24 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

24 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (24 डिसेंबर 2022)

‘भारत बायोटेक’च्या ‘इंट्रानेजल कोविड’ लशीच्या वापरास मंजुरी :

 • जगभरात करोनाचा प्रभाव वाढत असताना लशीची वर्धक मात्रा घेण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.
 • याला चालना देण्यासाठी नाकावाटे देण्यात येणाऱ्या पहिल्या लशीला मंजुरी देण्यात आली आहे.
 • ‘भारत बायोटेक’च्या ‘इंट्रानेजल कोविड’ लशीच्या वापरास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली असून कोणत्याही लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना वर्धक मात्रा म्हणून ही लस घेता येणार आहे.
 • भारत बायोटेकने तयार केलेल्या ‘इन्कोव्हॅक’ किंवा ‘बीबीव्ही 154’ लसीच्या वापरास मंजुरी देण्यात आली आहे.
 • ‘को-विन’ संकेतस्थळ आणि अ‍ॅप्लिकेशनवर शुक्रवार संध्याकाळपासून या वर्धक मात्रेसाठी नोंदणी करता येणार आहे.
 • लस 18 वर्षांवरील व्यक्तींना वर्धक मात्रा म्हणून देण्यास भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) नोव्हेंबरमध्येच मंजुरी दिली होती.

‘वन रँक वन पेन्शन’ योजनेत सुधारणेचा सरकारचा निर्णय :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सशस्त्र दलातील निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीच्या ‘एक हुद्दा, एक निवृत्तीवेतन’ योजनेत सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आली
 • या निर्णयाचा लाभ सुमारे 25 लाख निवृत्त सैनिकांना होईल.
 • तसेच हा निर्णय पूर्वलक्ष्यी प्रभावाने, 1 जुलै 2019पासून लागू करण्यात येणार आहे.
 • शहिदांच्या पत्नींना आणि अपंग निवृत्तीवेतनधारकांसह कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांनाही या निर्णयाचा लाभ दिला जाईल.
 • थकबाकी चार सहामाही हप्त्यांमध्ये दिली जाईल.
 • तथापि, विशेष कौटुंबिक निवृत्तीवेतनधारक आणि शौर्य पुरस्कार विजेत्यांसह सर्व कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना एका हप्तय़ात थकबाकी दिली जाईल, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

गरीबांना आणखी वर्षभर मोफत धान्य :

 • ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षितता कायद्या’अंतर्गत आणखी वर्षभर गरिबांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने शुक्रवारी घेतला.
 • त्याचा लाभ 81.35 कोटी गरीबांना होईल आणि त्यासाठी दोन लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे केंद्रीय वाणीज्यमंत्री पियूष गोयल यांनी सांगितले.
 • परंतु त्याचा सर्व भार केंद्र सरकार उचलणार आहे.
 • अन्न सुरक्षितता कायद्यानुसार सध्या कुटुंबातील एका व्यक्तिमागे दोन ते तीन रुपये किलो दराने दरमहा पाच किलो धान्य वितरण करण्यात येते.
 • अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थी कुटुंबांना दरमहा 35 किलो अन्नधान्य मिळते.
 • येत्या 31 डिसेंबरला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना या मोफत धान्य पुरवठा योजनेची मुदत संपुष्टात येणार होती.

महेंद्रसिंग धोनीच्या ‘या’ मोठ्या विक्रमाशी केली बरोबरी :

 • भारत आणि बांगलादेश संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे.
 • या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 227 धावा केल्या होत्या.
 • त्यानंतर भारतीय संघाने आपल्या पहिल्या 314 धावा केल्या होत्या.
 • तत्पुर्वी ऋषभ पंतने आपले शतक हुकल्यानंतर, एमएस धोनीच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
 • ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून, सर्वाधिक 90पेक्षा अधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आहे.
 • भारताकडून महेंद्रसिंग धोनी या बाबतीत नंबर-1 होता. पण आता ऋषभ पंतने त्याची बरोबरी केली आहे.
 • बांगलादेशविरुद्ध 93 धावांवर बाद झाला.
 • पंत 11व्यांदा 90पेक्षा अधिक धावांवर बाद झाला आहे.
 • अॅडम गिलख्रिस्टने 20 वेळा अशी कामगिरी केली आहे. तसेच झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवर 12 वेळा अशी कामगिरी करून दुसऱ्या स्थानावर आहे.
 • पंत आणि धोनी दोघांनीही 11-11वेळा अशी कामगिरी केली आहे.

उमेश यादवने मोडला वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टनचा विक्रम :

 • उमेश यादवने मिरपूर कसोटीत बांगलादेशविरुद्ध चार बळी घेतले.
 • भारतीय संघाचा हा वेगवान गोलंदाज टीम इंडियात नियमित खेळत नाही.
 • चार विकेट्सच्या जोरावर उमेशने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक मोठा विक्रमही केला आहे.
 • वेगवान गोलंदाज म्हणून उमेश यादवने आशियाई खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करण्याच्या बाबतीत, पाकिस्तानच्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराला मागे टाकले आहे.
 • 100 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणाऱ्या क्रिकेटर्सबद्दल बोलायचे झाले, तर उमेशने पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानचाही विक्रम मागे टाकला आहे.
 • उमेश यादवचा टेस्ट स्ट्राइक रेट 48.5 आहे तर इम्रान 48.8 आणि वसीम 52.4सह तिसऱ्या स्थानावर आहे.

चेतेश्वर पुजाराने मोडला डॉन ब्रॅडमनचा विक्रम :

 • भारतीय कसोटी संघाची दुसरी भिंत म्हटल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने एक मोठा विक्रम केला आहे.
 • त्याने क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये 7000 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
 • पुजारा अशी कामगिरी करणारा भारतातील 8वा आणि जगातील 55वा खेळाडू ठरला आहे.
 • कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पुजाराने सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे.
 • ब्रॅडमन यांनी 52 कसोटी सामन्यांमध्ये 99.94 च्या अविश्वसनीय सरासरीने 6996 धावा केल्या होत्या.
 • बांगलादेशविरुद्ध 98वी कसोटी खेळत असलेल्या पुजाराने 44.88 च्या प्रभावी सरासरीने 7000 धावांचा टप्पा पार केला आहे.
 • भारताकडून सर्वाधिक कसोटी धावा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत.
 • कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रमही सचिनच्या नावावर आहे.
 • टीम इंडियाचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दिनविशेष:

 • सन 1777 मध्ये कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.
 • स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा जन्म 24 डिसेंबर 1880 मध्ये झाला होता.
 • बालसाहित्यक, समाजवादी नेते, समाजसुधारक तसेच स्वातंत्र्यसैनिक ‘पाडुरंग सदाशिव साने‘ उर्फ साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर सन 1899 रोजी झाला होता.
 • स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 24 डिसेंबर सन 1910 रोजी जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.