27 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

27 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 जानेवारी 2023)

एकूण 106 पद्म पुरस्कारांची घोषणा:

 • भारत सरकारने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.
 • यावेळी केंद्र सरकारने एकूण 106 पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत.
 • यामध्ये समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव तसेच ओआरएसचे निर्माते दिलीप महालनाबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर 91 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 • केंद्र सरकारने एकूण 106 पद्म पुरस्कारांपैकी 6 जणांना पद्मविभूषण, 9 जणांना पद्मभूषण तर 91 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.
 • यामध्ये 19 मान्यवर महिला आहेत. तर यामध्ये 2 एनआरएय, परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील चार अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’जाहीर:

 • प्रजासत्ताक दिनाच्या दिनानिमित्त 901 पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.
 • यापैकी 140 पोलीस कर्मचाऱ्यांचा शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
 • तर 93 पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलं आहे.
 • याशिवाय गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 668 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर झालं आहे.
 • यामध्ये महाराष्ट्रातील 31 पोलिसांना शौर्य पोलीस पदक जाहीर झाले आहे.
 • तसेच,चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि 39 पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांना गुणवंत पोलीस पदक जाहीर झाले आहे.
 • याशिवाय, 55 जवानांना होमगार्ड व सिविल डिफेंस मेडलने सन्मानित करण्यात आलं आहे.
 • हे शौर्य पदक होमगार्ड आणि नागरिक सुरक्षेसाठी जवानांच्या शौर्यासाठी दिले जाते.
 • उत्कृष्ट सेवा आणि नागरी संरक्षणासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते विशिष्ट सेवा आणि नागीर संरक्षण पदक प्रदान केले जाते.
 • हे पदक 9 जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी आणि 45 जवानांना नागरी संरक्षणासाठी दिले जाते.

महाराष्ट्राच्या चित्ररथात गाजला नारीशक्ती आणि देवीचा गजर:

 • भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
 • महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला.
 • यावर्षीच्या पथसंचलनात 17 राज्ये आणि दहा विविध केंद्रीय मंत्रालयांनी मिळून 27 चित्ररथ कर्तव्यपथावर सादर केले.
 • महाराष्ट्राने यापूर्वी 40 वेळा राजधानी दिल्लीत मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर केलेला आहे.
 • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यावेळी “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” ही संकल्पना सादर केली आहे.
 • या माध्यमातून महाराष्ट्रातील पुरातन मंदिरे आणि महिलांचे कर्तुत्व या गोष्टीला सर्वांच्या समोर आणता येतील.

नौदलाच्या ‘या’ टेहळणी विमानाचे कर्तव्यपथावर ठरले पहिले आणि शेवटचे उड्डाण:

 • 26 जानेवारीला कर्तव्यपथावरुन संरक्षण दल, निमलष्करी दल, तसंच केंद्र सरकारच्या विविध तुकड्या संचलन करतात.
 • तसंच या संचलनाच्या शेवटी संरक्षण दलातील लढाऊ विमाने, मालवाहू विमाने, हेलिकॉप्टर हे कर्तव्यपथावरुन उड्डाण करत सलामी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.
 • यावेळी झालेल्या संचलनात नौदलाच्या एका टेहळणी विमानाने पहिल्यांदाच सहभाग घेतला होता.
 • यावेळी त्या टेहळणी विमानाने कर्तव्यपथावरुन केलेले पहिले आणि शेवटचे उड्डाण ठरले.
 • या टेहळणी विमानाचे नाव आहे IL-38, हे नौदलाच्या सेवेतून गेल्या वर्षी, 17 जानेवारी 2022 ला निवृत्त झाले होते.
 • यानिमित्ताने एका vintage aircraft ने कर्तव्यपथावरुन उड्डाण केलं असंच म्हणावे लागेल.
 • रशियन बनावटीचे IL-38 हे टेहळणी विमान हे 1977 ला नौदलाच्या सेवेत दाखल झाले होते.
 • अशी एकूण पाच विमाने दाखल झाली होती, 2002 ला झालेल्या एका अपघातात दोन विमाने नौदलाने गमावली होती.
 • असं असलं तरी भारताच्या तिन्ही बाजूला पसरलेल्या अथांग समुद्रावर नजर ठेवण्याचे काम हे या IL-38 टेहळणी विमानाच्या माध्यमातून केले जात होते.
 • एका दमात 13 हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्याची किंवा सलग 13 तास उड्डाण करण्याची या विमानाची अनोखी क्षमता होती.

नाकावाटे दिली जाणारी करोनावरील पहिली भारतीय लस बाजारात उपलब्ध:

 • करोनाविरोधातील लढ्यात भारताला आणखी एक यश मिळालं असून नाकावाटे दिली जाणारी करोनावरील पहिली भारतीय लस आजपासून बाजारात उपलब्ध होणार आहे.
 • इन्कोव्हॅक (Incovacc) असं या लसीचं नाव आहे.
 • भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने तयार केलेल्या या लसीचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्याहस्ते वितरण करण्यात आलं.
 • इन्कोव्हॅक या लसीसाठी भारत बायोटेकला डिसेंबर 2022 मध्ये मान्यता मिळाली होती.
 • ही लस वर्धक मात्रा म्हणून देखील देता येणार आहे.
 • यापूर्वी कोवॅक्सिन किंवा कोविशील्ड या लसींची मात्रा घेणारे सुद्धा वर्धक मात्रा म्हणून इन्कोव्हॅकचा वापर करू शकतात.

icc क्रमवारीत शुबमन गिलची उडी:

 • भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका संपुष्टात आली आहे.
 • या मालिकेत भारतीय संघाचा युवा खेळाडू आणि सलामीवीर शुबमन गिलने वेगवान फलंदाजी केली.
 • गिलने या मालिकेत 360 धावा करत बाबर आझमच्या विक्रमाची बरोबरी केली.
 • या कामगिरीचा फायदा गिलला आयसीसी क्रमवारीत मिळाला आहे.
 • यात गिल आता सहाव्या स्थानावर आला आहे.

सूर्यकुमार ठरला क्रिकेटर ऑफ द इयर 2022:

 • भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव फॉर्मात आहे.
 • त्याने गेल्या वर्षी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1164 धावा केल्या होत्या.
 • सूर्यकुमार यादवची ICC ने 2022 सालच्या ‘पुरुष टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’पुरस्कारासाठी निवड केली आहे.
 • सूर्या ‘द-स्काय’ टी20 मध्ये जगातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
 • सूर्याला ICC पुरूष क्रिकेटपटू ऑफ द इयर 2022चा पुरस्कार मिळाला आहे.

दिनविशेष :

 • 1967 : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.
 • 1938 :जगाती ल सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा (53.900 किमी) जपानच्या होन्शू व होक्काइदो बेटांमध्ये खुला करण्यात आला.
 • 2009 : भारताचे 8 वे राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांचे निधन. (जन्म: 4 डिसेंबर 1910)
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.