11 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

11 November 2019 Current Affairs In Marathi

11 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 नोव्हेंबर 2019)

भारतीयांच्या वापरात नसलेल्या स्विस खात्यांतील पैसा सरकारजमा :

  • स्विस बँकेतील भारतीयांची अनेक खाती ही वापरात नसून त्यातील पडून असलेला पैसा आता स्वित्र्झलड सरकारकडे हस्तांतरित केला जाणार आहे.
  • स्विस सरकारने बंद असलेल्या अशा खात्यांची यादी 2015 मध्ये जाहीर केली होती.
  • तसेच या खात्यांवर कुणीही दावा केलेला नाही. या खात्यांबाबत पुरावे देऊन ती चालू करण्याचा प्रस्ताव बँकेने दिला होता. त्यातील किमान 10 खाती भारतीयांशी संबंधित आहेत. भारतीय निवासी, नागरिक, यांची ही खाती असून त्यातील काही ब्रिटिश काळातील आहेत. या दहाही खात्यांपैकी एकावरही कुणी सहा वर्षांत दावा केलेला नाही, असे स्विस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
  • तर या खात्यांवर दावा करण्याचा कालावधी पुढील महिन्यात संपत आहे. काही खात्यांवर 2020 अखेपर्यंत दावा करता येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 ऑक्टोबर 2019)

माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे निधन :

  • निवडणूक आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजाणीतून भारतीय निवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवणारे आणि राजकारण्यांमध्ये दरारा निर्माण करणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे चेन्नई येथील घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.
  • तर मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून शेषन यांची 12 डिसेंबर 1990 रोजी नियुक्ती झाली.
  • त्यानंतरची सहा वर्षांची त्यांची कारकिर्द ऐतिहासिक ठरली. मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होताच त्यांनी निवडणूक प्रक्रियेचा चेहरा-मोहरा बदलला. निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याबरोबरच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक केली.

दीपक चहर जगात अव्वल :

  • भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत रोहित शर्मा आणि शिखर धवन अपयशी ठरले. पण, लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.
  • तर या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकासह संघाला 5 बाद 174 धावांपर्यंत मजल मारून दिली.
  • तसेच दीपक चहर (6/7) आणि शिवम दुबे (3/30) यांनी संघाला कमबॅक करून दिलं. टीम इंडियानं या सामन्यासह मालिकाही 2-1 अशी खिशात घातली. भारतानं हा सामना 30 धावांनी जिंकला.
  • युजवेंद्र चहलनं महमदुल्लाहला त्रिफळाचीत करून विक्रमाला गवसणी घातली. त्याचे ही ट्वेंटी-20 क्रिकेटमधील 50वी विकेट ठरली.
  • तर या कामगिरीसह त्यानं डेल स्टेनचा विक्रम मोडला. चहलनं 34 सामन्यांत 50 विकेट्स घेतल्या. स्टेनला 35 सामने खेळावे लागले होते.
  • शिवाय आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांच्यानंतर ट्वेंटी-20 50 विकेट्स घेणारा चहल तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

आता दोन दिवसांत होणार मोबाइल नंबरची पोर्टेबिलिटी :

  • मोबाइल क्रमांक समान ठेवून सेवा पुरवणारी कंपनी बदलण्याबाबतचा म्हणजेच मोबाइल पोर्टेबिलिटीचा नवीन नियम 16 डिसेंबर पासून लागू होणार आहे. यामुळे या प्रक्रियेला लागणारा आठवडाभराचा कालावधी कमी होऊन दोन दिवसांत ही प्रक्रिया कमी होणार आहे, अशी माहिती भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (ट्राय) दिली आहे.
  • तर सध्या एमएनपी प्रक्रियेसाठी साधारणत: आठवडाभराचा कालावधी लागतो मात्र ट्रायच्या नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर हा वेळ अवघ्या दोन दिवसांवर येईल.

दिनविशेष :

  • 11 नोव्हेंबरराष्ट्रीय शिक्षण दिन
  • अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण 11 नोव्हेंबर 1926 मध्ये करण्यात आले.
  • 11 नोव्हेंबर 1926 मध्ये आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझार्ड यांना पेटंट देण्यात आले.
  • कुवेत देशाने 11 नोव्हेंबर 1962 मध्ये नवीन संविधान अंगीकारले.
  • 11 नोव्हेंबर 1975 मध्ये अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.
  • अँटिगा आणि बार्बुडा या देशांचा 11 नोव्हेंबर 1981 मध्ये संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.