29 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

अरुणकुमार जगदीश
अरुणकुमार जगदीश

29 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 डिसेंबर 2022)

लोकायुक्त विधेयक विधानसभेत चर्चेविना मंजूर :

  • भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्रातील लोकपालाच्या धर्तीवर लोकायुक्त कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत चर्चेविना मंजूर करण्यात आले.
  • मंत्र्यांना पाठिशी घालण्यात येत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी लोकायुक्त कायद्याचे विधेयक चर्चेविना मंजूर केले.
  • केंद्र सरकारने लोकपाल कायदा तयार केल्यानंतर राज्य सरकारांनी त्याच धर्तीवर एक वर्षांत लोकायुक्त कायदा तयार करावा, अशी अपेक्षा होती.
  • मात्र, राज्यात आजवर तसा कायदा झाला नव्हता.
  • पूर्वीच्या लोकायुक्त कायद्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाचा समावेश नव्हता.
  • त्यामुळे विशेष बाब म्हणून लोकायुक्तांना एखादी चौकशी करता यायची आणि त्यासंदर्भात कारवाईची शिफारस करण्याचे केवळ अधिकार होते.
  • नव्या कायद्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यालाही लोकायुक्तांच्या अंतर्गत आणले आहे.

मुंबई इंडियन्सने नवीन सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षकाला केले नियुक्त :

  • इंडियन प्रीमियर लीगच्या सर्वात यशस्वी फ्रँचायझी म्हणून मुंबई इंडियन्सला ओळखले जाते.
  • मुंबई इंडियन्सने नवीन सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे.
  • अनुभवी अरुणकुमार जगदीश यांची नवीन सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • जगदीश यांना 16 वर्षे भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याव्यतिरिक्त कोचिंगचा मोठा अनुभव आहे.
  • अरुणकुमार जगदीश यांना त्यांच्या काळात उजव्या हाताचा एक फलंदाज म्हणून ओळखले जायचे.
  • त्यांनी 1993 ते 2008 पर्यंत म्हणजे 16 वर्षे भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा न्यूझीलंडचा ठरला तिसरा गोलंदाज :

  • पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम साऊदीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 350 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.
  • कसोटी क्रिकेटमध्ये 350 विकेट्स घेणारा साऊथी न्यूझीलंडचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
  • हे करत साऊथीने रिचर्ड हेडली आणि डॅनियल व्हिटोरी यांच्या विक्रमांची बरोबरी केली आहे.
  • हॅडलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 431 विकेट घेतल्या आहेत, जो न्यूझीलंडसाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
  • तर फिरकीपटू डॅनियल व्हिटोरीने कसोटीत 361 विकेट्स घेतल्या आहेत.

दिनविशेष:

  • काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ‘व्योमकेशचंद्र बॅनर्जी‘ यांचा जन्म 29 डिसेंबर 1844 मध्ये झाला होता.
  • मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म 29 डिसेंबर 1900 मध्ये झाला होता.
  • प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ‘रामानंद सागर‘ यांचा जन्म 29 डिसेंबर 1917 रोजी झाला होता.
  • सन 1930 मध्ये सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला होता.
  • सन 1959 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही Nanotechnology ची सुरुवात मानली जाते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.