय प्रतिनिधिगृहात 169 सदस्यांचा पाठिंबा आहे.
 • राष्ट्रपती कार्यालय ‘शीतल निवास’ येथे झालेल्या अधिकृत शपथविधी सोहळय़ात राष्ट्रपती भंडारी यांनी प्रचंड यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
 • नवीन मंत्रिमंडळात तीन उपपंतप्रधान आहेत.
 • ‘सीपीएन-यूएमएल’चे विष्णू पौडेल, ‘सीपीएन-माओवादी सेंटर’चे नारायण काजी श्रेष्ठ आणि राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे (आरएसपी) रवी लामिछाने याची उपपंतप्रधानपदी नियुक्ती झाली.

सीमावादावर महाराष्ट्राकडून अधिवेशनात ठराव संमत :

 • महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर नागपूरमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राने कर्नाटकविरोधात ठराव एकमताने मंजूर केला.
 • इतकंच नाही तर सीमाभागातील मराठी भाषिक गावांवर महाराष्ट्राचा दावाही पुन्हा एकदा अधोरेखित केला.
 • देशातील राज्यांची निर्मिती राज्य पुनर्रचना कायदा 1956 च्या आधारे झाली आहे.
 • नोव्हेंबर 1956 मध्ये राज्यांची पुनर्रचना झाल्यानंतर तत्कालीन मुंबई राज्यातील बेळगाव (चंदगड तालुका वगळून) विजापूर, धारवाड व कारवार हे मराठी भाषिक जिल्हे पूर्वीच्या म्हैसूर राज्यात विलीन करण्यात आले.
 • महाराष्ट्राने खेडे हे एक घटक, भौगोलिक सलगता, मराठी किंवा कन्नड भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्या व लोकेच्छा या सुत्रानुसार फेररचनेची मागणी केली आणि कर्नाटकातील 165 सीमावादीत गावांवर दावा सांगितला आहे.

ट्वेन्टी-20 मालिकेसाठी हार्दिक पंडय़ा कर्णधार :

 • श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी हार्दिक पंडय़ाला कर्णधार करण्यात आले असून, एकदिवसीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे कायम ठेवण्यात आले आहे.
 • निवड समितीने मंगळवारी जाहीर केलेल्या भारतीय संघात ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी मुंबईच्या सूर्यकुमार यादवला उपकर्णधार करण्यात आले आहे.
 • पुण्याच्या ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांना संघात स्थान मिळाले असून, गोलंदाजीत शिवम मावी, मुकेश कुमार, उमरान मलिक या नव्या चेहऱ्यांना पसंती मिळाली.

अश्विन ‘हा’ कारनामा करणारा ठरला जगातील दुसराच खेळाडू :

 • बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने आश्विनच्या शानदार खेळीच्या जोरावर विजय मिळवला.
 • भारताने दुसऱ्या सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवताना, मालिका 2-0 ने आपल्या नावावर केली.
 • या सामन्यात अश्विनने आपल्या 42 धावांचे योगदान दिले.
 • त्याचबरोबर त्याने कसोटी कारकिर्दीत 3000 धावाही पूर्ण केल्या. हे करत त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
 • बांगलादेशविरुद्ध अश्विनने 52 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 42 धावांची नाबाद खेळी साकारली.
 • अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 42 धावांच्या खेळीत 3000 धावाही पूर्ण केल्या.
 • त्याचबरोबर त्याने तीन दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडीत काढले.
 • आता अश्विनने शेन वॉर्न, स्टुअर्ट ब्रॉड, कपिल देव, शॉन पोलॉक यांना मागे टाकले आहे.

100व्या कसोटीत डेव्हिड वॉर्नरचे द्विशतक:

 • ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने क्रिकेट विश्वात इतिहास रचताना एक मोठा विक्रम केला आहे.
 • त्याने आपला 100वा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला, ज्यामध्ये त्याने द्विशतक झळकावले.
 • अशी कामगिरी करणारा तो जगातील 10वा तर ऑस्ट्रेलियाचा दुसरा फलंदाज ठरला आहे.
 • अशाप्रकारे डेव्हिड वॉर्नर आपल्या कारकिर्दीतील 100व्या एकदिवसीय आणि 100व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा जगातील दुसरा आणि ऑस्ट्रेलियातील पहिला खेळाडू ठरला आहे.
 • यापूर्वी ही कामगिरी वेस्ट इंडिजचा सलामीवीर गॉर्डन ग्रीनिजने ही कमाल केली होती.

दिनविशेष:

 • सन 1836 मध्ये स्पेनने मेक्सिको या देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
 • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा राजकीय पक्ष सन 1846 मध्ये स्थापन झाला.
 • प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स चे संस्थापक आणि चेयरमन ‘धीरूभाई अंबानी‘ यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी झाला होता.
 • टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मध्ये झाला.
 • सन 1948 मध्ये मुंबई मध्ये कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.