24 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

24 October 2019 Current Affairs In Marathi

24 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (24 ऑक्टोबर 2019)

आता वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये होणार ‘हा’ बदल :

  • वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आता सरकार आणखी एक मोठं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. नव्या नियमांनुसार आता गाड्यांच्या नंबर प्लेटवर रेट्रो टेप म्हणजेच चमकदार पट्टी लावणं बंधनकारक करण्यात येणार आहे.
  • तर नियमांनुसार जर कोणत्याही गाडीच्या नंबर प्लेटवर रेट्रो टेप लावली नाही तर वाहन चालकांकडून दंड आकारला जाणार आहे. रस्त्यांवर होणारे अपघात टाळण्यासाठी सरकार हा विचार करत आहे.
  • तसेच नंबर प्लेटवर रेट्रो टेप लावल्यानं अंधारातही गाडीवर प्रकाश पडल्यास तो चमकू लागतो. त्यामुळे आपल्या मागे किंवा पुढे एखादे वाहन असल्याची माहिती वाहनचालकाला मिळते.
  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय याच आठवड्यात पत्रक काढण्याची शक्यता आहे. वाहन चालकांची सुरक्षा लक्षात घेऊनच हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं बोलताना सांगितलं.
  • नियमानुसार ऑटो रिक्षा आणि ई-रिक्षांमध्ये पुढील बाजूला सफेद रंगाची आणि मागील बाजूला लाल रंगाची रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप लावणं अनिवार्य आहे. या टेपची लांबी 20 मीमीपेक्षा कमी असू नये. गाडीचा वेग 25 किलोमीटर प्रति तास असला तरी त्याची चमक 50 मीटर लाबूनही दिसावी, असं नियमांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
  • तर यापूर्वी या नियमांमधून ई-रिक्षांना सूट देण्यात आली होती. परंतु ई-रिक्षांचेही वाढते अपघात पाहता त्यांनाही ही टेप लावणं बंधनकारक करण्याच्या निर्णय सरकारनं घेतला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 ऑक्टोबर 2019)

पंकज कुमार UIDAI चे नवे सीईओ :

  • केंद्र सरकारने मोठे प्रशासनिक बदल केले आहेत. वरिष्ठ आयएएस अधिकारी संजीव नंदन सहाय यांची ऊर्जा विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सुभाष चंद्र गर्ग यांची जागा घेणार आहेत.
  • तर माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त सचिव पंकज कुमार यांची ‘यूआयडीएआय’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर गर्ग यांना अर्थ विभागाच्या सचिव पदावरून हटवून ऊर्जा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.
  • त्यानंतर गर्ग यांनी सेवानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. ते सध्या तीन महिन्यांच्या नोटीसवर कार्यरत आहेत. गर्ग हे येत्या 31 ऑक्टोबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.
  • ब्रज राज शर्मा यांची कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते गृह मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सीमा व्यवस्थापन विभागाच्या सचिवदी कार्यरत आहेत. तर ‘एनएचएआय’चे अध्यक्ष नागेंद्र नाथ सिन्हा हे ब्रज राज शर्मा यांची जागा घेणार आहेत. संजीव गुप्ता यांची गृह मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राज्य सचिवालय परिषदेत सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते याच विभागात विशेष सचिव म्हणून कार्यरत होते.

एमटीएनएल-बीएसएनएलचे अखेर विलीनीकरण :

  • भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) या सरकारी कंपन्या बंद केल्या जाणार नाहीत. या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करून सक्षम दूरसंचार कंपनीत रूपांतर करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती दूरसंचारमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
  • तर बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या विलीनीकरणानंतर नवी कंपनी आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनवण्यासाठी सार्वभौम कर्जरोख्यांच्या माध्यमातून 15 हजार कोटींचे आर्थिक बळ पुरवले जाणार आहे.
  • तसेच पुढील चार वर्षांमध्ये दोन्ही कंपन्यांच्या मालकीची मालमत्ता विकून 38 हजार कोटी रुपये उभे केले जातील. या निधीतून सरकारी दूरसंचार कंपनीचे अत्याधुनिकीकरण केले जाईल. कर्जाचे ओझे कमी करणे, कर्जरोख्यांवरील व्याजाची परतफेड, सेवांच्या विस्तारीकरणासाठी हा निधी वापरला जाईल.
  • तसेच, दोन्ही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी 4जी आणि 5जी स्पेक्ट्रमचे वाटप करण्याची मागणी केली होती. त्यानुसार 2016 च्या दरानुसार 4जी स्पेक्ट्रमचे वाटप या सरकारी दूरसंचार कंपन्यांनाही होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने
    20,140 कोटींचे भांडवल गुंतवणुकीचाही निर्णय घेतला आहे.

शेतमालाच्या आधारभूत दरात वाढ :

  • दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारनं देशातील शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी रब्बी हंगामातील शेतमालाच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • तर या बैठकीत मंत्रिमंडळातील फेरबदलाचे निर्णय होण्याची शक्यता होती. त्यामुळे याबैठकीकडं सगळ्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत बीएसएनएल, एमटीएनएलला उभारी देण्याबरोबरच इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
  • तसेच शेतकऱ्यांसाठीही केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतमालाच्या किमान आधारभूत मूल्यात सरकारने वाढ करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यात रब्बी हंगामातील शेतमालाच्या दरात 85 रूपयांची वाढ करण्यात आली असून, या वाढीनंतर गव्हाच्या किंमती क्विंटलमागे 85 रूपयांची होणार आहे.

दिनविशेष:

  • 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन, जागतिक विकास माहिती दिन तसेच जागतिक पोलियो दिन आहे.
  • सन 1605 मध्ये मुघल सम्राट जहांगिर यांचा राज्याभिषेक झाला.
  • विल्यम लसेल यांनी सन 1851 मध्ये उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.
  • सन 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
  • भारतामध्ये प्रथमच भुयारी रेल्वे सन 1984 मध्ये कोलकाता येथे सुरू झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.