28 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

28 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 जानेवारी 2023)

नमिबियानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून भारतात येणार 100 चित्ते:

  • नामिबियानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून 100 चित्ते भारतात आणण्यात येणार आहे.
  • यासंदर्भात भारत सरकार आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
  • गेल्या वर्षी नामिबियातून आठ चित्ते भारतात आणण्यात आले होते.
  • दक्षिण आफ्रिका आणि भारत सरकार यांच्यात 100 चित्ते भारतात आणण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
  • या करारानुसार दरवर्षी 10 ते 12 चित्ते भारतात पाठवले जाणार आहेत.
  • यापैकी पहिल्या 12 चित्यांची एक तुकडी 15 फ्रेब्रुवारी रोजी भारतात पोहोचेल.

नेपाळच्या पवित्र नदीतल्या शाळिग्राम शिळेत कोरले जाणार भगवान श्रीराम,जनकपूरवरून येणार धनुष्य:

  • अयोध्येत बनत असलेल्या भव्य राम मंदिर निर्मितीत भगवान श्रीरामांची सासरवाडी म्हणजेच नेपाळच्या जनकपूरमधील जानकी मंदिर मोठं योगदान देणार आहे.
  • श्रीरामांची मूर्ती बनवण्यासाठी नेपाळमधील कालिगंडकी नदीतल्या दोन मोठ्या शाळिग्राम शिळा अयोध्येत आणल्या जात आहेत.
  • नेपाळमधील कालिगंडकी नदीतून 350 ते 400 टन वजनाचा मोठ्या शाळिग्राम शिळा 31 जानेवारी रोजी अयोध्येत पाठवल्या जाणार आहेत.
  • जनकपूर येथे 30 जानेवारी रोजी या शिळांची चाचणी होणार आहे. त्यानंतर रस्त्याने हे दगड अयोध्येला रवाना होतील.

पृथ्वीभोवती फिरणारे उपग्रह थोडक्यात वाचले:

  • सध्याचे आपले गतीमान आयुष्य हे पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहांवर अवलंबून आहे.
  • जर हे उपग्रह नसतील तर आपण थेट 1950च्या काळात मागे पोहचू, आपले दैनंदिन व्यवहार ठप्प होतील, विमानसेवा-दूरसंचार सेवा-टीव्हीचे विश्व अगदी ATM सेवाव अशा विविध गोष्टींवर त्याचा परिणाम थेट परिणाम होईल.
  • त्यामुळे या उपग्रहांचा अस्तित्वाशी आपला प्रत्यक्ष संबंध नसला तरी त्यांच्या सेवेवर आपले आयुष्य अवलंबून आहे.
  • 2023 BU नावाचा एक लघुग्रह (Asteroid) हा पृथ्वीपासून अवघ्या तीन हजार 600 किलोमीटर अंतरावरुन भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे तीनच्या सुमारास दक्षिण अमेरिकेच्या आकाशातून पृथ्वीला वळसा घालत पुढे निघून गेला.
  • या लघुग्रहाचा शोध हौशी खगोल अभ्यासक Gennadiy Borisov यांनी लावला होता.
  • अवकाशाचे निरिक्षण करत असतांना साधारण सहा दिवसांपूर्वीच हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येतांना त्यांना आढळून आले.
  • एका लहान स्कुलबसच्या आकाराचा, साधारण चार ते आठ मीटर अशा ओबडधोबड आकाराचा हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेशी समांतर साधारण 400 दिवसांत सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करत असल्याची माहिती समोर आली आहे.
  • आता या लघुग्रहाने पृथ्वीला वळसा जरी घातला असता तरी यापुढच्या काळातही हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्राच्या 4 तरुणांचा लंडनमध्ये सत्कार:

  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात प्रभावशाली काम करणाऱ्या देशातील प्रतिभावान 75 युवकांचा लंडनमध्ये सन्मान करण्यात आला.
  • ब्रिटिश कौन्सिल व नेशनल इंडियन स्टुडंट अँड अलूमनी युनियनच्या माध्यमातून हा सत्कार करण्यात आला.
  • यामध्ये प्रविण निकम, चैतन्य मारपकवार, राजू केंद्रे, विवेक गुरव यांच्यासह महाराष्ट्रातील चार तरुणांचा समावेश आहे.

टी20 तसेच वन डे क्रमवारीत टीम इंडिया नंबर-1:

  • मंगळवारी इंदोर मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने एक नवा विक्रमही केला.
  • भारतीय संघ आता एकदिवसीय क्रमवारीत नंबर-1 बनला आहे, तो टी20 क्रमवारीत आधीच नंबर-1 होता.
  • या तीन सामन्यांच्या मालिकेच्या सुरुवातीला न्यूझीलंड क्रमवारीत अव्वल स्थानावर होता.
  • न्यूझीलंड 111 रेटिंग गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

2023च्या महिला टी20 विश्वचषकात पंच आणि सामनाधिकारी म्हणून महिलांना स्थान:

  • आयसीसी जागतिक स्पर्धांच्या इतिहासात प्रथमच, दक्षिण आफ्रिकेत आगामी आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 साठी सर्व महिला सामनाधिकार्‍यांच्या पॅनेलची घोषणा करण्यात आली आहे.
  • क्रिकेटमध्ये महिलांचा सहभाग आणि सामने पाहण्याच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ होण्याच्या आयसीसीच्या धोरणात्मक महत्त्वाकांक्षेचा एक भाग म्हणून पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या प्रमुख स्पर्धेसाठी महिला 3
  • सामनाधिकारी आणि 10 पंच काम पाहतील.
  • आगामी वरिष्ठ महिला टी20 विश्वचषकात 13 महिला सामना अधिकारी असतील.
  • ही आकडेवारी सध्या चालू असलेल्या आयसीसी अंडर-19 महिला टी20 विश्वचषकातील नऊ महिला अधिकार्‍यांचा विक्रम मोडेल.

दिनविशेष:

  • स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 मध्ये झाला होता.
  • स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म 28 जानेवारी 1899 मध्ये झाला होता.
  • शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे 4थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचा जन्म 28 जानेवारी 1925 मध्ये झाला होता.
  • एच.एम.टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना सन 1961 मध्ये बंगलोर येथे सुरू झाला.
  • सन 1977 मध्ये मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे 15वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला होता.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.