24 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

INS Vagir
INS Vagir

24 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (24 जानेवारी 2023)

अंदमान-निकोबारच्या 21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे:

 • 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी केली जाते.
 • यानिमित्त सोमवारी अंदमान आणि निकोबार बेटांच्या 21 सर्वात मोठय़ा बेटांना परमवीर चक्र विजेत्या सुरक्षादल अधिकाऱ्यांचे नाव देण्यात आले.
 • दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होत मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर उभारण्यात येणाऱ्या नेताजी राष्ट्रीय स्मारकाच्या प्रतिकृतीचेही उद्घाटन केले.

INS Vagir पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल:

 • नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय असलेल्या मुंबईतील नौदल तळावर झालेल्या एका शानदार कार्यक्रमात INS Vagir ही पाणबुडी आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली.
 • या पाणबुडीच्या समावेशामुळे समुद्रात विस्तृत भागात गस्त घालत लक्ष ठेवण्याच्या नौदलाच्या क्षमतेत वाढ होणार आहे.
 • मुंबईत माझगाव डॉकयार्ड कलवरी मार्गातील पाणबुड्यांची निर्मिती करत आहे.
 • डॉकयार्ड बांधलेल्या कलवरी, खंदेरी, करंज आणि वेला अशा चार पाणबुड्या नौदलात दाखल झाल्या होत्या.
 • आता यामध्ये INS Vagir च्या रुपाने पाचव्या पाणबुडीची भर पडली आहे.
 • सहावी आणि कलवरी वर्गातील शेवटची पाणबुडी वगशीर INS Vagsheer पाणबुडीच्या समुद्रातील चाचण्या सुरु असून एप्रिल 2024 मध्ये अखेरपर्यंत ती नौदलात दाखल होईल असा अंदाज आहे.
 • या पाणबुडीची लांबी सुमारे 67 मीटर असून उंची 12 मीटर एवढी आहे, एकुण वजन सुमारे 1700 टन एवढे आहे.
 • कलवरी वर्गातील इतर पाणबुड्यांप्रमाणे ही पाणबुडीही डिझेल-इलेक्ट्रिक प्रणालीवर कार्यरत रहाते.
 • एका दमात 12 हजार किलोमीटर अंतर पार करु शकते, समुद्रात जास्तीत जास्त 50 दिवस सलग संचार करण्याची या पाणबुडीची क्षमता आहे.
 • पाण्याखालील लक्ष्याचा भेद करण्यासाठी पाणतीर (torpedo) तर पाण्यावरील किंवा जमिनीवरील लक्ष्याला भेदण्यासाठी क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता या पाणबुडीत आहे.

फुटबॉल सामन्यात प्रथमच पांढऱ्या कार्डचा वापर:

 • फुटबॉलमध्ये नियमभंगासाठी आतापर्यंत पंच पिवळे आणि लाल कार्ड वापरतात हे सर्वश्रुत होते.
 • पंचांनी या पांढऱ्या कार्डचा वापर फुटबॉलमध्ये प्रथमच शनिवारी पोर्तुगाल येथील एका स्थानिक सामन्यात केला.
 • पोर्तुगालमधील महिला फुटबॉल लीगमधील बेन्फिका विरुद्ध स्पोर्टिग लिस्बन या सामन्यात पंचांनी या पांढऱ्या कार्डचा वापर केला.
 • फुटबॉलमध्ये कार्ड दाखवण्याची परंपरा 1970च्या विश्वचषक स्पर्धेपासून सुरू झाली.
 • परंतु पंचांनी पांढरे कार्ड वापरण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
 • खेळातील नैतिक मूल्य सुधारण्यासाठी आणि खिलाडूवृत्तीचे कौतुक करण्यासाठी सामन्यादरम्यान पंचांकडून पांढऱ्या कार्डचा वापर केला जातो.

मेरी कोम देखरेख समितीचीही अध्यक्ष:

 • भारताची तारांकित बॉक्सिंगपटू मेरी कोमच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय देखरेख समिती भारतीय कुस्तीगीर महासंघाचा तात्पुरता कार्यभार सांभाळणार असून, महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशीही करणार आहे.
 • केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सोमवारी याबाबतची घोषणा केली.
 • कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी नियुक्त शासकीय समितीत मेरीसह ऑलिम्पिकपटू कुस्तीगीर योगेश्वर दत्त, माजी बॅडिमटनपटू तृप्ती मुरगुंडे, केंद्र सरकारच्या लक्ष्य ऑलम्पिक व्यासपीठ योजनेचे (टॉप्स) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राजगोपालन, क्रीडा प्राधिकरणाच्या माजी संचालिका राधिका श्रीमन यांचा समावेश आहे.

भारतीय खेळाडूंना मिळाले आयसीसीच्या संघात स्थान:

 • आयसीसीने 2022 मधील पुरुषांचा सर्वोत्तम टी-20 संघ जाहीर केला आहे.
 • यामध्ये टीम इंडियाच्या तीन खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
 • विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांच्याशिवाय अष्टपैलू हार्दिक पांड्यालाही स्थान मिळाले आहे.
 • इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणाऱ्या जोस बटलरला आयसीसीच्या सर्वोत्तम टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

महिला टी-20 टीम ऑफ द इयर 2022 ची घोषणा:

 • आयसीसीने सोमवारी महिला टी-20 टीम ऑफ द इयर 2022 ची घोषणा केली.
 • या संघात सर्वाधिक चार भारतीय महिला खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
 • त्याचबरोबर भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे तीन आणि न्यूझीलंड, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान मिळाले आहे.
 • या संघात निवडलेल्या चार भारतीय खेळाडूंमध्ये स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, ऋचा घोष आणि रेणुका सिंग यांच्या नावांचा समावेश आहे.

दिनविशेष:

 • 24 जानेवारीशारीरिक शिक्षण दिन
 • 24 जानेवारीराष्ट्रीय बालिका दिवस
 • सन 1857 मध्ये दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.
 • एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान 24 जानेवारी सन 1966 मध्ये युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले होते.
 • सन 1976 मध्ये ‘बर्मा शेल’ या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे 1 ऑगस्ट 1977 रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (BPCL) असे करण्यात आले.
 • सन 1984 मध्ये कल्पक्कम, तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.